14 November 2019 1:16 PM
अँप डाउनलोड

जनतेची दिशाभूल? एकाच नाट्यगृहाच भाजप व सेनेकडून वेगवेगळ्या तारखांना दोनवेळा भूमिपुजन

मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावमधील प्रभाकर पणशीकर नाट्यगृहाचे आणि टोपीवाला मंडई तसेच निवासी संकुलासह संयुक्त प्रकल्पाचे भूमिपूजन आज म्हणजे ३० जुलै’ला पार पडले. विशेष म्हणजे त्याच नाट्यगृहाचे आणि टोपीवाला मंडई’चे भूमिपूजन २८ जुलैला भाजपच्या स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते सुद्धा पार पडलं होत. त्यामुळे आज शिवसेनेने भूमिपूजनाचा कार्यक्रम आखला असताना भाजप कार्यकर्ते सुद्धा तेथे हजर झाले आणि मोठी घोषणाबाजी करण्यात आली.

वास्तविक प्रभाकर पणशीकर नाट्यगृहाचे आणि टोपीवाला मंडईचे दोनवेळा भूमिपूजन का असा प्रश्न स्थानिक जनतेला पडला आहे. केवळ श्रेयवादाच्या लढाईत सत्ताधारी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत असं चित्र आहे. एकाच नाट्यगृहच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रम वेगवेगळ्या तारखेला घेउन वरील दोन्ही पक्ष जनतेला मूर्ख बनवीत आहेत असं स्थानिक कुजबुजत आहेत.

वास्तविक सामान्यांच्या पैशातून म्हणजे करामधून उभं राहणार हे नाट्यगृह आणि टोपीवाला मंडई जणू भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या मोठ्या प्रशासकीय लढ्यातून उभं राहील आहे असा भास निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न दोन्ही सत्ताधारी पक्ष करताना दिसत आहेत असच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Shivsena(729)BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या