महत्वाच्या बातम्या
-
राज ठाकरे यांचा 4 मार्चला नाशिकच्या दौरा | पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी म्हणजे 4 तारखेला नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या दारूर्यंत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ आणि निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे, इतर पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्याला भेटण्यासाठी गर्दी करु नये, असे विनंती राज ठाकरे यांनी केल्याचे कळते.
4 वर्षांपूर्वी -
मंत्री गर्दी करून धुडघूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला नकार - राज ठाकरे
राज्य सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मनसेचे (MNS) नेते आक्रमक झाले आहेत. आम्ही मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम (Marathi Bhasha Din) योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, असा खोचक टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला.
4 वर्षांपूर्वी -
मराठी राजभाषा दिन | राज ठाकरे यांचं महाराष्ट्राला विनम्र आवाहन करणारं पत्र
विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. हेच औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला विशेष आवाहन करणारं पत्र लिहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक | भाजपला मदत करत किंगमेकर मनसे महाविकास आघाडीचा मार्ग अवघड करणार?
नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा मनसे साथ देणार आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षाला मदत करणार आहे. सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक स्थायी समिती निवडणूक | मनसे किंगमेकरच्या भमिकेत
नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सर्वच 16 सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. हायकोर्टाच्या आदेशाची महापौरांकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्थायी समितीची निवडणूक रंगतदार होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मला वाटतं आपल्या शॅडो मंत्रिमंडळातील गृहमंत्र्यांकडून याची चौकशी करावी - रुपाली चाकणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत शंका घेत जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवू नका, असा इशारा राज्य सरकारला दिला. त्यावरुन राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मनसेची खिल्ली उडवली.
4 वर्षांपूर्वी -
राज भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली | सर्वपक्षीय नेत्यांकडून आभार व्यक्त
जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी तेथील नागरीकांच्या वतीनं करण्यात आली होती. गेली 15 वर्ष हा टोलनाका बंद व्हावा म्हणून स्थानिक मागणी करत आहेत. परंतु हे कंत्राट अकरा वर्षासाठी असल्याने ते मागे घेता येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. याच विषयावरुन पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज येथे गेले होते.
4 वर्षांपूर्वी -
राहती घर खाली करण्यासाठी पोलिस कुटुंबियांवर वरिष्ठांचा दबाव | राज ठाकरेंकडे मांडली कैफियत
जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी तेथील नागरीकांच्या वतीनं करण्यात आली होती. गेली 15 वर्ष हा टोलनाका बंद व्हावा म्हणून स्थानिक मागणी करत आहेत. परंतु हे कंत्राट अकरा वर्षासाठी असल्याने ते मागे घेता येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. याच विषयावरुन पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी काल कृष्णकुंज येथे गेले होते. त्यानंतर आज मुंबई पोलीस कुटुंबीयांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्थानिकांना रोजगार द्या | मनसेकडून गाड्या, जेसीबी, सीसीटीव्हीची तोडफोड
सरकारी कोळसा कंपनी WCL अंतर्गत काम करणाऱ्या GRN कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात राज ठाकरे याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (17 फेब्रुवारी) तोडफोड केली. स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याच्या मुद्द्यावरून हा राडा घालण्यात आला .
4 वर्षांपूर्वी -
अयोध्या राम मंदिर निर्माण | निधी संकलन करण्यासाठी RSS पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी भेट घेतली. राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी ही भेट झाली. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी संकलन करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण-डोंबिवली | शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात मोर्चा
ज्या विषयांना पुढे करून मोदी सरकार सत्तेत आलं त्याच विषयांवर ते आज डोळेझाक करताना दिसत आहेत. त्यातील महत्वाचा विषय म्हणजे पेट्रोल-डिझेल ज्यामुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे. याच विषयाला अनुसरून कल्याणमध्ये मनोज घरत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थिती नोंदवली होती. यावेळी मनसेने सज्जड दम देताना म्हटलं की, इंधन दरवाढ कमी करा हे आता हात जोडून सांगतोय. हात उगारायची वेळ आणू नका असा इशारा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या २७ गावांच्या विकासासाठी विशेष पॅकेज द्या | आ. राजू पाटील यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. 27 गावांसाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात यावी, अशी आग्रहाची विनंती आमदार राजू पाटलांनी बोलून दाखवली होती. त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या दिवा शिळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी, अशीही मागणी यापूर्वी राजू पाटील यांनी अजित पवारांकडे केली होती.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला मनसेसोबत युतीची आशा? | भाजपकडून पुन्हा त्याच मुद्यावर भाष्य
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने स्वबळाची भूमिका घेतली आहे आणि त्यानुसार पक्ष विस्तार सुरु केला आहे. विशेष म्हणजे आज पर्यंत मराठी माणूस केंद्रस्थानी असणाऱ्या मनसेमध्ये इतर पक्षातील उत्तर भारतीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश केल्यानंतर समाज माध्यमांवर मोठी चर्चा रंगल्याच पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
नाशिकमधील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश
काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला होता. विशेष म्हणजे भाजप आमदार राम कदम यांना सर्वात मोठा धक्का देण्यात आला. भाजपचे स्थानिक नेते सुनील यादव यांच्यासोबत आमदार राम कदम यांच्या समर्थकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. तसेच मुंबईतील चांदिवली विधानसभेतील भाजप कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर मनसेचा झेंडा हाती घेतला.
4 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेत जाहीर प्रवेश | राम कदमांचे शेकडो कार्यकर्तेही मनसेत
कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या गळतीनंतर आता पुन्हा चित्र पालटू लागलं आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार राम कदम यांना सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे. भाजपचे स्थानिक नेते सुनील यादव यांच्यासोबत आमदार राम कदम यांच्या समर्थकांनी मनसेतजाहीर प्रवेश केला. तसेच मुंबईतील चांदिवली विधानसभेतील भाजप कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर मनसेचा झेंडा हाती घेतला.
4 वर्षांपूर्वी -
समुद्राचं पाणी गोड करायचं आहे की स्वतःचं उखळ पांढर करायचं आहे? | मनसेचा सवाल
मुंबईकरांना आता गोड पाण्याचा आनंद लुटता येणार आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. समुद्रातील २०० दशलक्ष लिटर पाणी गोड करण्याच्या प्रकल्पासाठी तब्बल १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पासाठी आग्रही असून, एक लीटर पाणी गोड करण्यासाठी चार युनिट वीज खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण डोंबिवली | मनसे अध्यक्षांकडून पक्ष बांधणी | तिघांची प्रभारी म्हणून नियुक्ती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील गटनेते मंदार हळबे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्ष बांधणीला आता सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरेंनी यांनी वैयक्तिक चर्चा केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गळती रोखण्यासाठी माजी आमदार नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या नेत्यांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना सरकार असताना संभाजीनगर का केलं नाही? - राज ठाकरे
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. भाजप आणि मनसेनं आक्रमक पवित्रा घेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. जेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा का नामकरण केलं नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवार म्हणाले वीज कंपन्यांच्या नावानं मला पत्र लिहा | नंतर कळलं की अदानी पवारांच्या घरी येऊन गेले
त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी यांच्यात झालेल्या बैठकीचा संदर्भ देत गौप्यस्फोट केला आहे. “वीज बिलाबद्दल पहिलं आंदोलन आमच्या पक्षानं केलं. भाजपा काय पुढे येतंय. या सगळ्या ठिकाणी आमच्या पोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. खास करून नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे की, त्यांच्यासाठी रस्त्यावर कोण उतरलं. वीज कंपन्यांकडून जी बिलं येताहेत, ती प्रत्येकाला येत आहे. लॉकडाउनमध्ये तुम्हाला त्रास झाला. तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही म्हणून नागरिकांना पिळणार असाल, तर कसं होईल. सरकारमधील मंत्री म्हणाले होते, कपात करून. नंतर एकदम घुमजाव झालं,” असं राज ठाकरे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
चीनच्या वा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही - राज ठाकरे
दरम्यान, याच शेतकरी आंदोलनावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्याचं मत व्यक्त केलं आहे. टिकरी, सिंघू आणि गाझीपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाकेबंदी केंद्र सरकारनं केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला सुनावलं आहे. मोदी सरकारने आणलेलय नव्या कृषी कायद्यांपेक्षा या कायद्यातील तरतुदी चुकीच्या असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे. तसेच या कायद्याचा फायदा काही मोजक्या लोकांना होऊ नये असं देखील म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON