28 April 2024 6:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

लोकांना अटक करुन खटला सुरु असतानाच शिक्षा द्यायची अशीच तपास यंत्रणेची कार्यपद्धती - मुकुल रोहतगी

Mukul Rohatgi express anger over NCB role

मुंबई, 30 ऑक्टोबर | आर्यन खानला मुंबई हायकोर्टात जामीन मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे भारताचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी NCB च्या तपासावर आपलं मत व्यक्त केलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत रोहतगी यांनी आर्खन खान प्रकरणातील न्यायालयीन डावपेचांची बाजू (Mukul Rohatgi express anger over NCB role) उलगडून दाखवली.

Mukul Rohatgi express anger over NCB role. Former Attorney General of India Mukul Rohatgi has expressed his views on the NCB’s probe. In an exclusive interview with India Today, Rohatgi defended the court maneuvers in the Arkhan Khan case :

आर्यन खानविरुद्ध NCB कडे कोणताही पुरावा नव्हता आणि त्यांनी गरजेपेक्षा जास्त केस खेचली असं वक्तव्य रोहतगी यांनी केलं आहे. या प्रकरणात दोन महत्वाचे पैलू निगडीत असल्याचं रोहतगी यांनी सांगितलं. यातला पहिला आणि महत्वाचा पैलू म्हणजे आर्यन खानजवळ कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलं नव्हतं आणि दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे तो अरबाझ मर्चंटसोबत त्या क्रुझवर गेला होता.

आर्यनने ड्रग्ज सेवन केल्याचा, मोठ्या प्रमाणात बाळगल्याचा किंवा पेडलिंग केल्याचा कोणताही पुरावा नव्हता. तरीही NCB ने commercial quantity च्या आधारावर ही केस तयार केली, जी नंतर गरजेपेक्षा जास्त खेचत गेली असंही रोहतगी यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात कोणत्याही प्रकारे ड्रग्ज सिंडीकेट सहभागी असल्याचं सांगणारा एकही पुरावा NCB कडे नव्हता. सेशन्स कोर्टातही माहिती असूनही ड्रग्ज बाळगण्याचा मुद्दा हा अवास्तव खेचला गेल्याचं रोहतगी म्हणाले.

बहुतांश प्रकरणांमध्ये न्यायालय आरोपीला जामीन नाकारतात पण अनेकदा लोकं हे विसरतात की १९७८ साली सर्वोच्च न्यायालयाने ‘bail is the rule and jail is the exception’ असं सांगितलं होतं. जर एखादा व्यक्ती अत्यल्प प्रमाणात अमली पदार्थाचं सेवन करत असेल आणि ही गोष्ट त्याने मान्य केली तर त्याला अटक करता येत नाही. जर त्या व्यक्तीने व्यसनमुक्ती केंद्रात जायची तयारी दाखवली तर त्याच्यावर खटलाही चालवता येत नाही. जर या गोष्टी करण्यासाठी त्याने नकार दिला तर कारवाई होऊ शकते, २००१ साली झालेल्या कायद्यात हेच म्हटलंय. परंतू दुर्दैवाने आता याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि सर्वांना एकाच चष्म्यातून पाहिलं जातं, असंही रोहतगी यांनी सांगितलं.

आपल्याला या प्रकरणात मोठ्या सूत्रधारांना पकडायचं आहे. यापैकी अनेक अमली पदार्थ हे भारताच्या सीमेवरुन आत आणलं जातं. तुम्ही अशा लोकांना पकडा आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या. इकडे तुम्ही ५-७ मुलांना पकडलंत, नंतर एक महिना गेला. NCB ला यामध्ये काय सापडलं? काहीच नाही…असं म्हणून रोहतगी यांनी NCB च्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. काही महत्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी काही ठराविक लोकांना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचंही रोहतगी म्हणाले.

यावेळी रोहतगी यांनी केंद्रीय तपासयंत्रणा आणि सरकारला महत्वाचा सल्ला दिला आहे. “या घटनेत सरकारला दोष देणं योग्य ठरणार नाही. सरकार आणि संसद यांच्यात एकवाक्यता असते. माझ्यामते तपास यंत्रणांना थोडसं आत्मपरीक्षण करायची गरज आहे. लोकांना अटक करुन खटला सुरु व्हायच्या आधी शिक्षा द्यायची हा कायद्याचा उद्देष नाही. परंतू सध्या तपास यंत्रणा अशाच पद्धतीने काम करत आहेत. अशावेळी सरकारने तपास यंत्रणांशी सल्लामसलत करुन त्या खरंच कायद्यातील तरतुदींप्रमाणे काम करत आहेत का हे तपासणं गरजेचं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mukul Rohatgi express anger over NCB role in Aryan Khan case.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x