महत्वाच्या बातम्या
-
अजब! मुंबईच्या सत्तेत असून बाधितांना भेटले नाही, पण सत्तेत टिकण्यासाठी थेट गुजरातला?
मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या पादचारी पूल दुर्घटनेत अनेकांचा नाहक जीव गेला आणि त्यात अनेक मुंबईकर गंभीर जखमी देखील झाले. मात्र काही मिनिटाच्या अंतरावर असून आणि मुख्य म्हणजे मुंबई महानगर पालिकेच्या सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेतील ना जखमींची भेट घेतली ना मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. मुंबई महानगर पालिकेत सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी कोणतीही जवाबदारी किंवा संवेदनशीलपणा मुंबईकरांप्रती व्यक्त केला नाही.
3 वर्षांपूर्वी -
PNB बँकेने कर्जबुडव्या म्हणून घोषित केलेल्या धैर्यशील माने यांना सेनेकडून उमेदवारी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पीएनबी घोटाळा आणि देशातून पळ काढणारा निरव मोदी आधीच भाजपची डोकेदुखी ठरलेला असताना, आता शिवसेनेत देखील एक प्रति निरव मोदी असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला देखील PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेनेच कर्जबुडव्या म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आमदार निवडणूक रिंगणात उतरणार
लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी किरीट सोमय्यांकडून मातोश्रीच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसैनिकांचा रोष असलेले ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार सोमय्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अद्याप मातोश्रीवरुन त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेली नाही. निवडणूक जवळ येत असताना, प्रचाराचे दिवस कमी होत असताना ईशान्य मुंबईचे खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना धक्का बसला आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोणते दिवे लावले म्हणून युतीच्या अधिक जागा ते सर्व्हेत का येत नाही? नेटिझन्स
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक ओपिनियन पोल अर्थात सर्व्हे येण्यास सुरुवात झाली असून त्यात महाराष्ट्रात भाजप आणि सेनेला घवघवीत यश मिळणार असं दाखविण्यात आलं आहे. वास्तविक शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या राज्यातील आणि केंद्रातील डझनभर मंत्र्यांनी, ६३ आमदार आणि १८ खासदारांनी नक्की विकास कामांचे कोणते दिवे लावले आहेत, म्हणून लोकं त्यांना भरघोस मतदान करणार आहेत? अशी चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ व शिवसेनेविरुद्ध ठेवीदारांची मोहीम
लोकसभा निवडणुका झाल्या असताना शिवसेनेचे अमरावतीचे खासदार अडचणीत आल्याचे चित्र आहे. कारण ‘द सिटी को ऑप. बँकेच्या ठेवीदारांनी त्यांच्या विरुद्ध समाज समाज माध्यमांवर मोहीम सुरु केली आहे. त्यात संबंधित ठेवीदार हातात बॅनर घेऊन त्यावर एक संदेश देत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना राज्य सरकारकडून झटका, १ एप्रिलपासून वीज दरात ६ टक्क्याने वाढ
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर १ एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात तब्बल सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे विजबिलात सहा टक्क्यांनी वाढ होईल आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसेल.
3 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, किरीट सोमैयांच्या उमेदवारीला तीव्र विरोध
ईशान्य मुंबईच्या लोकसभा उमेदवारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर आज पुन्हा चर्चा झाली. परंतु आज देखील याबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समोर येत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमैया यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला आहे.
3 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंचे विश्वासघातकी प्रयोग बघत राहण्याशिवाय वनगांच्या हाती काहीच नव्हतं
आज मुंबईच्या ‘मातोश्री’वर जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश दिला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गावित हे पालघरचे शिवसेनेचे लोकसभा उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, श्रीनिवास वनगांना विचारूनच गावित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मी अजून थोडे काम करतो व नंतर उमेदवारी मागतो, असे वनगा यांनीच सांंगितल्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले.
3 वर्षांपूर्वी -
पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईंचाच सल्ला घेणार, शिवसेनेच्या मुंबई पालिकेचा घाट
सीएसटीएम स्थानकाजवळील हिमालय पुलाचा भाग कोसळण्यास जबाबदार ठरलेल्या बेजबाबदार कंत्राटदारावर पालिका प्रशासनाने १६ पुलांच्या दुरुस्तीची जबाबदारी टाकली आहे. हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाई असोसिएटेड या कंपनीला पुन्हा काम देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घेतला आहे. या दुरुस्तीसाठी पालिका तेरा कोटी ८६ लाख मोजणार आहे. पालिका प्रशासनाच्या या आश्चर्यकारक निर्णयामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या जीव धोक्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
सेनेच्या १२ मंत्र्यांनी ५ वर्ष काय दिवे लावले ते उद्धव ठाकरे सांगतील का? नेटकरी चर्चा रंगल्या
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि सर्वच पक्ष प्रचाराला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या मालिका सुरु झाल्या असल्या तरी एक गोष्ट सहज जाणवते आणि ती म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख मतदाराला शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांच्या कोणत्याही विकास कामांचा पुरावा देताना दिसत नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या सेटलमेंटमुळे वनगांशी दगाफटका होणार? राजेंद्र गावित यांना सेनेची उमेदवारी
लोकसभा निवडणुकीचा सेना-भारतीय जनता पक्षाचा तिढा जवळपास सुटल्याचे निश्चित मानले जात आहे. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं २५-२३चा फॉर्म्युला तयार केला आहे. यावेळी भाजपानं पालघरची जागा शिवसेनेला सोडली आहे. चिंतामण वनगा यांचे गेल्या वर्षी जानेवारीत दिल्लीत निधन झाले होते. त्यानंतर त्या जागेसाठी त्यांचे पुत्र इच्छुक होते.
3 वर्षांपूर्वी -
पहिला टप्पा; उमेदवारी अर्ज भरण्याची घाई आणि शक्तीप्रदर्शन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आजच्या पहिल्या टप्प्यात राज्यात नागपूर, वर्धा, भंडारा, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११ एप्रिलला मतदान होणार असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची घाई दिसून येत आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी नितीन गडकरी यांच्यासह स्वतः मुख्यमंत्रीही अर्ज भरताना उपस्थित असणार असल्याचे समजते.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा निरव मोदी? PNB बँकेने कर्जबुडव्या म्हणून घोषित केलं त्यालाच सेनेकडून उमेदवारी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पीएनबी घोटाळा आणि देशातून पळ काढणारा निरव मोदी आधीच भाजपची डोकेदुखी ठरलेला असताना, आता शिवसेनेत देखील एक प्रति निरव मोदी असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला देखील PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेनेच कर्जबुडव्या म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील २१ उमेदवारांपैकी १७ विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना यंदा एकूण २३ जागा लढवणार आहे. पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांचे उमेदवार यावेळी शिवसेनेने जाहीर केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
हे शिवसेनेचे वाघ? पालघर शिवसेना नगरसेवकाची जन्मदात्या आईला संपत्तीसाठी मारहाण
जन्मदात्या आईची संपत्ती स्वतःच्या नावावर करुन घेण्यासाठी शिवसेना नगरसेवकाने आईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. स्थानिक शिवसेना नगरसेवक मकरंद पाटील यांनी हा संतापजनक प्रताप केला आहे. सदर प्रकरणी मकरंद पाटील, त्यांची पत्नी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्वेता पाटील यांच्याविरोधात मकरंद पाटील यांच्या आईने पालघर पोलिसांत कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुलीच्या विनयभंगाच गांभीर्य नाही, सेनेला भाजपची मैत्री महत्वाची? भाजपचा उल्लेख टाळून मनसेवर पूर्ण बातमी
काल भाजपचे विक्रोळीचे नेते आणि महापालिकेचे नगरसेवक पदाचे उमेदवार मंगेश सांगळे यांनी चालू गाडीमध्ये एका परिचयातील १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार ऐरोलीमध्ये घडला आहे. सदर प्रकरणी रबाळे पोलिसांनी सांगळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला असून ते पुढील तपास करीत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
पादचारी पूल दुर्घटना; स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई अटकेत
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून काही अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण ६ जण मृत्युमुखी पडले, तर तब्बल ३१ जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेलस स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांच्या २ मालमत्ता जप्त
तीन मोठ्या सरकारी बँकांचे तब्बल ६८ कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्याने लोकसभेचे माजी अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे व्यवसायाने विकासक असलेले चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांची कुर्ला आणि लोणावळ्याची मालमत्ता बँकांनी जप्त केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपने नाही, शिवसेनेने एनसीपीच्या शरद पवारांना प्रवेश दिला होता, ते पुन्हा नगरसेवकही झाले नाहीत
अमरावती येथील युतीच्या मेळाव्यात भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पक्ष होत असल्याचा धागा पकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे कटाक्ष टाकत, निदान आता शरद पवार यांनाच भाजपमध्ये प्रवेश देऊन नका टोला लगावला होता.
3 वर्षांपूर्वी -
युतीचे उद्योग म्हणजे लहानपणी पाहिलेला सर्कशीचा खेळ - रोहित पवार
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजप – सेना युतीवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या मते आजचे युतीचे उद्योग म्हणजे मी लहानपणी पाहिलेलं सर्कसच. “कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई म्हणून करायचे आणि भाजप शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत. इतकेच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे, सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता”, अशा शब्दात रोहित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Advance Tax | तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पहिला हप्ता भरला का? | ही तारीख चुकल्यास महागात पडेल
-
Mangal Rashi Parivartan | 27 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करेल | १२ राशींवर काय परिणाम होईल जाणून घ्या
-
Gold ETF Investment | हा गोल्ड फंड 64 टक्के परतावा देत संपत्ती वेगाने वाढवतोय | तुम्ही गुंतवणूक केली आहे का?
-
Agneepath Scheme | सीमेवर देशासाठी सेवा बजावणं सुद्धा कंत्राटी नोकरीचा प्रयोग? | देशभर मोदी सरकारविरोधात रोष
-
Business Idea | गुंतवणूक न करता हा व्यवसाय सुरु करा | महिन्याला 50,000 रुपयांची कमाई
-
LIC Share Price | एलआयसीचे मार्केट कॅप 1 महिन्यात 31 टक्क्याने खाली | सामान्य गुंतवणूकदार पूर्ण फसला
-
Multibagger Penny Stocks | या २ रुपयाच्या शेअर गुंतवणूकदारांचं आयुष्य सार्थकी लागलं | 1 लाखाचे 2.5 कोटी झाले
-
Agnipath Scheme | मोदी सरकार अग्निपथ योजनेवर ठाम | उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्यास संधी मिळणार नाही
-
Investment Tips | तुम्ही शॉर्ट टर्ममध्येही चांगला पैसा कमवू शकता | गुंतवणुकीच्या या ट्रिक फॉलो करा
-
5G Internet in India | तुमच्या इंटरनेट स्पीडमध्ये 10 पटीने वाढ होणार | ऑनलाईन उद्योगांनाही गती येणार