महत्वाच्या बातम्या
-
Shivpratishtan Sambhaji Bhide | गुलामी, नरकात राहणाऱ्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान - संभाजी भिडे
वादग्रस्त वक्तव्यांनी खळबळ उडवून देणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी आज अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पारतंत्र्य, गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा हा (Shivpratishtan Sambhaji Bhide) देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी सांगलीत केलं.
10 महिन्यांपूर्वी -
आषाढी वारी झाल्यावर जगातील कोरोना नामशेष होईल | संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान
महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. याच कोरोनावर काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी एक विधान केलं आहे. पंढरपूरची आषाढी वारी झाल्यावर देशातील नव्हतेतर जगातील कोरोना आटोक्यात नाहीतर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली.
1 वर्षांपूर्वी -
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं - संभाजी छत्रपती
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आलं आहे.
1 वर्षांपूर्वी -
शिवप्रतिष्ठानमध्ये फुट | संभाजी भिडे गूरूजींच्या निकटवर्तीयाने केली नव्या संघटनेची स्थापना
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांचे विश्वासू नितीन चौगूले यांची काही दिवसांपुर्वी हकालपट्टी करण्यात आली होती. वर्षभरापासून त्यांच्या विरोधात तक्रारी येत असल्याने स्वत: भिडे गुरूजींनी कारवाई केली होती. नितीन चौगुले यांनी सांगलीत मेळावा घेत नव्या संघटनेची स्थापना केली आहे. त्यांच्या नव्या संघटनेचे नाव ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिन्दुस्थान’ असं आहे. सामाजिक कार्य करून संपुर्ण राज्यभर संघटनेचा विस्तार करणार असल्याचं नितीन चौगुले यांनी यावेळी सांगितले.
2 वर्षांपूर्वी -
देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असल्यास शिवसेनाच हवी | संभाजी भिडेंचं वक्तव्य
या देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे,” असं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. एका चौकाच्या नामकरण कार्यक्रमात त्यांनी देशाच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला.
2 वर्षांपूर्वी -
कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच - महंत सत्येंद्र दास
‘कोरोनाला न घाबरता राम मंदिर भूमिपूजन सोहळा तमाम हिंदू समाजाने दिवाळी-दसऱ्या प्रमाणे साजरा करावा’ असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले होते. तसंच, ‘मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणच्या मूर्त्यांना मिश्या असाव्यात, अशी विनंतीही भिडे यांनी केली होती. त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण नसेल तरीही त्यांनी अयोध्येला जावे’, असा सल्ला भिडे गुरुजी यांनी दिला होता.
2 वर्षांपूर्वी -
भिडेंचं अजब विज्ञान ! माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना मुलं होतात
शिवकालीन इतिहासाची दाखले देऊन सध्याच्या राजकीय परिस्थीवर भाष्य करणाऱ्या संभाजी भिडेंनी एक अजब दावा केला आहे. शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी हे विधान नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत केलं आहे ज्यामुळे त्यांच्यावर खूप टीका होताना दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ राज्यभर मोर्चे आणि गर्दी
पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर त्या घटनेला संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हेच जवाबदार असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यातील मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई होऊन त्यांना अटक सुद्धा झाली आहे. परंतु संभाजी भिडे यांना सुद्धा अटक व्हावी म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत एल्गार मोर्चा सुद्धा काढला होता.
4 वर्षांपूर्वी -
संभाजी भिडेंना अटक करा, प्रकाश आंबेडकरांचा आज मुंबईत एल्गार
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे म्हणजे भिडे गुरुजी यांना अटक करण्यात यावी म्हणून आणि राज्य सरकार संभाजी भिडेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत अखेर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकरांनीच महाराष्ट्रातील वातावरण पेटवलं : संभाजी भिडे
पुण्यातील कोरेगाव-भीमा दंगलीचा फायदा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि मतांसाठी करण्यात आल्याचा आरोप संभाजी भिडेंनी पत्रकार परिषद घेऊन केला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Chandramani Gemstone | तणाव आणि विसंवाद दूर करण्यासाठी परिणामकारक, चंद्रमणी रत्नाचे अनेक फायदे जाणून घ्या
-
हे भारत निर्माण? | मोदी सरकारची 2022 ते 2025 पर्यंत 6 लाख कोटीची सरकारी मालमत्ता विकण्याची योजना
-
राज्यातील मतदारांच्या मनातील सुप्त लाव्हा भाजप-शिंदेंच्या मुळावर, सर्व्हेनुसार लोकसभेत भाजपला मोठा धक्का बसणार
-
VIDEO | महागाई, बेरोजगारी मुद्दे सोडून धार्मिक मुद्यांना बळ | बिहारमध्ये गोदी मीडिया हाय-हाय, गोदी मीडिया गो-बॅक घोषणाबाजी
-
Incredible India Trip | लाँग विकेंड, तुम्ही या बजेट फ्रेंडली ठिकाणांना भेट देण्याची योजना आखू शकता
-
Bihar Political Crisis | बिहारमध्ये 2 दिवसांत खेला होबे?, भाजप प्रणित एनडीएमध्ये फूट पडणार, राजद भाजपशी आघाडी तोडणार?
-
Yatharth Hospital IPO | यतर्थ हॉस्पिटल आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या
-
Airtel 5G Network Launch | एअरटेलची 5G सेवा या महिन्यात लाँच होणार, 2024 पर्यंत संपूर्ण देशात नेटवर्क पोहोचणार
-
केवळ बिहार नव्हे | संपूर्ण उत्तर भारतात भाजपला धक्का देण्याची जोरदार फिल्डिंग, या आकडेवारीने भाजपाची धास्ती वाढली
-
Stocks in Focus | धमाकेदार रिटर्न्स, 5 दिवसात 67 टक्के परतावा, गुंतवणूकदारांना मजबूत फायदा, हे स्टॉक्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी