14 December 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Twitter Elon Musk | ट्विटरकडे सरकारच्या आदेशचं पालन करण्याशिवाय पर्याय नसतो, आम्ही तसं न केल्यास ट्विटर बंद केलं जाईल - एलन मस्क

Twitter Elon Mask

Twitter Elon Musk | ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी शेतकरी आंदोलना दरम्यान मोदी सरकारला विरोध करणारे ट्विटर अकाउंट बंद करण्यासाठी मोदी सरकारकडून दबाव आणल्याचा दावा केला होता. या दाव्यावर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, ट्विटरला स्थानिक सरकारच्या आदेशाचे पालन करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे स्थानिक सरकारचे आदेश पाळले नाहीत तर ट्विटर बंद केलं जाऊ शकतं असं एलोन मस्क यांनी म्हटले आहे.

मस्क म्हणाले की, अमेरिकेचे नियम आपण संपूर्ण जगाला लागू करू शकत नाही. या नियमांतर्गत जास्तीत जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील. एका मुलाखतीत डॉर्सी म्हणाले होते की, भारताने व्यासपीठावर दबाव आणला. आपल्या कार्यकाळात परदेशी सरकारांनी केलेल्या दबावाची काही उदाहरणे देण्यास सांगितल्यावर त्यांनी भारताचे उदाहरण देत सांगितले की, आम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकू, जे त्यांनी केले. नियमांचे पालन न केल्यास तुमची कार्यालये बंद राहतील. आणि हा भारत, एक लोकशाही देश आहे.

भारत हा असा देश आहे जिथून शेतकरी आंदोलनादरम्यान आम्हाला अनेक मागण्या येत होत्या. सरकारवर टीका करणाऱ्या काही पत्रकारांबद्दल. एकप्रकारे आम्ही भारतात ट्विटर बंद करू, असे आम्हाला सांगण्यात आले होते.

पंतप्रधान मोदींनी घेतली मस्क यांची भेट
पंतप्रधान मोदी आणि एलन मस्क यांची न्यूयॉर्कमध्ये भेट झाली आहे. पंतप्रधानांशी झालेल्या भेटीनंतर मस्क म्हणाले की, मी मोदींचा फॅन आहे. पंतप्रधान मोदींनी खरोखरच भारतासाठी योग्य गोष्टी कराव्यात अशी त्यांची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

इलॉन मस्क म्हणाले की, “मी भारताच्या भविष्याबद्दल खूप उत्सुक आहे. जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारताकडे अधिक क्षमता आहे. ते (पंतप्रधान मोदी) खरोखरच भारताची काळजी करतात कारण ते आम्हाला भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करत आहेत असं म्हटलं.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Twitter Elon Musk talked on action from Indian govt check details on 21 June 2023.

हॅशटॅग्स

#Twitter Elon Mask(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x