Yatra IPO | यात्रा IPO आणण्याची तयारीत | गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या
प्रवासी सेवा देणारी आघाडीची कंपनी यात्रा ऑनलाइन लिमिटेडचा आयपीओ आणण्याची तयारी सुरू आहे. यात्रेने यासाठी बाजार नियामक सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत. सेबीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांच्या (Yatra IPO) मसुद्यानुसार, या इश्यूद्वारे 750 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत 93,28,358 इक्विटी शेअर्स विकले जातील. ट्रॅव्हल ऑनलाईन लिमिटेडची मूळ कंपनी ट्रॅव्हल ऑनलाईन आयएनसी NASDAQ वर सूचीबद्ध आहे.
2 वर्षांपूर्वी