महत्वाच्या बातम्या
-
ठाण्यात मराठा आंदोलनातील हिंसाचारात शिवसेना माजी नगरसेवक आणि शाखाप्रमुखाचा समावेश
मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन व बंद स्थगित केल्याची घोषणा समन्वयकांनी केल्यानंतर सुद्धा ठाण्यात नितिन कंपनी येथे रस्ता रोको आंदोलन करणाऱ्यांना ठाणे पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केले होती. परंतु त्यानंतर सुद्धा हिंसाचार भडकून दंगल सद्रुश्य परिस्थिती झाली होती. पुराव्याअंती याप्रकरणात इतर ३८ जणांना अटक तर झालीच परंतु त्या व्यतिरिक्त शिवसेनेचे माजी नगरसेवक शरद कणसे आणि अशोक कदम हे सुद्धा त्या हिंसाचारात सामील असल्याच सीसीटीव्ही फुटेज वरून समोर आल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मूळ आरक्षणाचा विषय सरकारच्या हातात राहिलेला नाही, शिवसेना आमदार व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे
सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर सरकार आणि सरकारच्या प्रतिनिधींकडून निरनिराळी वक्तव्य समोर येत आहेत. त्यात आता शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सुद्धा राज्यातील स्थितीवर आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाभारतात 'संजय'चा रोल फक्त कॉमेंट्री करायचा असतो: भाजपचा राऊतांना टोला
शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या वक्तव्यावर भाजपने संजय राऊत यांच्यावर ही झोंबणारी टीका केली आहे. भाजपच्या राज्य आयटी सेल ने ट्विट करून संजय राऊतांना टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं भाकीत खरं ठरतंय? विकास फसल्याने सेना-भाजपला 'राम मंदिरा'चा आधार? आपलं मत नोंदवा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या भेटी मागे हिंदुत्वाचा मुद्दा आणि भाजपला शह अशी कारणं पुढे केली जात असली तरी वास्तव हे दुसरंच असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. राज्य सरकारमध्ये तसेच केंद्रात १२-१३ मंत्रिपद उपभोगणाऱ्या शिवसेनेची नेहमीच एक बोंब राहिली आहे की, आमच्या मंत्र्यांची तसेच आमदारांची कामं मार्गी लावली जात नाहीत. परंतु नुकतंच सामना’ला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे नेते सत्तेचा अनुभव घेण्यासाठी सत्तेत सामील असल्याचं उत्तर दिल आहे. वास्तविक गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या मंत्र्यांचा कार्यकाळ हा विकासशुन्य असाच म्हणावा लागेल.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठवल्याचे पत्रकार परिषदेत सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
स्टंन्ट? सेना आ. हर्षवर्धन जाधवांचा जुलै २०१८ ई-मेलद्वारे राजीनामा, डिसेंबर २०१५ पत्राद्वारे, ऑक्टोबर २०१५ फॅक्सद्वारे प्रयोग झाले आहेत
मराठा आरक्षण तापू लागल्याने अनेक राजकारणी नवं नवे प्रयोग करताना दिसतील आणि त्यातले काही जण असे प्रयोग अनेक वेळा करून झाले आहेत आणि शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव त्यातीलच एक असच म्हणावं लागेल. भावनिक राजकारण आणि संधीचा फायदा असच त्या मागील कारण असावं असं राजकीय विश्लेषक मत व्यक्त करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची स्वबळावर सत्ता हे महाराष्ट्राचं स्वप्न? - सौ. सामना
महाराष्ट्राची जनता १ स्वप्न पाहते कि “या राज्यात शिवसेनेचं स्वबळावर सरकार यावं आणि त्या संपूर्ण बहुमताचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असावे, हे स्वप्न कसे पूर्ण होईल?” संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना सवाल.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट, घाईत निर्णय घेता येणार नाही: उद्योग मंत्री सुभाष देसाई
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मराठा आरक्षणाचा निर्णय कोर्टातही टिकणे गरजेचे आहे असं सांगत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य कारभाराची अप्रेंटिसशिप? राज्यातील १२ कोटी लोकं सुद्धा सेनेच्या सत्ता कारभाराचा अनुभव घेत आहेत?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना सत्तेत का सहभागी झाली यावर प्रतिक्रया दिली आहे. त्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की,’महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे फोडून भाजपने आपलं राज्य स्थापन केलं असतं तर पुन्हा आम्ही बोंबलतच राहिलो असतो रस्त्यावर. त्याच्यापेक्षा मी माझ्या लोकांना कारभाराचा अनुभव घेऊ दिला” असं उत्तर दिल.
4 वर्षांपूर्वी -
काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मराठा क्रांती मोर्चेकरी सेना खासदार खैरेंच्या अंगावर धावले आणि हाकलून दिल
काल औरंगाबाद इथं मराठा आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाला. आज सकाळी काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाचा ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंद, तर केस व नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका: नितेश राणे
समस्त मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी म्हणजे क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्यासंबंधित मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी लातूर येथे पार पडली असता हा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेत मोठं बंड होण्याची शक्यता
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले ठाणे महानगर पालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यातील वादाचे कारण पुढे करत भोईर कुटुंबातील चारही नगरसेवक पक्षावर प्रचंड नाराज असल्याचे समजते. तसेच या निमित्ताने थेट एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध ठाण्यात राजकीय बंड केलं जाऊ शकत अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोलापूरमध्ये संतप्त मराठा क्रांती मोर्चाचा चक्काजाम, एसटी बसेस सुद्धा फोडल्या
मराठा क्रांती मोर्चाच आंदोलन हळूहळू राज्यभर पेट घेण्याची चिन्ह आहेत. पंढरपूर नंतर आता सोलापुर शहरात मराठा समाजाने चक्काजाम आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या जमावाने दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्याच्या अस्मितेसाठी टीडीपी'चा मोदी सरकारविरोधात 'अविश्वास' ठराव, तर शिवसेनेचा 'विश्वास'
देशभरातील विरोधक मोदी सरकार विरोधक अविश्वास ठरावा दरम्यान एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले असताना शिवसेनेचा भाजपला विरोध हा केवळ कागदावरच असल्याचं स्पष्ट होताना दिसत आहे. कारण शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला असून विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित राहाव म्ह्णून पक्षाने विशेष काळजी घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिलांचा अपमान; रस्ते बाईच्या गालाइतके गुळगुळीत करू नका, अन्यथा पाय घसरेल: विशाखा राऊत
शिवसेना नेत्या व सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये मुंबईतील खड्ड्यांच्या संदर्भात झालेल्या चर्चे दरम्यान महिलांप्रति अपमानास्पद भाष्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई शहरातील खड्डयांसंदर्भात भाष्य करताना नगरसेविका बरगळल्या असल्याचे वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेला स्वतःची सत्ता असलेली औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची वेळ का आली आहे?
औरंगाबाद महापालिकेत ५ महिन्यापासून कचराकोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. त्यात पावसाळा सुरु झाल्याने साठलेला कचरा कुजल्याने रोगराई आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परंतु अनेक महिन्यापासून हा प्रश्न जटील होत चालल्याने नागरिकांमध्ये सुद्धा रोष वाढत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या संघर्षात जनतेची होरपळ होत असल्याने मुंख्यमंत्र्यांवरील दबाव वाढत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई व चंद्र; फरक इतकाच की मुंबईत जीवश्रुष्टी आढळते पण चंद्रावर अजून तरी नाही
भूगोलाच्या पुस्तकात प्रत्येकाने पाहिलं असावं की चंद्राचा भूपृष्ठ भाग असा दिसतो आणि चंद्रावरबाबत अजून संशोधन सुरु असल तरी तिथे मनुष्याची किव्हा पृथ्वीप्रमाणे इतर पशु पक्षांची जीवश्रुष्टी अस्तीत्वात नाही. परंतु एकाच पावसाने मुंबईमधील रस्त्यांची दुर्दशा आणि खड्ड्यांच प्रमाण पाहिल्यास सध्या चंद्रावरून सुद्धा मुंबई चंद्रासारखीच दिसत असावी असा भौगोलिक तर्क लढविला गेल्यास आश्चर्य वाटायला नको.
4 वर्षांपूर्वी -
सेनेचे किमान १५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील: शिवसेना आमदार चिखलीकर
ठाण्याचे विधानसभा आमदार एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त एकाही विधानसभेवरील आमदाराला पक्षप्रमुखांनी मंत्रिपद दिले नसून, केवळ जवळच्या लोकांनाच मंत्रिपद दिल्याने नाराज आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत मोठी पक्ष फुटी होऊन किमान १५ आमदार भाजप सोबत जातील आणि ते नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नाराज आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपवर दबावासाठी तेव्हा चंद्राबाबुं'सोबत 'फोटोसेशन', आज टीडीपी'ला भेट नाकारली?
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेलुगू देसमच्या नेत्यांना भेट नाकारल्याचे वृत्त आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चंद्राबाबुंचा टीडीपी म्हणजे तेलुगू देसम नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची तयारी आहे. त्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावी या उद्देशाने तेलुगू देसमच्या खासदारांनी उद्धव ठाकरेंची भेट मागितली होती.
4 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का नाही होऊ शकत: निलेश राणे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पुण्याच्या दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारला चिमटा काढताना राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत असं भाष्य केलं होता. शिवसेना सध्या केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या राम मंदिरा विषयीच्या भाष्याला विरोधकांनी लक्ष केलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Gold and Silver Price | सोन्या-चांदीची चमक वाढली | पाहा आजचा मुंबई आणि इतर शहरातील दर
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Prudent Corporate Advisory IPO | प्रूडेंट कॉर्पोरेट अॅडव्हायजरी शेअरची लिस्टिंग प्रथम जोमात नंतर कोमात
-
Paytm Share Price | पेटीएमचा तोटा 762 कोटीवर पोहोचला | शेअर्सची किंमत अजून कोसळणार?
-
Aadhaar Card Photo | आधार कार्डचा फोटो बदलायचा की अपडेट करायचा आहे? | जाणून घ्या प्रक्रिया
-
Multibagger Stock | 33 दिवसात 164 टक्के परतवा देणारा हा जबरदस्त शेअर तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
-
Adani Group Stocks | अदानी ग्रुप आता या क्षेत्रात प्रवेश करणार | या कंपनीच्या माध्यमातून करणार व्यवसाय