VIDEO - तुमच्या राज्यात विनापरवानगी आलो | राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी
पुणे, 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पुण्यात शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत होते. अजित पवार जेव्हा राज्यपालांचं स्वागत करण्यास पोहोचले होते, तेव्हा राज्यपालांनी आपल्या शैलीत चांगलीच कोपरखळी अजितदादांना लगावली.
पुणे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कौन्सिल हॉल इथं हा सोहळा पार पडला. राज्यपाल ध्वजारोहण सोहळ्यासाठी पोहोचले असता त्यांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थिती होते.
अजित पवारांचा पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर वचक आहे. राज्यपाल कोश्यारी यांनाही हे माहिती आहे. राज्यात सध्या पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील ‘संघर्ष’ वादाचे स्वरूप घेऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पवार कुटुंबीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर बैठका सुरु आहेत. पार्थ पवार यांच्या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावरून अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. यानंतर तातडीने अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. तसेच शुक्रवारीही बैठकांचे सत्र सुरु होते.
अजितदादांना पाहताच राज्यपाल म्हणाले की,’आपके राज्य में हम आपकी बिना परमिशन के आ गए है’. राज्यपाल असं म्हटल्यामुळे अजितदादांनीही स्मित हास्त करत ‘असे काही नाही’ म्हणून राज्यपालांचं स्वागत केलं. राज्यपालांच्या या कोपरखळीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Independence Day 2020 | ‘आपके राज्य में हम आपकी बिना परमिशन के आ गए है’. राज्यपाल असं म्हटल्यामुळे अजितदादांनीही स्मित हास्त करत ‘असे काही नाही’ म्हणून राज्यपालांचं स्वागत केलं. pic.twitter.com/pgYfhsICUB
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) August 15, 2020
News English Summary: Seeing Ajit Pawar, the Governor said, “We have come to your state without your permission.” Ajit Pawar also smiled and welcomed the Governor saying ‘there is nothing like that’. Due to this corner of the governor, there is a good discussion in the political circles.
News English Title: Video Pune We came to your state without permission said Governor Bhagat Singh Koshari to Deputy CM Ajit Pawar News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट