1 December 2022 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Limit | खासगी नोकरदारांना आता 25000 रुपये पेन्शन मिळणार, तुमचे पैसे 333 टक्क्यांनी असे वाढणार पहा ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या Talathi Bharti 2022 | राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती, त्वरित ऑनलाइन अर्ज करा PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांची भरती, पटापट अर्ज करा
x

Viral Video | मनुष्य प्राणी जंगल बळकावतोय, बिबटे सोडा आता गेंडे सुद्धा भर वस्त्यांमध्ये घुसत आहेत, व्हिडिओ व्हायरल

Viral video

Viral Video | गेंड्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात रस्त्यावर एक गेंडा धावताना दिसत आहे. रस्त्यावरचा गेंडा पाहून लोक अचंबित झाले. ज्या भागात हा गेंडा दिसला आहे, त्याची स्वतःची कथा आहे. बेफामपणे धावणारा गेंडा पाहून तो कुणाच्याही घरात शिरू नये, असा विचार प्रत्येकाच्या मनात घोळत होता.

गेंड्याने धावत येऊन सरळ रस्ता धरला :
गेंड्याने धावत येऊन सरळ रस्ता धरला आणि आपल्या लपण्याच्या दिशेने गेला, ही दिलासा देणारी गोष्ट होती. वस्तीत प्रवेश केल्यानंतर गेंड्यालाही अस्वस्थ वाटत होते. ज्यामुळे तो अतिशय वेगाने रस्त्यावर धावत होता. रस्त्यावर धावणाऱ्या गेंड्याचा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, “जेव्हा मानवी वस्ती गेंड्याच्या अधिवासात जाते… शहरात भटकणाऱ्या गेंड्यांच्या बाबतीत गोंधळून जाऊ नका. त्या अधिकाऱ्याचा अर्थ असा होता की गेंड्याने वस्तीत प्रवेश केला नव्हता, वस्तीच गेंड्याच्या भागात शिरली होती. मग ते कुठे जाणार? देशातील जवळपास प्रत्येक जंगलात हीच परिस्थिती आहे. वन्यप्राण्यांच्या चालण्या-फिरण्याच्या व राहण्याच्या ठिकाणी वस्त्या तयार झाल्या असून लोक राहू लागले आहेत. अशा परिस्थितीत जंगलातील प्राणी कुठे जाणार?

मात्र, सुसंता नंदा यांनी हा व्हिडिओ कुठे आहे, हे सांगितले नाही. सोशल मीडियावरील अनेक युझर्सनीही हा प्रश्न विचारला आहे. जंगलातून रस्त्यावर पोहोचणाऱ्या गेंड्यासाठी अनेक युझर्सनी मानवजातीला जबाबदार धरलं आहे. जेव्हा जंगलापर्यंत वस्ती बांधली जाईल, तेव्हा प्राण्यांना रस्त्यावरून चालणं आणि धावणं ही सामान्य गोष्ट होईल, हे योग्य नाही, असं युझर्सचं म्हणणं आहे.

व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Rhinoceros was seen running on the road IFS officer shared video viral on social media 14 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x