महत्वाच्या बातम्या
-
Unemployment In India | आरएसएसने देखील मान्य केले | देशात बेरोजगारीचे संकट वाढले आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहसा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करतो, परंतु रोजगाराच्या मुद्द्यावर ठराव संमत करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. अहमदाबादमध्ये तीन दिवस चाललेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर ठराव मंजूर (Unemployment In India) करण्यात आला. यामध्ये सरकार आणि समाजाला असे आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी मिळून असे आर्थिक मॉडेल तयार करावे जेणेकरून रोजगार निर्माण होऊ शकतील. आरएसएसच्या प्रस्तावात म्हटले होते की, कोरोनानंतर बदललेल्या परिस्थितीत रोजगाराची निर्मिती वेगाने होणे अधिक महत्त्वाचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
भारतातील हिंदु, मुस्लिमांचे पूर्वज एकच | मोहन भागवत यांचं वक्तव्य
हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि प्रत्येक भारतीय नागरिक हा ‘हिंदू’ आहे’, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले. ते ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी’ या कार्यक्रमात बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
आरएसएस संबंधित मासिकाचा इन्फोसिसवर निशाणा | थेट अँटीनॅशनल ताकदींशी संबंधित कंपनी म्हटले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (RSS) शी संबंधित मासिक पाञ्चजन्यने आपल्या नवीन आवृत्तीत देशातील मोठी आयटी कंपनी इन्फोसिसवर गंभीर आरोप केले आहेत. मासिकाने म्हटले आहे की इन्फोसिस देशविरोधी शक्तींशी संबंधित आहे आणि नक्षलवादी, डावे आणि तुकडे तुकडे गँगचा सहयोगी आहे. मासिकाने असेही म्हटले आहे की, इन्फोसिस जाणूनबुजून भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट - जावेद अख्तर
प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अख्तर म्हणाले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील.
3 वर्षांपूर्वी -
1930 पासून मुस्लिमांची लोकसंख्या वाढली | कारण भारताला पाकिस्तान बनवायचे होते - मोहन भागवत
दोन दिवसांच्या आसाम दौर्यावर आलेले आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी आता मुस्लिम आणि पाकिस्तानविषयी नवीन विधान केले आहे. संघ प्रमुख म्हणाले की, 1930 पासून भारतातील मुस्लिमांची संख्या नियोजित पद्धतीने वाढवण्यात आली. ते म्हणाले होते की बंगाल, आसाम आणि सिंध यांनाही पाकिस्तान बनवण्याची योजना होती. ही योजना पूर्णपणे यशस्वी झाली नाही, परंतु फाळणीनंतर पाकिस्तानची स्थापना झाली.
4 वर्षांपूर्वी -
RSS'चे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी राम मंदिर प्रोजेक्टचे केअरटेकर | यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी RSS सतर्क
अलीकडेच आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी असा आरोप केला होता की, मंदिर बांधकामासाठी ट्रस्टने 2 कोटी रुपयांची जमीन 18 कोटींपेक्षा जास्त रुपये देऊन खरेदी केली आहे. याशिवाय इतरही अनेक भूखंड खरेदीमध्ये अनियमिततेचे आरोप इतर काही लोकांनीही केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे हिंदुंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली | सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं - संजय राऊत
अयोध्येत राममंदिराची उभारणी करत असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ‘आप’ नेते संजय सिंह आणि सपाचे नेते पवन पांडेय यांनी केला आहे. पाच मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटीत विकली गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली, असा आरोप करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिग्विजय सिंह यांचं भाजपला प्रतिउत्तर | पाकिस्तान हा भाऊ असल्याचे RSS'चे ते जुने विधान केले शेअर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह हे क्लब चॅटवरील ऑडियो संभाषणामुळे भारतीय जनता पक्षाच्या निशाण्यावर आले होते. त्यांनी या ऑडियो संभाषणात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर कलम 370 परत लागू करणार असल्याचे म्हटले होते. यावरुन भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर चांगलीच टिकेची झोड उठवली होती. दरम्यान, त्यांनी समाज माध्यमांवर आरएसएसचे 6 वर्ष जूने एक विधान शेअर करत भारतीय जनता पक्षावर पलटवार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
संघाला कोरोनापेक्षा मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता अधिक | सचिन सावंत यांचं टीकास्त्र
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांचा मृत्यू झाला असून आजही प्रतिदिन ३ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होतोय. त्यात भाजपची सत्ता असलेल्या काही राज्यातील भीषण वास्तव समोर आल्याने जगभरातून मोदी सरकारवर टीका झाली आहे. मात्र यामध्ये मोदी आणि गंगा नदीवरील कोरोना मृतांच्या तांडवामुळे भाजपच्या हिंदुत्वाची देखील पोलखोल झाली आहे. परिणामी भाजप सहित आरएसएसची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आणि शेतकरी आंदोलनामुळे संघ भाजपासाठी चिंतेत | मोहन भागवतांसह RSS'च्या मोठ्या नेत्यांची बैठक
कोरोना महामारी, शेतकरी आंदोलन, महागाई यासारख्या अनेक मुद्यांवरुन मोदी सरकार सध्या बॅकफूटवर येताना दिसत आहे. त्यामुळे मोदी सरकारची विश्वासार्हतादेखील कमी होत आहे. त्यासोबतच विरोधी पक्षांकडूनही सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. पार्श्वभूमीवर भाजपची मदर विंग असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ | सत्ता जाण्याच्या भीतीने सरसंघचालक आत्तापासूनच स्वतः राजकीय बैठकांच्या मैदानात
कोरोना आपत्तीत योगी सरकारवर जनतेचा संताप वाढला असून हिंदुत्वाच्या राजकारणालाही फटका बसला आहे. तसेच मोदींसहित सर्वांनाच याचा फटका बसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे योगीच्या भरोसे निवडणूक लढविण्यात काहीच अर्थ नाही हे आरएसएसला देखील समजल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश हातून गेला तर देश देखील जाणार हे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना देखील माहिती आहे. परिणामी संघ तसेच मोदी-शहा तिसरी लाट सोडून भाजप विरोधी लाट थोपविण्याच्या कामाला लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सरसंघचालक मोहन भागवत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह | रुग्णालयात दाखल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती संघाकडून देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अरे देवा! त्यांचे गुडघे दिसत आहेत | फाटक्या जीन्सबद्दलच्या वक्तव्यावरुन प्रियांका गांधीच ट्विट
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावरुन सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात असतानाच काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनींही या वादामध्ये उडी घेतली आहे. प्रियंका गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो पोस्ट करत यांचेही गुडघे दिसत आहेत असा टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या लोकसभा मतदारसंघात ABVP चा सुपडा साफ | काँग्रेसच्या NSUI'चा दणदणीत विजय
भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत अभाविपचा ( ABVP) दारुण पराभव झाला आहे. निवडणुकीत काँग्रेसच्या NSUI ने मोठा विजय मिळविला आहे. एकूण 8 जागापैकी 6 जागा जिंकत NSUI ने अभाविपला जोरदार धक्का दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
RSS प्रमुख मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची भेट | प. बंगाल निवडणूक तयारी?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रख्यात अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. दीड तासापेक्षा जास्त काळ दोघांमध्ये चर्चा रंगली. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याची माहिती चक्रवर्तींनी दिली. मात्र आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व आहे.
4 वर्षांपूर्वी -
आरएसएसचे माजी प्रवक्ते आणि तरुण भारतचे माजी मुख्य संपादक मा. गो. वैद्य यांचं निधन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. मा. गो. वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. 1966 पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे ’सुगम संघ’ नावाचे हिंदी पुस्तक त्यांनी लिहिले आहे. 1978 साली मा. गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यावेळची त्यांची कारकीर्दही उल्लेखनीय राहिली.
4 वर्षांपूर्वी -
भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावं लागेल - मोहन भागवत
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या संघटनांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर होणारे कार्यक्रम अतिशय थोड्याथोडक्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला. सावधगिरी बाळगत घेण्यात आलेल्या याच निर्णयाच्या धर्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवही यंदाच्या वर्षी रेशीमबागेऐवजी महर्षी व्यास सभागृहात पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
भारतीय मुस्लीम जगात सर्वाधिक समाधानी | सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य
जगात भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितले. ते पुढे म्हणाले,’मुघल सम्राट अकबराविरुद्ध महाराणा प्रताप यांचे सैन्य लढले, त्यामध्ये अनेक मुस्लिमांचा समावेश होता. देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येतात, असे भागवत यांनी सूचित केले. भारताने अन्य धर्मीय अनुयायांना हक्क दिले, तसे पाकिस्तानने दिले नाहीत आणि मुस्लीमांसाठी स्वतंत्र देश निर्माण केला, असेही भागवत यांनी साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
संघप्रणित मजदूर संघाचा कामगारविरोधी तरतुदींना विरोध | भाजपाची डोकेदुखी वाढणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने (बीएमएस) कामगार संहितांमधील कामगारविरोधी तरतुदींना तीव्र विरोध केला आहे. या तरतुदी मागे न घेतल्यास २८ ऑक्टोबरला देशभरात निदर्शने करण्याचा इशारा संघाने दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
हिंदू महिलांचे बिगर-हिंदू विवाह | लव्ह जिहादविरोधी कायद्यासाठी व्हीएचपी-RSS'चा दबाव
तिहेरी तलाकावर कायदा करणाऱ्या मोदी सरकार पुढे हिंदू महिलांना वाचवण्याचे नवे आव्हान आहे. विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) बिगर-हिंदू विवाहाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवणार आहे. हिंदुवादी संघटना अशा घटनांना लव्ह जिहाद म्हणतात. याला आळा घालण्यासाठी व्हीएचपी मोदी सरकारवर कायदा आणण्याचा दबाव टाकत आहे. भोपाळ येथे दोन दिवसीय व्हीएचपी बैठकीच्या दुसर्या दिवशी शुक्रवारी एका अहवालावर चर्चा झाली. आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनीही यात भाग घेतला होता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या