महत्वाच्या बातम्या
-
जनता महागाईवरून संतप्त | तर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन सरकारी रेशन दुकानावर मोदींचा फोटो का नाही यासाठी संतप्त
Modi Photo Not on The Government Ration Shop | तेलंगणातील सरकारी रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील पीडीएसच्या एका आउटलेटला शुक्रवारी भेट देणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांनी पीडीएसच्या माध्यमातून वितरित केलेल्या प्रति किलो तांदळाच्या किंमतीचा तपशील मागितला होता.
7 महिन्यांपूर्वी -
हायवे, रेल्वेसह तब्बल 13 सरकारी मालमत्तांतील हिस्सेदारी याच वर्षी खासगी कंपन्यांच्या हाती
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी नॅशनल मोनेटायझेेशन पाइपलाइन (एनएमपी) लाँच केली. याअंतर्गत विविध क्षेत्रांतील सरकारी मालमत्तांतील भागीदारी विकून किंवा सपत्ती लीजवर देऊन एकूण ६ लाख कोटी रु. जमवण्याचे लक्ष्य आहे. अर्थ मंत्रालयाने सोमवारी त्याचा पूर्ण आराखडा सादर करत म्हटले की, लीजवर देण्याची प्रक्रिया चार वर्षे म्हणजे २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने चालेल. अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, जे रस्ते, रेल्वेस्टेशन किंवा एअरपोर्ट लीजवर दिले जातील त्यांचे मालकी हक्क सरकारकडे असतील.
2 वर्षांपूर्वी -
आता बँक दिवाळखोरीत निघाल्यास ठेवीदारांना ९० दिवसात मिळणार पैसे - केंद्र सरकार
केंद्र सरकारने बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवी विमा आणि पत हमी निगम कायद्यातील सुधारणांना मान्यता देण्यात आलीय. याद्वारे खातेधारकांना बँकेच्या विम्यात 90 दिवसांच्या आत पैसे मिळू शकतील.
2 वर्षांपूर्वी -
आधीचं स्वावलंबी भारताचं २० लाख कोटींचं पॅकेज संशोधनाचा विषय | आता १ लाख १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर
कोरोना संकटादरम्यान मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ मे २०२० रोजी देशाला संबोधित केलं होतं. या संबोधनात त्यांनी देशासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. हे पॅकेज ‘स्वावलंबी भारता’चं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेलं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज देशाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक पॅकेज ठरलं होतं. विशेष आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारत अभियानासाठी महत्त्वाचं ठरेल. स्वावलंबी भारताला एक नवी गती देणारं हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं.
2 वर्षांपूर्वी -
Digital India | आयकर विभागाची नवी वेबसाईट पाहिल्या दिवशीच क्रॅश | सीतारामन इन्फोसिसवर संतापल्या
इन्कमटॅक्स विभागाची नवी वेबसाईट मोठा गाजावाजा करून आणि सहा दिवस सर्व्हर बंद ठेवून आयकर विभागाची नवीन वेबसाईट सोमवारी रात्री लाँच करण्यात आली. मात्र, करदात्यांनी ही वेबसाईट क्रॅश होत असल्याचे फोटो ट्विटरवर टाकल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरून इन्फोसिस आणि कंपनीचे सह संस्थापक अध्यक्ष नंदन निलेकनींना चांगलेच झापले आहे.
2 वर्षांपूर्वी -
कोरोना त्सुनामीत मोदी सरकार हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | लोकांचे मृत्यू त्यांच्यासाठी केवळ आकडे - केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.
2 वर्षांपूर्वी -
गलती से मिस्टेक! | PPF व्याजदर संदर्भातील आदेश चुकून निघाला - अर्थमंत्री
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. बचत योजनांवर जे व्याज आहे ते जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बचत योजनांवरील व्याज दर कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. नजरचुकीमुळे व्याजदर कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण केंद्राकडून देण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
इंधन दर कधी कमी होणार ते मला सांगता येणार नाही | हे धर्मसंकट आहे - अर्थमंत्री
देशात गेल्या दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. अशात महागाईचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत पेट्रोलची वाटचाल शतकाकडे चालली आहे. त्यामुळे ही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.34 रुपये आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 88.44 पैसे इतका आहे.
2 वर्षांपूर्वी -
दिवाळी अगोदरच अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाच्या घोषणा
दिवाळीपूर्वीच (Diwali 2020) नरेंद्र मोदी सरकारकडून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. देशाच्या मागणीत वाढ होण्यासाठी तसंच छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी काही महत्त्वाच्या तरतुदींचा यात समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी -
...ती ऍक्ट ऑफ मास्टर ऍक्टर | अर्थमंत्र्यांच्या टिपणीवर समाज माध्यमांवर हास्य जत्रा
करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे गुरुवारी जणू कबूल केले. मात्र या बैठकीमध्ये निर्मला यांनी ‘देवाची करणी’ म्हणजेच Act of God चा उल्लेख केल्यानंतर गुगलपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत यासंदर्भातील सर्चचे प्रमाण वाढल्याचे दिसले. ट्विटर आणि फेसबुकवरही याचसंदर्भातील चर्चा सुरु होत्या.
3 वर्षांपूर्वी -
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ...जाणून घ्या तारीख
आयकर परतावे (ITR) भरण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाचा परतवा भरता येणार असल्याने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक खासगी कंपन्यांचे फॉर्म १६ अजूनही तयार नसल्याने परताव्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आयकर विभागाने आधीची ३१ ऑक्टोबरची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
ग्रामीण क्षेत्रात रोजगारवाढीसाठी केंद्राकडून गरीब कल्याण रोजगार योजना
ग्रामीण क्षेत्रात रोजगारवाढीसाठी केंद्र सरकारकडून गरीब कल्याण रोजगार योजना आखली गेली आहे. या योजनेविषयी आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत चर्चा केली. या योजनेचं उद्घाटन २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
मजुर आणि शेतकऱ्यांसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ९ मोठ्या घोषणा
देशातल्या प्रत्येक राज्यात वन-नेशन वन रेशन कार्ड योजना लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातली घोषणा केली. या योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही योजना लागू झाल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्ड धारकाला देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेण्याची मुभा असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ - केंद्रीय अर्थमंत्री
इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही घोषणा आहे. करोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे जी स्थिती निर्माण झाली आहे त्यातून दिलासा देण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं.
3 वर्षांपूर्वी -
MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचं कर्ज - निर्मला सीतारामन
स्क्षूम, लघु, मध्यम कुटीर उद्योगांसाठी तीन लाख कोटीचे कर्ज देण्यात येईल. त्यासाठी कुठल्याही गॅरटीची आवश्यकता नाही. ४५ लाख MSME उद्योगांना याचा फायदा होईल. एक वर्ष कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नाही.
3 वर्षांपूर्वी -
कागमार-गरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचं पॅकेज; अर्थमंत्र्यांची घोषणा
देशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशभरात आतापर्यंत ६०६ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे, तर या आजारात ११ जणांचा बळी गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात १२२ इतकी आहे.
3 वर्षांपूर्वी -
आयटी रिटर्न भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढ: अर्थमंत्री सीतारामन
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना व्हायरसच्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली आहे. या महासाथीच्या संकटामुळे जगभरावर आर्थिक संकट ओढवलं आहे. भारतातही अनेक उद्योगांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूरही या वेळी उपस्थित होते.
3 वर्षांपूर्वी -
तुम्ही माझा अंत पाहू नका, SBI अध्यक्षांवर सीतारामन संतापल्या
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेचे बिरुद मिरवणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) कारभार निर्दयी आणि अकार्यक्षम असल्याचे खडे बोल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेच्या उच्चपदस्थांना सुनावले. २७ फेब्रुवारी रोजी गुवाहाटीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान निर्मला सीतारामन यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या भाषणाची ऑडिओ क्लीप आता समोर आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
YES बँकेला स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारकडून SBI'चा पर्याय
पीएमसी बँकेनंतर डबघाईला गेलेल्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने गुरुवारी निर्बंध आणले. आता या बँकेला पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन येस बँकेच्या खातेदारांना दिलासा दिला. सर्व खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही सितारामन यांनी दिली. अशातच रिझर्व्ह बँकेनेहे येस बँकेच्या फेररचनेची घोषणा केली. नवी योजना येस बँक आणि एसबीआयला पाठवली आहे. त्यावर त्यांचे मत मागवले आहे, असं रिझर्व्ह बँकेने म्हटलंय.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीस यांची थेट केंद्रीय अर्थमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता - सविस्तर वृत्त
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्रीपदाची जबाबदारी द्यावी, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असून, याबाबत दिल्लीत एक बैठक झाल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. त्यात राज्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून येण्याच्या शक्यतेने भाजपच्या वरिष्ठांनी हे पाऊल उचलून अनेक गोष्टी म्यान केल्याचे समजते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत
-
Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल
-
Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Adani Group Shares | संकटकाळ पैशाची चणचण तेजीत! अदानी ग्रुपने 34 हजार 900 कोटींचा प्रकल्प बंद केला