18 February 2025 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 50 रुपयांच्या खाली घसरणार, 6 महिन्यात 37% घसरला शेअर - NSE: SUZLON SBI Mutual Fund | SBI फंडाच्या मजबूत AUM असणाऱ्या योजना, डोळेझाकुन पैसा गुंतवा, 23 ते 34 लाख परतावा मिळेल SBI Mutual Fund | खुशखबर, आता महिना अवघ्या 250 रुपयात म्युच्युअल फंडातून पैसा वाढवा, SBI जन-निवेश SIP योजना लाँच EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांना महिना 7500 रुपये ईपीएफ पेन्शन मिळणार, अपडेट जाणून घ्या BEL Share Price | डिफेन्स शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RELIANCE GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, जीटीएल कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये
x

शिवसेनेला धक्का, अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग खडतर?

doctor Amol Kolhe, Shivsena, NCP

शिरूर : छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून एनसीपीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांचा आज पक्षप्रवेश होणार असल्याची वृत्त आहे. असं झाल्यास हा शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का आहे असंच मानलं जातं आहे. तसेच शिवसेनेचे शिरूरचे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांचा मार्ग खडतर झाला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात असाही कयास व्यक्त होतो आहे. अमोल कोल्हे यांच्यासह दोन माजी आमदारांचाही शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतो आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे पक्षप्रवेश करतील अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. बारामती येथील गोविंदबाग या शरद पवारांच्या निवासस्थानीच ही भेट झाली होती. त्यावळेी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडही त्यांच्यासोबत होते. या दोघांनीही शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे एनसीपीमध्ये प्रवेश करून शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x