1 May 2025 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Vastu Shastra | जीवनात सकारात्मक बदल | घराच्या मुख्य दरवाजा वर करा हे बदल

Positive changes in life, Feng Shui, Indian Vastu Shastra, Marathi News ABP Maza

मुंबई, ४ सप्टेंबर : प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. यशस्वी होण्यासाठी माणूस हरतऱ्हेने प्रयत्न करत असतो. त्याच्या यशाची सुरूवात घरातून होते. त्यामुळे घरातील वस्तू या नेहमी वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे असते.

घर एक असे ठिकाण असते जिथे व्यक्तीला शांती तसेच प्रसन्नता मिळते. कामावरून घरी आले की घरात प्रसन्न वाटले पाहिजे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरातही काही बदल कऱण्याची गरज असते. घराचा मुख्य भाग असतो ते म्हणजे प्रवेशद्वार. घराच्या दरवाजावर अशा काही वस्तू ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे सकारात्मक बदल होईल.

मुख्य दरवाजाची दिशा वास्तुशास्त्राचा एक महत्त्वाचा भग असतो. घराचा दरवाजा पूर्व दिशेला असल्यास सगळ्यात उत्तम मानले जाते. यामुळे आयुष्यात नेहमी विजय, सुख तसेच शुभ घटना घडतात. उत्तर दिशेला दरवाजा असल्यास ते कुबेराचे दार मानले जाते. या दिशेला दरवाजा असल्यास धन तसेच सुखप्राप्ती होते.

काचेचे भांडे:
घराच्या प्रवेशद्वारावर काचेचे भांडे जरूर ठेवा. यात सुगंधित फुले टाका. यामुळे घरात सकारात्मकता येईल. तसेच आनंदही घरात येईल. माळा – अनेकांच्या घराच्या प्रवेशाद्वारावर माळा तुम्ही पाहिली असेल. घराच्या दरवाजावर पिंपळ, आंबा अथवा अशोकाच्या पानांची माळ लावा.

यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. तसेच घरात समृद्धी येईल. लक्ष्मीची पावले – घराच्या मुख्य दरवाजावर लक्ष्मीची पावले नक्की लावा. तसेच ही पावले लावताना त्यांची दिशा घराच्या आतील दिशेस हवीत.

लक्ष्मी घरात प्रवेश करत आहेत अशी लावावीत. यामुळे घरात समृद्धी येते. शुभ-लाभ – घराच्या मुख्य दरवाजावर शुभ-लाभचे निशाण असणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सुख आणि समृद्धी निवास करते.

स्वस्तिक:
लक्ष्मीची पावले, शुभ-लाभ या व्यतिरिक्त स्वस्तिकचे निशाणही घराच्या दरवाजावर लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने सौभाग्य आणि समृद्धी वेगाने वाढते.

मोठा दरवाजा: घराचा मुख्य दरवाजा हा इतर दरवाजांच्या तुलनेत मोठा असला पाहिजे याची काळजी घ्या. तसेच हा दरवाजा घड्याळाच्या दिशेने उघडला पाहिजे. घराच्या समृद्धीसाठी हे शुभ मानले जाते.

महत्वाची टीप : सदर माहिती पारंपरिक पद्धतीने अनुभवलेली तसेच सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास प्रोत्साहन देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये ही विनंती.

 

Important Note: This information is based on traditional experience as well as social and religious beliefs. This is not intended to spread or promote superstition. Therefore, it is a request that no one should be misunderstood.

News English Summary: According to Vastu Shastra, the main entrance to a home is not only the entry point for the family, but also for energy. Considered as the “archway to victory and progress in life”, the main door should face north, east or in the north-east direction.

News English Title: Made positive changes in life with Indian Vastu Shastra Marathi News LIVE Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vastu Shastra(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या