महत्वाच्या बातम्या
-
कोकण: हायवेच्या कामांची पोलखोल, गडकरी कंत्राटदारांना बुलडोझर खाली चिरडनार का?
पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चौपदरीकरण कामांची चांगलीच पोलखोल केली आहे. महामार्गालगत ठिकठिकाणी मातीचा भराव वाहून गेला आहे. तरअनेक ठिकाणी पर्यायी रस्ता खचला आहे. महामार्गालगतच्या घरांमध्येही पाणी गेले आहे. आज कणकवली शहर आणि वागदे परिसरात असलेल्या या रस्त्यामध्ये अनेक वाहने अडकली होती. बस स्थानक परिसरात रस्ता खचल्याने एसटी महामंडळाची बस देखील अडकून पडली होती.
6 महिन्यांपूर्वी -
नागपूर लोकसभा: नितीन गडकरी विजयी; काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दारुण पराभव
लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांना अगदी सहज झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी घेणारे नितीन गडकरी आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
7 महिन्यांपूर्वी -
पंतप्रधानपदात मला रस नाही, मोदीच पुन्हा यापदी विराजमान होतील : गडकरी
पंतप्रधानपदात मला अजिबात रस नाही, त्यामुळे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीच या पदाचे उमेदवार आहेत आणि यंदाही तेच पंतप्रधान होतील, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. काल भोपाळ येथे एका प्रचार कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी ते बोलत होते.
7 महिन्यांपूर्वी -
भाजपानं २२०-२३० जागा जिंकल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत: सुब्रमण्यम स्वामी
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठं भाकीत केलं आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत २२०-२३० जागा जिंकल्यास नरेंद्र मोदी कदाचित पुढचे पंतप्रधान होणार नाहीत, असं सूचक विधान भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सध्याचं भाजपच्या नैत्रुत्वतही बदल केले जातील, असा थेट दावाही स्वामींनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी पराभूत होणार: प्रकाश आंबेडकर
नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणारे नितीन गडकरी यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा कमीत कमी ३ लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी दोनशे कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाहीत, असा थेट दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
पर्रिकर यांना मुखअग्नी मिळण्यापूर्वीच भाजपच्या रात्रभर नितीन गडकरींच्या उपस्थितीत बैठका
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारसमोर पुन्हा एकदा राज्यातील सत्ता टिकवून ठेवण्याचं राजकीय संकट उभं राहिलं आहे. पर्रिकरांच्या जागेवर नवीन नेता निवडण्याचं आव्हान भाजसमोर निर्माण झालं आहे. कारण काँग्रेस पक्षानं राज्यपालांना पत्राद्वारे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात जोरदार राजकीय हालचाली
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकीकडे काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी दावा करण्याची तयारी सुरु केली असतानाच भाजपानेही मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
गडकरी कटकारस्थानी स्वभावाचे नाहीत, काही असतं तर सर्वात आधी मला सांगतील
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विधानांवर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘नितीन गडकरींचा स्वभाव अतिशय सौम्य आहे. कटकारस्थान करणं हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव नाही. त्यांच्या मनात जर एखादी इच्छा असेल, तर ते सर्वात आधी मला सांगतील,’ असं भागवत म्हणाले.
10 महिन्यांपूर्वी -
राहुल गांधीनी गडकरींना नम्रपणे विचारलं, 'नितीनजी तो बेरोजगारीचा उल्लेख राहून गेला'
काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एकटेच धाडसी नेते आहेत’, असे म्हणून त्यांची उपरोधिकपणे कौतुक केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी आणि राहुल गांधी यांच्यादरम्यान सोमवारी टिष्ट्वटरवरून कलगीतुरा रंगला.
10 महिन्यांपूर्वी -
भाजपने घोषणेतून 'मोदी सरकार' शब्द हटवले? नवी घोषणा ‘अबकी बार ४०० के पार’?
भाजप’ने २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी २०१४ मधील घोषणेत बदल केल्याचे वृत्त आहे. २०१४ मधील ‘अबकी बार मोदी सरकार’ मधील ‘मोदी सरकार‘शब्द वगळून “अबकी बार ४०० के पार” अशी नवी घोषणा देण्याची योजना असल्याचे समजते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. तत्पूर्वी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत एनडीएने तब्बल ३३६ जागांवर विजय प्राप्त केला होता. त्यावेळी एकट्या भाजपाने २८२ जागांवर विजय प्राप्त केला होता.
11 महिन्यांपूर्वी -
लोकांना केवळ स्वप्नं दाखवणारा नेता चांगला वाटतो!....गडकरींचा हा टोला कोणाला?
मागे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या रोखठोक वक्तव्यातून भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये हेतु पुरस्कर जाहीर खोटी आश्वासने सामान्यांना दिल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले होते. कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष देशात सत्तेवर येणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री होती. त्यामुळेच विचाराअंती आम्हाला जाहीर खोटी आणि मोठमोठी आश्वासने देण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु, आता जेव्हा कधी आम्ही देशात सत्तेत आलो आहोत, तर सामान्य जनता आम्हाला दिलेल्या खोट्या आश्वासनांची बरोबर आठवण करून देत आहेत. परंतु, आम्ही केवळ त्यांना एक स्मित हास्य देतो आणि पुढे चालत राहतो, असे त्यांनी जाहीरपणे एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांच्यवर पुन्हा स्वतःच्या वक्तव्यावर खुलासा करण्याची वेळ आली होती.
11 महिन्यांपूर्वी -
तर...पंतप्रधानपदासाठी शिवसेना गडकरींना पाठिंबा देईल
लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण कठीण होणार आहे. अशा राजकीय पेच निर्माण करणाऱ्या परिस्थितीत जर पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींचं यांचं नाव पुढे आल्यास शिवसेना त्यांना जाहीर पाठिंबा देईल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हणाले.
11 महिन्यांपूर्वी -
राजकारण्यांनी कोणत्याही सांस्कृतिक संस्थामध्ये हस्तक्षेप करू नये : गडकरी
आधीच ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण नंतर रद्द केल्यामुळे वादात अडकलेल्या यवतमाळ येथील ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी सायंकाळी समारोप झाला. दरम्यान, उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समारोपाच्या भाषणात राज्य सरकारचे चांगलेच खडे बोल सुनावले आणि राजकारण्यांना दोन मोलाचे सल्ले दिले.
11 महिन्यांपूर्वी -
२०१९ मध्ये कोण पंतप्रधान असेल ते सांगता येत नाही : रामदेव बाबा
योगगुरु रामदेव बाबा यांनी प्रसार माध्यमांसमोर केलेल्या एका वक्तव्याने आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच खळबळ माजली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नक्की पुढील पंतप्रधान कोण होतील असा प्रश्न बाबा रामदेव यांना विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर सर्वच आश्चर्य चकीत झाले आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
मला नेहरुंचं ‘ते’ भाषण खूप आवडतं : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नितिन गडकरी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणाचा दाखला देत, त्यातून मांडण्यात आलेल्या विचाराचे प्रामाणिकपणे कौतुक केले आहे. एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
एकवेळ हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होत नाहीत: गडकरींचं विधान
सध्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार अशी चर्चा रंगली असताना गडकरी मात्र रोज नवनवीन विधानं करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू मांडली आणि अडचणी मांडल्या होत्या. परंतु प्रसार माध्यमांनी टीका करताच पुन्हा घुमजाव केले होते. त्यात आता पुन्हा त्यांनी सांगली येथील कार्यक्रमात धक्कादायक वक्तव्य केले आहे.
12 महिन्यांपूर्वी -
त्या सिनेमाचं उदाहरण देत म्हणाले, आमच्या उत्साही वाचाळवीरांच्या तोंडात कापडाचा गोळा भरण्याची गरज
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही वाचाळवीर नेत्यांना डोस दिला आहे. प्रसार माध्यमांकडे पुढे पुढे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मुळात कमी बोलण्याची नितांत गरज आहे, असं विधान गडकरींनी केलं आहे. नितीन गडकरी एका मीडियाच्या कार्यक्रमात संबोधीत करत होते. दरम्यान, याचवेळी त्यांनी राफेल लढाऊ विमानांच्या डील प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून घेण्यात आलेल्या तब्बल ७० पत्रकार परिषदेवर नितीन गडकरी यांनी प्रथमच भाष्य केलं आहे.
12 महिन्यांपूर्वी -
गडकरींकडून विजय मल्ल्याची पाठराखण, म्हणाले 'तो घोटाळेबाज कसा'?
विजय मल्ल्याचे लंडनमधून भारतात प्रत्यार्पण होण्याआधीच त्याला सज्जन असल्याचा दाखल देण्यास भाजपकडून सुरुवात. कारण खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून आणि देशातून पलायन कडून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मल्ल्याची पाठराखण केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ, राज्यपालांनी सावरले
राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरींना भोवळ आल्याचे समजते. परंतु, बाजूला उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले. दरम्यान, गडकरी यांना ताबडतोब इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
1 वर्षांपूर्वी -
झोपडपट्टीतील लोक सोबत असतात, तेव्हा जिंकण्याची खात्री....पण बुद्धिवादी लोकं?
झोपडपट्यांमध्ये राहणारी लोकं सोबत असतात, त्यामुळे जिंकण्याची निश्चित खात्री असते. पण बुद्धिवादी लोकं सोबत असली तर मात्र जिंकण्याची खात्री नसते असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले. हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दी आयडिया ऑफ न्यू इंडिया’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दरम्यान, या कार्यक्रमाला उद्योजक श्रीराम दांडेकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. भारतकुमार राऊत, शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह सुरेश देवळे, हिंदू नववर्ष स्वागत समितीचे कार्याध्यक्ष भूषण मर्दे, उपाध्यक्ष वीरभद्र दुलानी, कार्यवाह रमेश देवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
गुजरात - रोड सेफ्टीच्या नावाने दांडिया करून झाल्यावर शहरांमध्ये हेल्मेट सक्ती हटवली
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर उसळला
-
VIDEO - खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिका न आल्याने गर्भवतीला खांद्यावरून रुग्णालयात आणलं
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार: मुख्यमंत्री
-
आज महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव
-
भिवंडी महापालिकेत काँग्रेसला बाजूला करत 'कोणार्क विकास आघाडीचा' महापौर
-
मेट्रो डान्स द जंगल! स्पॅनिश मीडियाकडून 'आरे बचाव आंदोलनाची' दखल
-
INX Media: पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
-
राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर ५ नराधमांकडून सामूहिक बलात्कार
-
मराठा आरक्षणातील आंदोलकांवरील गुन्हे देखील सरकारने मागे घ्यावे: आ. धनंजय मुंडे