18 January 2025 3:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट
x

BSNL Recharge | आता केवळ 58 रुपयांपासून मिळणार BSNL चे स्वस्तात स्वस्त प्लान; मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवा

BSNL Recharge

BSNL Recharge| महागाईच्या या वाढत्या जगामध्ये इतर वस्तूंसह मोबाईल रिचार्ज देखील मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. परंतु तुम्ही BSNL यूजर असाल तर, ही खास बातमी तुमच्यासाठी. BSNL चे रिचार्ज प्लॅन केवळ 58 रुपयांपासून सुरू होतात. केवळ कॉलिंगच नाहीतर, असे देखील बरेच प्लॅन आहेत जे कॉलिंग बरोबर तुम्हाला डेटा देखील प्रदान करतात.

आज आपण बीएसएनएलचे 100 रुपयांपेक्षा कमी असलेले रिचार्ज प्लॅन पाहणार आहोत. ज्या व्यक्तींना जास्तीचा रिचार्ज न करता केवळ सिम कार्ड चालू राहण्यासाठी रिचार्ज करायचा असेल त्यांच्यासाठी बीएसएनएलचे 100 रुपयांच्या आत असलेले प्लॅन फायद्याचे ठरू शकतील.

बीएसएनएलचा 58 रुपयांचा रिचार्ज प्लॅन :

ज्या व्यक्तींना कमी किंमतीमध्ये लहान काळासाठी रिचार्ज प्लॅन हवा आहे. यामध्ये तुम्हाला 58 रुपयांचा हायस्पीड डेटा असलेला रिचार्ज प्लॅन मिळतो. परंतु कंपनी यामध्ये तुम्हाला कॉलिंग तसेच एसएमएस पॅक देत नाही. हायस्पीड डेटामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा वापरायला मिळतो.

98 रुपयांचा रिचार्ज प्लॅन :

हा प्लॅन तुम्हाला 18 दिवसांसाठी उपयोगी ठरू शकतो. यामध्ये 36 GB डेटा वापरायला मिळतो. म्हणजेच प्लॅननुसार दररोज 2GB डेटा वापरायला मिळते. समजा तुमचा डेटा दररोज संपत असेल तर, 40 kbps च्या स्पीडने 18 दिवस डेटा वापरण्यास मिळतो.

97 रुपयांचा रिचार्ज प्लॅन :

97 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग तसेच डेटा दोन्हीही गोष्टी वापरायला मिळतात. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा वापरायला मिळतो. समजा तुमचा 97 रुपयांचा डाटा संपला तरीसुद्धा 40 kbps च्या स्पीडने तुम्ही इंटरनेट वापरू शकता.

94 रुपयांचा रिचार्ज प्लॅन :

94 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुम्हाला परवडू शकतो. यामध्ये तुम्हाला एकूण 90 GB डेटा वापरायला मिळतो. यामधील दिवसाला तुम्हाला 3 GB डेटा मिळतो. 94 रुपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला जास्त व्हॅलिडीटी म्हणजेच तब्बल 30 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. यामध्ये नॅशनल त्याचबरोबर लोकल फोनसाठी 200 मिनिटे पर कॉल मिळतात.

87 रुपयांचा रिचार्ज प्लॅन :

87 रुपयांचा बीएसएनएलचा रिचार्ज तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला एकूण 14 दिवसांचा वेळ मिळतो. यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलचा फायदा घेऊ शकता. या बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही डेटा तसेच कॉलिंग चा फायदा घेऊ शकता. ज्या व्यक्तींना केवळ सिम कार्ड चालू ठेवण्यासाठी रिचार्ज करायचा असेल त्यांच्यासाठी बीएसएनएल रिचार्जचे सर्व पर्याय फायद्याचे ठरू शकतात.

Latest Marathi News | BSNL Recharge Monday 09 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#BSNL Recharge(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x