महत्वाच्या बातम्या
-
Maharashtra On Top In Vaccination | २ डोस देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम | ठाकरे सरकारची कामगिरी
देशात लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पूर्ण होण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असून राज्यातील ९ कोटी ५० लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात ६ कोटी ४० लाख म्हणजे ७०% जनतेचा पहिला डोस, तर २ कोटी ९० लाख म्हणजे ३५% जनतेचे दोन्ही डोस (Maharashtra On Top In Vaccination) पूर्ण झाले. दोन्ही डोस पूर्ण करण्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
PM Modi To Address Nation | पीएम मोदी देशाला संबोधित करणार | बेरोजगारी, महागाईवर बोलणार की लसीकरण इव्हेन्ट?
कोरोनाविरोधातील लढाईत काल देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला गेला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती (PM Modi To Address Nation) देण्यात आली आहे. आजच्या संबोधनामध्ये पंतप्रधान कोरोना लसीकरण आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचावासाठीच्या उपाययोजनांबाबत विस्ताराने बोलण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
Celebrates Vaccination | महागाई, बेरोजगारीच्या विक्रमाकडे दुर्लक्ष करत मोदी सरकारचं लसीकरण विक्रमावर सेलिब्रेशन
देशात कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा आकडा आज सकाळी 9.45 वाजता पूर्ण झाला आहे. शेवटचे 20 कोटी डोस 31 दिवसात घेतले गेले आहेत. लसीचे 100 कोटी डोस पूर्ण झाल्याची घोषणा करण्यासाठी सरकारने विशेष तयारी केली आहे. यासाठी ट्रेन, विमाने आणि जहाजांवर लाऊडस्पीकरद्वारे घोषणा करण्याची (Celebrates Vaccination) योजना आहे. तसेच, ज्या गावांनी 100% लसीकरण पूर्ण केले आहे त्यांना सांगण्यात आले आहे की त्यांनी पोस्टर आणि बॅनर लावून आरोग्य कर्मचाऱ्यांचा आदर केला पाहिजे.
3 वर्षांपूर्वी -
Covaxin Approved Emergency Use For children | 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनला मंजूरी
लवकरच देशात लहान मुलांचे कोरोना लसीकरण सुरू होऊ शकते. देशाच्या औषध प्रशासन डीजीसीआयने भारत बायोटेकला कोवॅक्सीन (Covaxin Approved Emergency Use For children) 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरण देण्यासाठी परवानगी दिली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून ही लस विकसित केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यात एकाच दिवसात दिल्या 14 लाखांपेक्षा जास्त लसी | 1 कोटी 79 लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा
संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्या लाटेची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत बुधवारी (दि.८सप्टेंबर) रोजी रात्री आठ वाजेपर्यंत १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी ५५ लाखांवर गेली आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
लसीकरणात मुंबई अव्वल | 1 कोटींहून अधिक लोकांचं लसीकरण करणारा मुंबई देशातील पहिला जिल्हा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) प्रयत्नांनंतर, मुंबई देशातील पहिला जिल्हा ठरला आहे, जिथे एक कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. CoWIN पोर्टलवर अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारपर्यंत येथे 1 कोटी 63 हजार 497 लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे. यापैकी 72 लाख 75 हजार 134 असे लोक आहेत ज्यांना पहिला डोस मिळाला आहे आणि 27 लाख 88 हजार 363 असे लोक आहेत ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
कोवीशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत विचार | सध्या 84 दिवसांचं अंतर
केरळमधून येणाऱ्या कोरोना संसर्गाची आकडेवारी भयावह आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशभरात कोरोना कमजोर होत आहे, परंतु केरळ सरकारची चिंता वाढवत आहे. गेल्या 24 तासांत देशात 46 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यातील 58% फक्त केरळमधील आहेत.
3 वर्षांपूर्वी -
डिसेंबर'पर्यंत लसीकरण कसं पूर्ण होईल? | राजकारणी लोक थापा मारतात | सिरमच्या अध्यक्षांनी सत्य मांडलं
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याचे अर्थचक्र फिरवणाऱ्या या दोन महत्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेले. पुण्यामधील रुग्णसंख्या तर मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.
3 वर्षांपूर्वी -
तुमच्या व्हाट्सअँपवर काही सेकंदात मिळवा कोरोना लसीकरण प्रमाणपत्र | या स्टेप्स फॉलो करा
देशातील नागरिकांना आता कोरोनाची लस घेतल्यानंतर काही सेकंदातच लस घेतल्याचे प्रमाणपत्र व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या कार्यालयाने रविवारी याबाबतची माहिती दिली. सध्या, नागरिक कोविन पोर्टलवर लॉगइन केल्यानंतर त्यांचे कोरोना लस प्रमाणपत्र डाऊनलोड करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
कोवीशील्डचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनाची शक्यता 93% कमी होते | अभ्यासातून दावा
लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत असल्याच्या वृत्तांमुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातही प्रामुख्याने एस्ट्राजेनेकाच्या कोवीशील्डबद्दल विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण, देशातील सशस्त्र दलांच्या 15 लाख 90 हजार पेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सवर झालेल्या अभ्यासात दिलासादायक बाब समोर आली आहे. या सर्वांना कोवीशील्डचे दोन्ही डोस देण्यात आले होते. त्यांच्यातील ब्रेक-थ्रू इन्फेक्शन 93% कमी झाल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ असा की कोवीशील्ड लस घेणाऱ्यांना कोरोनाचा धोका 93% कमी झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबईत शुक्रवारी लसीकरण बंद | शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसींचा तुटवडा
लसीकरण मोहीम सुरू असून सतत लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद ठेवावे लागत आहेत. तसेच कमी लसीकरण केंद्रांवर लस द्यावी लागत आहे. गुरूवारीही लसीचा तुटवडा असल्याने काही केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. आज (शुक्रवार) लसीचा तुटवडा असल्याने पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन केले जाणार लसीकरण | पुण्यातून सुरुवात
राज्यात लसीकरणासाठी मोठ्या संख्येत लोक घराबाहेर पडत आहेत. यामुळे संक्रमणाचा धोका वाढला आहे. हे पाहता राज्य सरकारने आता घरोघरी जाऊन लस देण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात पुण्यातून केली जात आहे. ही माहिती राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. या प्रोजेक्टसाठी लसी या केंद्र सरकारकडून दिल्या जाणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | इंजेक्शनमध्ये लस न भरताच सुईने हवा भरत आहेत कर्मचारी | जेडीयू-भाजप सरकारचा भोंगळ कारभार
देशात लसीकरणावून आधीच सामान्य लोकं फेऱ्या मारून कंटाळलेले असताना दुसरीकडे अत्यंत बेजवाबदारपणाचे प्रकार समोरयेत आहेत . विशष म्हणजे लसींचा तुटवडा आणि पूर्ण झालेलं लसीकरण आकड्यातील विक्रम दाखविण्यासाठी असे धक्कादायक प्रकार केले जातं असावेत अशी देखील अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. तसाच एक प्रकार जेडीयू-भाजपाची सत्ता असलेल्या बिहारमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
खरंच की चिकटा-चिकाटीचा ट्रेंड? | नाशिकनंतर परभणीतही लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला चिकटले नाणे
नाशिक येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची लस घेतल्यानंतर धातूचे नाणे आणि स्टेनलेसस्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचीच पुनरावृत्ती आज परभणीत झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणचे 41 वर्षीय गजानन पाटेकर यांना देखील हाच अनुभव आला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे शरीर धातूची नाणी आणि काही स्टीलच्या वस्तू आकर्षून घेत आहेत. मात्र याचा त्यांना कुठलाही त्रास होत नसल्याचे ते सांगत आहे. यामागील विज्ञान काय आहे? हे नेमके सांगणे कठीण असले तरी लसीकरणानंतर हा प्रकार झाल्याचा दावा गजानन पाटेकर करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
त्या २५ टक्क्यांमध्ये गरिबांचा विचारच नाही | खासगी रुग्णालयांत लस पूर्वीप्रमाणेच महाग | काय आहेत दर?
१८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी केंद्र सरकारने लस खरेदी सुरू केली आहे. शिवाय, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी केंद्र सरकार प्रतिडोस १५० रुपये दराने खरेदी करेल. हेच दर राज्यांसाठी कोविशील्ड प्रतिडोस ३०० आणि कोव्हॅक्सिन ४०० रुपये असे होते. केंद्राने राज्यांच्या वाट्याची २५ टक्के खरेदी स्वत: करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही खरेदी राज्यांनीच करावयाची होती.
4 वर्षांपूर्वी -
खासगी रुग्णालयात लस | मोदींच्या घोषणेतील दर १५० रुपये | प्रत्यक्ष दर ७८०, १४१० आणि ११४५ रुपये
केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित केले आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी हे आदेश काढले. त्यानुसार सिरमची कोविशील्ड लस प्रतिडोस जास्तीत जास्त ७८० रुपयांना, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन १,४१० रुपयांना तर रशियाची स्पुटनिक-व्ही लस १,१४५ रुपयांपेक्षा अधिक दराने दिली जाणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राने 18 ते 44 वयोगटाच्या लसीचा खर्च राज्यांवर टाकणे तर्कहीन | सुप्रीम कोर्टाने फटकारले
कोरोनावरील औषधे, लस व व्यवस्थापनाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने स्वत:हून दखल घेतली होती. त्याचा लेखी आदेश बुधवारी जारी झाला. त्यात कोर्टाने केंद्र सरकारकडून लसीकरणाचा संपूर्ण हिशेब मागवला आहे. लसीकरण धाेरण व लस खरेदीबाबतच्या निर्णयांची माहिती, त्याची फाइल नोटिंग व दस्तऐवज सोपवण्याचा आदेश कोर्टाने दिला. उरलेल्या लोकांच्या लसीकरणाची काय योजना आहे, असा प्रश्नही कोर्टाने केला.
4 वर्षांपूर्वी -
खाजगी इस्पितळांसोबत टायअप करून भाजप खासदारकडून कोरोना लसीचा धंदा? | प्रति डोस ९०० रुपये
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवीन कोरोना संक्रमितांचा आकडा कमी होत आहे. सोमवारी देशभरात 1 लाख 95 हजार 685 नवीन कोरोना संक्रमितांची नोंद झाली. हा आकडा मागील 42 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी, 13 एप्रिलला 1 लाख 85 हजार 306 रुग्ण आढळले होते. देशातील मृतांचा आकडा सरकार आणि देशातील लोकांसाठी चिंतेची बाब बनला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण हाच मोठं उपाय ठरला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिंतेत भर | 9 राज्यांच्या लस खरेदीसाठी जागतिक निविदा, पण जानेवारीपर्यंत पुरवठा अशक्य - लस कंपन्या
भारतात रुग्णसंख्या सातत्याने घटत असतानाही लसटंचाईमुळे कोरोनाविरुद्धचा लढा कमकुवत होत आहे. दिल्लीसह अनेक राज्यांत लस नसल्यामुळे मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. केंद्र सरकारने १९ एप्रिलला राज्यांना थेट कंपन्यांकडून लस खरेदीची मुभा दिली, मात्र त्यातही एक महिना वाया गेला. यूपी, पंजाब, दिल्लीसह ९ राज्यांनी जगभरातील लस निर्मात्यांकडून २८.७ कोटी डोस खरेदीच्या जागतिक निविदा काढल्या, मात्र एकही कंपनी यंदा लस पुरवठा करण्याच्या स्थितीत नाही.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत 24-26 मे थेट वॉक-इन व्दारे लसीकरण तर 27-29 मे दरम्यान ऑनलाईन नोंदणीव्दारे
कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण पूर्ववत सुरळीत होण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक आगळावेगळा पॅटर्न सुरू केला आहे. यानुसार 24 ते 26 मे म्हणजे सोमवार ते बुधवार असे 3 दिवस लसीकरण हे थेट येणाऱ्या (वॉक इन) नागरिकांसाठीच असणार आहे. लसीकरणाच्या या मोहिमेमध्ये 20 टक्के पहिल्या डोससाठी तर 80 टक्के लसी ह्या दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Metro Job | आता मेट्रोमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण; अर्ज प्रक्रिया, पगार आणि पात्रता काय असेल जाणून घ्या