महत्वाच्या बातम्या
-
Rajkishor Modi Join NCP in Beed | राजकिशोर मोदींचा राष्ट्रवादीत प्रवेश | अंबाजोगाई नगरपालिकेसह केज विधानसभेत पक्ष मजबूत
मराठवाडा बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी व पदाधिकाऱ्यांनीदेखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मोदी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश (Rajkishor Modi Join NCP in Beed) केल्यामुळे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
MIM Corporators Join NCP | लातूरच्या उदगीर नगरपंचायतीत एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राज्यात राष्ट्रवादीत इनकमिंग पुन्हा सुरु झालं आहे. मराठवाड्यातील महत्वाच्या लातूरच्या उदगीर नगरपंचायतीत त्याला पुन्हा सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र यावेळी भाजपला नव्हे तर एमआयएमला राजकीय धक्का (MIM Corporators Join NCP) देण्यात आला आहे. MIM’च्या पाच नगरसेवकांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
Zilla Parishad Election Results 2021 | वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी आघाडी
राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर (Zilla Parishad Election Results 2021) होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
जळगाव | शिवसेनेचे माजी आ. कैलास पाटील आणि शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश
महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम झालेले नव्हते. म्हणूनच न्यायालयाने आज हा निर्णय दिलेला आहे. माझ्या विरोधात ज्यांनी चुकीचे आरोप केले, त्यांच्या बाबतीत नियती बघेलच. मी सर्व निर्मिकावर सोडून देत असतो. ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. मला नाहक त्रास दिला, त्यांचा निर्णय जनतेच्या कोर्टात होईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जळगावात दिली आहे. जळगावात आज ओबीसी आरक्षण हक्क परिषद पार पडत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला धक्का | आ. लक्ष्मण जगतापांचे कट्टर समर्थक अरुण पवार, विष्णू शेळकेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीच पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘गळती’ सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंग जोरात सुरु आहे. आज भाजप पदाधिकारी आणि मराठवाडा जनसंघाचे अध्यक्ष अरुण पवार, भाजप सह्याद्री आदिवासी मंडळाचे विष्णू शेळके, मोशी भाजप युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
4 वर्षांपूर्वी -
अनंत गीतेंचे राष्ट्रवादी संदर्भातील 'ते' वक्तव्य वैफल्याग्रस्तातून | सुनील तटकरेंचे प्रत्यूत्तर
काल शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यांवर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैफल्याग्रस्तातून अनंत गीते यांचे वक्तव्या आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेचा स्वाभिमान मागच्या निवडणूनक गळून पडला असून नैराशेतून त्यांचे हे वक्तव्य आले असल्याचेही तटकरे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश करणार
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. येत्या 16 सप्टेंबरला मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मृत्यू झालेल्या माणसाच्या वारसांना नोकरी, मदत देण्यासाठी किशोर वाघ यांनी लाच घेतली, हे तुम्ही जनतेला सांगा
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक युद्ध आता सुरुच आहे. कालच्या संघर्षानंतर चित्रा वाघ यांनी आज पुन्हा ट्विट करुन महेबूब शेख यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला महेबूब शेख यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. “असल्या 56 चित्रा वाघ आल्या तरी मला फरक पडत नाही आणि असल्या मांजरीला आणि बोक्यांना मी घाबरत नाही”, असा पलटवार महेबूब शेख यांनी केलाय.
4 वर्षांपूर्वी -
वाघ आडनावाने कोणी वाघ होत नाही | डायलॅाग बाजी सोडा, नवऱ्यावर कार्यवाही झाली तेव्हा कुणाच सरकार होत ते सांगा
राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर काल नगरमध्ये बोचरी टीका केली होती. ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, असा चित्रा वाघ यांचा उल्लेख आपल्या भाषणात शेख यांनी केला होता. याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी वाघ आहे वाघ…, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी महेबूब शेख यांच्यावर पलटवार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
रोहिणी खडसेंनी घेतली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट | नेमकं काय कारण?...
माजी महसूलमंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
नगर-पारनेर | आ. निलेश लंके आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष भेटीनंतर राजकीय चर्चा सुरु | लंके काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आ.निलेश लंके यांची मी पारनेर परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी गेलो असता माझ्या सहकाऱ्यां समवेत सदिच्छा भेट घेतली होती. ही भेट राजकीय स्वरूपाची नसून सदिच्छा भेट होती. या भेटीबाबत अनेक राजकीय स्वरूपाची चर्चा समाज माध्यमांमधून आणि इतर व्यासपीठांवरून सुरू आहे. या भेटीचा विपर्यास यातून झाल्याचे दिसते. आ. लंके यांना त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या एवढेच या भेटीत घडले असा खुलासा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अरे? पेट्रोल पण पोहचले की 105, बहुधा आता तिथंच थांबेल ते ही | रोहिणी खडसेंचं खोचक ट्विट
इंधनाचे दर सातत्याने वाढतच असल्याने त्याचा परिणाम थैट दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंच्या किंमतींवरही होताना दिसत आहे. पेट्रोलने शंभरील पार केल्यानंतर देशभरातून मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. मात्र, आता पेट्रोलने चक्क १०५ चा आकडा गाठला आहे. त्यावरुन, रोहिणी खडसेंनी भाजपला लक्ष्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या सोलापुरातील कार्यालयावर दगडफेक | हल्लेखोरांमध्ये काचा फुटतील एवढाही जोर नव्हता?
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर दगडफेक झाली होती. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (1 जुलै) दुपारी दोन युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनवर दगडफेक केली आहे. दोन्ही युवक दगडफेक करून स्वतः फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे हजर झाले. रामलाल चौक (सोलापूर) येथील राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयावर ही दगडफेक करण्यात आली आहे. शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पडळकरांनी बोलताना काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही - आ निलेश लंके
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खालच्या शब्दात केली. ‘रात गेली हिबेशात, पोरगं नाही नशिबात’, अशा शब्दात त्यांनी पवारांवर टीका केली होती. शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी खालच्या दर्जाची भाषा केली होती. तसंच सगळे जण पवारांना मोठा नेता मानत असतील पण मी मानायला तयार नाही, असंही पडळकर म्हणाले होते. पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरल्याने राष्ट्रवादीचे अनेक नेते सध्या पडळकरांचा समाचार घेताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी जोमात | भाजप समर्थक आमदार करणार राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
सध्या सगळे राजकीय पक्ष स्वतः ला सक्षम करत असून आपलं बळ वाढवताना दिसत आहेत. अशात पंढरपूर-मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लावण्यात आली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. परंतु, आता एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असून राष्ट्रवादीचं संख्याबळ पुन्हा वाढलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय ठोकताळा | त्यामुळेच राष्ट्रवादी आणि शिवसेना २०२४ मध्ये एकत्र निवडणुका लढतील? - सविस्तर वृत्त
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनपेक्षितपणे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि अनपेक्षितपणे शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या प्रचारात दिल्लीतील वरिष्ठांनी म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राज्यात प्रचारसभा देखील घेतल्या नव्हत्या. अगदी राहुल गांधी यांनी यांनी निवडक १-२ प्रचार सभा घेतल्या होत्या आणि त्यातही नसीम खान यांच्यासारखे मंत्री पदाचे दावेदार असलेले काँग्रेसचे नेते अगदी मनसेतून फुटून शिवसेनेत दाखल झालेल्या दिलीप लांडे यांच्यासमोर पराभूत झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल - संजय राऊत
एकाबाजूला शिवसेनेच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीबरोबर युती करणार असल्याचं उघड उघड जाहीर केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या युतीचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी
केंद्र सरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश | विदर्भ विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती
प्रसिद्ध गायिका वैशाली माडेनं नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेता अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री धनंजय मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित वैशालीने पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वैशालीचं अभिनंदन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नगर | राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या भाजप कार्यालय भेटींमुळे भाजपमध्ये चिंता
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रीचे आमदार संग्राम जगताप यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बोलावण्याच्या मागच्या आठवड्यात घडलेल्या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. अहमदनगर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमदार जगतापांच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालय भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी देखील त्यामुळे या भेटीची दखल घेऊन शहरातील पक्षाच्या आणि महानगपालिकेतील पदाधिकार्यांना त्याचा जाब विचारल्याचे समजते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON