महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रवादी महिला आक्रमक | पेट्रोल पंपावर मोदींच्या बॅनरखाली राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन करणार
सामान्य जनतेच्या भावनांच्या उद्रेकाला वाट मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने मोदींची जाहिरात असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर उद्या म्हणजेच रविवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता ‘चूल मांडा’ आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज (२७ फेब्रुवारी) याबाबतची माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणाऱ्या मनसेला सार्वजनिक जबाबदारी समजणार नाही - राष्ट्रवादी
राज्यात १ मार्चपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. परंतु, कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, विधीमंडळातील अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीची आ. शिवेंद्रराजेंना थेट ऑफर
साताऱ्यात सध्या नगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पॅनेल उभं करण्यात आलं असून दीपक पवार या निवडणुकीचं नेतृत्व करतील असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत. परंतु यावेळी राष्ट्रवादीकडून शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर ऑफर देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानीचे आमदार लवकरच राष्ट्रवादीत? | थेट राष्ट्रवादीच्या मंचावर उपस्थिती
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीला सुगीचे दिवस आले आहे. राष्ट्रवादीत दररोज इन्कमिंग होत असल्याचे दिसून येत आहे. भाजपमधील अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला निराशेने ग्रासले आहे | त्यांना शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही - जयंत पाटील
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनपेक्षितपणे शिवसेनेच्या नैत्रुत्वात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्र सारखं मोठं राज्य भाजपने गमावलं. पण शिवसेना जर भाजपसोबत नसेल तर भाजपची सत्ता येणं शक्य नसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे शिवसेनेवर तुटून पडणारे भाजपचे मध्येच शिवसेनेबाबत सौम्य भूमिका देखील घेताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर? | राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भेटी-गाठी
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरूच आहे. आता माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांनी भेट घेतली असून, मोहितेंच्या पक्ष प्रवेशावर जोरदार खलबतं सुरू आहेत. विदर्भातील राजकारणात सुबोध मोहिते यांचा चांगलाच दबदबा आहे. विदर्भातील राजकारणात सुबोध मोहिते यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळेच विदर्भात राष्ट्रवादी बळकट करण्यासाठीच मोहितेंना प्रवेश देण्यात येणार असल्याचे बोलले जाते.
4 वर्षांपूर्वी -
र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणार
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 58 वा दिवस आहे. केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांच्या अनेकदा बैठका झाल्या. मात्र, अद्यापही हवा तसा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शिरुन ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी पक्षविस्ताराच्या तयारीला | प्रदेशाध्यक्षांचा १७ दिवसांचा ‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा’
ग्रामपंचायत निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस लगेचच पक्षविस्ताराच्या तयारीला लागला आहे. राज्यात लवकरच महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तसेच राज्यात सत्ता असल्याने राष्ट्रवादीने २०२४ च्या अनुषंगाने देखील पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित केलं आहे आणि त्यानिमित्ताने पुढचा कार्यक्रम आखला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये या पोटनिवडणुकीत 100 कोटी रुपये खर्च करू | फडणवीसांनी ऑफर दिलेली - आ. शशिकांत शिंदे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना भारतीय जनता पक्षाकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माझाही समावेश होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
मीरा भाईंदर महापालिका | राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु
मीरा भाईंदर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मीरा भाईंदरच्या माजी महापौर, माजी विरोधीपक्ष नेते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा घड्याळ हाती बांधले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षातील नेते-कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच पुनर्प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातची सत्ता किती काळ भाजपकडे | मग अहमदाबादच नाव का बदललं नाही? - आ. अमोल मिटकरी
महाराष्ट्रात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षादरम्यान आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भारतीय जनता पक्षाने या मुद्यावरून शिवसेनेला विशेष लक्ष केलं आहे. मात्र आता भाजपाला देखील याच मुद्यावरून कोंडीत पकडण्यास महाविकास आघडीतील नेत्यांकडून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भारतीय जनता पक्षावर प्रहार केला आहे. शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, अशी टीका मिटकरींनी भारतीय जनता पक्षावर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
इनकमिंग सुरूच | सोलापुरात एमआयएमचे ६ नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर
विधानसभा निवणुकीनंतर राज्यात पवारांच्या करिष्म्याने महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनंतरच्या यशानंतर इतर पक्षातील नेते मंडळी राष्ट्रवादीत भविष्यकाळ शोधू लागले आहेत असंच म्हणावं लागेल. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | नवी मुंबईतील भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत
नवी मुंबईत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीने देखील भारतीय जनता पक्षाला जोरदार राजकीय धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेसह माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. भाभारतीय जनता पक्ष जप नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
हाथरस प्रकरणात तुमचे तोंड शिवले होते का रे? | हिरव्या देठाची भाषा महाराष्ट्र विसरला नाही
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदीजी, लौटा दो हमारे बुरे दिन | महिला महागाईला कंटाळल्या
मागील दोन महिन्यांपासून वारंवार सुरू असलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. दरवाढीच्या निषेधार्थ सांगली येथे महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
भगीरथ भालकेंचा विचार व्हावा असं गटाचं मत | तर दुसरा गट पार्थ पवारांसाठी आग्रही
माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी पंढरपूरचा रखडलेला विकास साधायचा असेल तर पार्थ पवार यांना उमेदवार द्या, अशी मागणी केली आहे. तसं पत्रच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. असं असलं तरी पंढरपुरातील तरुण मंडळींमध्ये मात्र पार्थ यांना उमेदवारी देण्याबाबत विरोध असल्याचं सांगितलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
रुपाली चाकणकरांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी | धमकी देणाऱ्याचं नाव सांगली संबंधित...
एखाद्या गोष्टीत किंवा घटनेत किती योगायोग घडून येऊ शकतो याच एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे. कारण धमकी प्रकरण रुपाली चाकणकर यांच्या संबंधित असलं तरी धमकी सांगलीतून आणि जयंत पाटील नावाच्या व्यक्तीकडून येणं हा निव्वळ योगायोग म्हणता येईल. पण अर्थात त्याचा कोणताही संबंध जलसंपदा मंत्री जयंत पाटील याच्याशी नाही.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन सुरूच | भाजपला कंटाळून प्रकाश काळे राष्ट्रवादीत
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील धक्क्यानंतर भाजपाला अजूनही धक्के लागतंच आहेत. भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा जणू सपाटाच लागला आहे. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुदामराव काळे यांचे चुलत बंधू भारतीय जनता पक्षाचे माजी देहूरोड शहर उपाध्यक्ष प्रकाश काळे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह पुन्हा राष्ट्रवादी पक्षात परतत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पडळकर कोणाचे चमचे | धनगर समाजासाठी आरक्षण न घेताच ते भाजपकडून आमदार झाले - मुश्रीफ
सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख केला. त्यानंतर आता पडळकरांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पडळकर यांनी राऊतांना थेट पत्रच लिहिलं आहे. त्यात तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? असा प्रश्न विचारत अनेक मुद्द्यांवर राऊतांची कोंडी करण्याचा प्रयत्न पडळकरांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल भारतीय जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेतला होता. पदवीधर लोकांनी पराभव केला हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना खूपच झोंबलं आहे, असं म्हणत अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला होता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON