महत्वाच्या बातम्या
-
मंदिरे उघडण्याच्या राजकीय आंदेलनात राज्यपालांनी सहभागी व्हायचे कारण नव्हते - शिवसेना
राज्यात अनलॉकचे वेगवेगळ्या टप्प्यात मॉल, चित्रपटगृह आणि दुकानं सुरू कऱण्याची परवानगी दिली मात्र मंदिर उघडण्यासाठी ठाकरे सरकारनं अद्याप परवानगी न दिल्यानं भाजपने वेगवगळ्या पद्धतीनं आंदोलन करून मंदिर उघडण्याची मागणी केली. इतकच नाही तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिर उघडण्याबाबत पत्र लिहून हिंदुत्ववादाचा विसर पडला का? असा सवालही उपस्थित केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
कोण आहे ती? नवरा मुख्यमंत्री झाल्यावर बोलू लागली - विशाखा राऊत
मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात लेटरवॉर सुरू झाल्यानं राजकारण तापलं. यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या. या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल रात्री उशिरा ट्विट करत उडी घेतली. अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यानंतर आता अमृता यांना शिवसेनेच्या महिला आघाडीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिवसेनेला बिहारमध्ये बिस्किट निवडणूक चिन्ह | शिवसेनेची तीव्र नापसंती
बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्याने शिवसेनेने उपलब्ध असेल ते निवडणूक चिन्ह घेऊन जदयू आणि भाजप यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेनेने निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय सुचविलेला असताना, त्याच्यापैकी कोणताही पर्याय न देता ‘बिस्किट’ हे वेगळेच निवडणूक चिन्ह दिल्याने शिवसेनेने नापसंती दर्शवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
सीबीआयच्या माजी संचालकांची आत्महत्या | हिमाचलाच्या नटीने यावर भाष्य केले पाहिजे - शिवसेना
सुशांतच्या आत्महत्येनंतर जे अनेक प्रश्न व शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. अश्विनीकुमार का मरण पावले, हे रहस्य राहू नये. सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनीकुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. त्यांचा मृत्यू का झाला हे रहस्य शोधण्यात कोणालाच रस नाही. काळ मोठा कठीण आला आहे हेच खरे, असे म्हणत शिवसेनेने या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
बिहार विधानसभा निवडणुक 2020 | शिवसेनेकडून २० स्टार कॅम्पेनर्स सज्ज
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना देखील सज्ज झाली आहे. बिहारच्या निवडणुकीत शिवसेना उतरणार असल्याचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यानंतर आता शिवसेनेने आपल्या स्टार कॅम्पनेर्सची यादी देखील जाहीर केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून २० जण स्टार कॅम्पेनर सज्ज झाले आहेत. २०१५ मध्ये शिवसेनेनं ८० जागा लढवत २ लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती.
2 वर्षांपूर्वी -
दोस्तीत कुस्ती | नगरसेवकांनंतर एकमेकांचे प्रकल्प पळवापळवी | कोकणाविरुद्ध लातूरचे आतुर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रकल्प पळवापळवीचं काम सुरु आहे. सिंधुदुर्गातील प्रकल्प काँग्रेसचे मंत्री पळवत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी गावात इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन रिसर्च प्रकल्प होत आहे. त्यासाठी एमआयडीसीने ६० एकर जागा देखील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन रिसर्चला दिली आहे. हा प्रकल्प सिंधुदुर्ग ऐवजी लातूरला व्हावा अशी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची इच्छा आहे. त्यासाठी अमित देशमुख प्रयत्नशील आहेत. यावरुन विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अमित देशमुख यांनी स्वर्गीय वडिलांकडून काही गुण घ्यावेत, असा सल्ला विनायक राऊत यांनी दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला | BMC तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच
काँग्रेसने मुंबई महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला दिलेला शब्द पाळला. मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून स्थायीच्या निवडणुकीतही काँग्रेस माघार घेणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी झाल्याने शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे भाजपचे मनसुबे फोल ठरले.
2 वर्षांपूर्वी -
हाथरसमधील बलात्कारी नटीबाईचे भाईबंद आहेत का? - शिवसेना
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठं वादंग पाहायला मिळालं. त्यावरून राजकीय वातावरणही तापलं होतं. बिहार-महाराष्ट्र, बिहार पोलीस व महाराष्ट्र पोलीस असा शाब्दिक संघर्षही बघायला मिळाला. त्यातूनच अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलीस, मुंबईविषयी वादग्रस्त विधान केली आणि नव्या वादाला तोंड फुटलं होतं. अखेर सुशांत प्रकरणावरून डोकं वर काढलेल्या वादाची धूळ ‘एम्स’च्या अहवालानं खाली बसली. मात्र, हा अहवाल समोर आल्यानंतर शिवसेनेनं या प्रकरणात महाराष्ट्र, मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत सवाल उपस्थित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या । बुधवार पेठेत तणावाचं वातावरण
पुण्यात शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. दीपक मारटकर असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याच्यावर चार ते पाच जणांनी खुनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दीपक मारटकरचा मृत्यू झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिवसेनेत जातीपातीचं राजकारण | गंभीर आरोप करत शिवसैनिकाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
शिवसेनेतील अंतर्गत वाद आला चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेत जातीपातीचं राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं केला आहे. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे. नाराज पदाधिकाऱ्यानं याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. मनपा स्वीकृत नगरसेवक निवडीत शिवसेनेत जातीचं राजकारण केले जात असल्याचे या पत्रात स्पष्ट केलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
सेना खासदाराची ती मोठी चूक | फोटो शदीह भगतसिंह यांचा | नाव चंद्रशेखर आझाद यांचं
शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांना एक शदीह भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त ट्वीट करणं चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटरवर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी शहीद भगत सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक फोटो ट्विट केला होता. यात शहीद भगत सिंह यांचा फोटो होता तर नाव चंद्रशेखर आझाद यांचं होतं. नेटकऱ्यांच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
2 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसहित महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री बोलणार - अनिल परब
राज्यात सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यातील भेटीची चर्चा सुरू आहे. फडणवीस-राऊत यांच्यातील भेटीनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे पक्षनेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरू होती. राऊत-फडणवीस भेटीनंतर झालेल्या बैठकीमुळे नव्या चर्चेला विषय मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
फडणवीस आणि संजय राऊतांची भेट | पण भूकंप शरद पवारच घडवतील - सविस्तर वृत्त
मुंबई, 26 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. TV9 मराठीने याबाबत वृत्त दिलं आहे. मात्र सदर भेट सामनाच्या मुलाखतीसंदर्भात असल्याचं समोर आलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
कांदा निर्यातबंदीतून पाकचा आर्थिक लाभ हा एक घोटाळाच - शिवसेना
‘कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंदी व त्यातून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा एक घोटाळाच मानावा लागेल, पण त्यावर सरकार बोलायला तयार नाही. देशातील कामगार व शेतकरी अशा कोंडीत फसले आहेत की, त्यांना जगणे कठीण झाले आहे. हे सगळे विषय गंभीर आणि चिंताजनक आहेत. देशातला विरोधी पक्ष क्षीण बनला आहे म्हणून सरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये’ असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
2 वर्षांपूर्वी -
माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण प्रकरण | सर्व आरोपींना जामीन मंंजुर
मुंबईमध्ये माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याप्रकरणी 6 आरोपींना आज (15 सप्टेंबर) पुन्हा न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली होती. मात्र त्यानंंतर लगेचच बोरिवली कोर्टातुन या सहाही आरोपींंना प्रत्येकी 15 हजार रुपयांंवर जामीन मंंजुर करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा | माजी नौदल अधिकाऱ्याची मागणी
शिवसैनिकांनी मारहाण केल्याप्रकरणी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले होते. राज्यपालांकडे आपण राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. भाजपा नेते अतुल भातखळकरदेखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे असं ते म्हणाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचे लाडके पुत्र ज्यांच्यासोबत फिरतात, त्यांना मी उघडं पाडतेय | हाच माझा गुन्हा
अभिनेत्री कंगना रणौत मुंबईवरून चंदिगडला गेली आहे. मात्र त्यानंतरही तिच्या आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कंगनाने पुन्हा आरोप केले आहेत. सुशांतच्या हत्येला जबाबदार असणारे आणि बॉलिवूडमधले माफिया, ड्रग्ज रॅकेट या सगळ्यांचे कारनामे मी उघड केले, हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी अडचण आहे, असं कंगनाने म्हटलं आहे. त्याच बरोबर या सगळ्या गँगशी आदित्य ठाकरे यांची जवळीक आहे. हे सगळं उघड करणं हाच माझा सगळ्यात मोठा गुन्हा ठरला असल्याचंही कंगनाने म्हटलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान | शिवसेनेचं टीकास्त्र
महाराष्ट्रात पोलिसांवर दबाव आणून चुकीचे कलम लावले जात आहे. गुंडागर्दी करणं शिवसेनेची जुनी सवय आहे आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यावरून शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांनी रामदास आठवले यांची खिल्ली उडवली आहे. रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान आहे, अशा शब्दांत अनिल परब यांनी आठवले यांचा समाचार घेतला.
2 वर्षांपूर्वी -
कंगनाची बाजू घेतली | त्या सर्वांची तोंडं काळी करून ती आज गेली - आ. प्रताप सरनाईक
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आज सकाळी मुंबईतून मनालीसाठी रवाना झाली. मात्र जाता जाता कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. कंगनानं एका शेरोशायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधत एका महिलेवर अन्याय करुन पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे असा दावा तिने केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
वडिलांना मारहाण केली, राष्ट्रपती राजवट लागू करा | त्या अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी
नौदलाच्या माजी अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल एक कार्टुन फॉरवर्ड केल्याने त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. कांदिवली येथे राहणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणानंतर अधिकाऱ्याच्या मुलीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच शिवसैनिकांनीच आपल्या वडिलांना मारहाण केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही मुलीने केली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या
-
Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Fuel Prices | मोदी सरकार जनतेला अजून धक्का देण्याच्या तयारीत | पेट्रोल-डिझेलच्या दरात 4 रुपयांनी वाढ होणार
-
Hot Stock | हा स्टॉक 32 टक्के परतावा देऊ शकतो | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
-
Multibagger Stock | या 15 रुपयाच्या शेअरने १ लाखाच्या गुंतवणुकीचे 15 लाख रुपये केले | स्टॉकबद्दल जाणून घ्या