अर्णब गोस्वामी! बातमीचं वृत्तांकन करताना जरा ताळतंत्र बाळगा: आनंद महिंद्रा

मुंबई : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाईदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची पाकिस्तान सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक संसदेत केली. सदर वृत्तानंतर देशभरात आनंद व्यक्त करण्यात वातावरण पसरलं आहे. परंतु, मागील काही दिवसांत भारतीय वृत्तवाहिन्यांनी पुलवामा आणि विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात असतानाचं केलेलं वृत्तांकन अनेकांच्या पचनी पडलेलं नाहीये. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध भारतीय प्रसारमाध्यमांनाच हवं आहे, त्यामुळे या वाहिन्यांवर निर्बंध घालावेत अशी मागणी देखील समाज माध्यमांवरून होताना दिसते आहे.
दरम्यान, याच मागणीचा संदर्भ देत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी, रिपब्लीक टिव्हीच्या ट्विटर हँडलवर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना, ‘बातमीचं वृत्तांकन करताना जरा ताळतंत्र बाळगा’ असा सल्ला पत्रकार अर्णब गोस्वामी यांना दिला आहे.
मी सहसा कोणत्याही प्रसारमाध्यमांच्या धोरणांवर मत व्यक्त करत नाही. मात्र प्रसारमाध्यमांनी अभिनंदन भारतात सुखरुप परतण्याच्या प्रक्रियेमध्ये खोडा घातला जाईल असं वृत्तांकन करता कमा नये. अर्णब आपण वृत्तांकन करताना ताळतंत्र बाळगायलाच हवं…अशा आशयाचा संदेश देत महिंद्रा यांनी प्रसारमाध्यमांचे कान टोचले आहेत.
I rarely comment on media postures. But the prime objective now is to allow our soldier to come home safely. This is not the time to jeopardise that event with such calls for celebration… Arnab, please, we must exercise restraint… https://t.co/kXgX65XcQP
— anand mahindra (@anandmahindra) February 28, 2019
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
ED Vs Xiaomi | शाओमी कंपनीचा ईडीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Inflation Effect | महागाईने तुम्हाला घेरलं | गृहोपयोगी उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू महागणार
-
Stock Market Crash | गुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटींचे नुकसान | सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला
-
FirstMeridian Business Services IPO | फर्स्टमेरिडियन बिझनेस सर्व्हिसेस IPO लाँच करणार | तपशील जाणून घ्या
-
Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
-
Rainbow Children's Midcare IPO | रेनबो चिल्ड्रन मिडकेअरचा शेअर उद्या लिस्ट होणार | तज्ज्ञ काय सांगतात?
-
Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला