2 May 2025 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

प्रवासादरम्यान Google Map वर आधीच टोल टॅक्स कळणार | काय आहे नेमकं फीचर ?

Toll on Google Map

नवी दिल्ली, २६ ऑगस्ट | गुगल मॅपमुळे (Google Maps) अनेकदा प्रवास सोपा आणि आरामदायी वाटतो. रस्ता शोधणे, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या मार्गावर ट्रफिक आहे, याची माहिती गुगल मॅपमुळे मिळते. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना लोक गुगल मॅपला प्राधान्य देतात. युजर्सच्या सोयीसाठी येत्या काही महिन्यांत गुगल मॅप्सचे नवे अपडेट येणार आहे. नव्या फिचरमुळे गुगल मॅप मार्गात येणाऱ्या टोल्सची किंमतही सांगेल. यामुळे प्रवास सुरू करण्याआधीच प्रवासादरम्यान किती टोल टॅक्स भरावा लागेल, याची माहिती मिळेल.

प्रवासादरम्यान Google Map वर आधीच टोल टॅक्स कळणार – Google Map will tell users how much toll tax they have to pay :

कंपनी सध्या या फिचरवर काम करत आहे. आधीपासूनच गुगल मॅप देशातील मार्गांवरील टोल ओळखतात आणि दाखवतात. या आधीच्या फिचरचा वापर करत त्याला अपडेट करत युजर्सला टोलची अंदाजे किंमत देण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे

वेळेची बचत होणार:
मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी गुगल मॅप्समध्ये असे फीचर आणत आहे, जे प्रवासादरम्यान वाटेत पडणाऱ्या प्रत्येक टोलच्या शुल्काची माहिती देईल. यामुळे युजरच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल.

गूगलकडून सर्वेक्षण पूर्ण:
प्रीव्यू प्रोग्रामच्या एका सदस्यला या फीचरवर काम करताना पाहिलं गेलं आहे. टोलची किंमत कशी डिस्प्ले होते, हे फीचर लागू करण्यासाठी यूजरचे सर्वेक्षण करताना पाहिले गेले आहे. यूजर्ससाठी हे फीचर कधी आणलं जाणार, किती वेळ लागेल याबाबत गूगलकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

टोलनाक्यांची यादी जाहीर केली जाईल:
माध्यमांच्या अहवालांनुसार, गुगल मॅपचे हे फीचर यूजर्सना वाटेत पडणाऱ्या सर्व टोलचे स्थान तसेच त्यांच्या शुल्काची माहिती मिळेल. या व्यतिरिक्त ही यादी गुगलद्वारे देखील जारी केली जाईल.

हे वैशिष्ट्य कधी आणणार याबाबत सांगितले नाही:
हे असे एक वैशिष्ट्य आहे जे गूगल मॅप Waze अॅपवरून घेत आहे. कंपनीने 2013 मध्ये त्याला अधिकृत केले. वेझ अॅप आपल्याला टोल प्लाझाबद्दल माहिती देते. अॅपने तीन वर्षांपूर्वी टोल कराची संपूर्ण माहिती देणे सुरू केले. वेझ मॅपिंग फीचरमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चिली, कोलंबिया, डोमिनिकन रिपब्लिक, इस्रायल, लाटविया, न्यूझीलंड, पेरू, पोलंड, स्पेन, यूएसए आणि इतर देशांचा समावेश आहे. मात्र, गुगल हे फिचर कधी आणणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. तसेच, हे वैशिष्ट्य केवळ अमेरिकन वापरकर्त्यांसाठी असेल किंवा कंपनी ते भारतीय वापरकर्त्यांना देखील देईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Google Map will tell users how much toll tax they have to pay.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या