अमेरिकेचे टिकटॉकला ९० दिवसांत संपत्ती विकण्याचे आदेश | ट्रम्प प्रशासनाकडून झटका
वॉशिंग्टन, 15 ऑगस्ट : ट्रम्प यांनी बाइटडान्सला अमेरिकन यूझर्सकडून घेण्यात आलेल्या अथवा कुठल्याही प्रकारचा डाटा परत देण्यासही सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील टिकटॉचा व्यवसाय विकत घेण्यासंदर्भात मायक्रोसॉफ्टची बाइटडान्ससोबत चर्चा सुरू आहे. एवढेच नाही, तर मायक्रोसॉफ्ट अथवा इतर कुठलीही कंपनी टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय विकत घेऊ शकली नाही तर देशात टिकटॉक बॅन करण्यासाठी 15 सप्टेंबर ही तारीख डोनाल्ड ट्रम्प यांनी निश्चित केली आहे. त्यांनी यासदर्भातील कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे.
“काही विश्वसनीय माहिती मिळाली असून चिनी कंपनी बाईटडान्स असं काही काम करू शकते ज्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे,” असं ट्रम्प यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. तसंच अर्थव्यवस्था. परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला हे अॅप धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे, की ‘डेटा कलेक्शनमुळे चिनी कम्युनिस्ट पार्टी अमेरिकन लोकांच्या खासगी माहितीपर्यंत पोहोचते. यामुळे चीन अमेरिकन कर्मचारी आणि ठेकेदारांची ठिकाणं ट्रॅक करू शकतो. एवढेच नाही, तर कम्युनिस्ट पार्टी खासगी माहितीचा ब्लॅकमेलिंगसाठी आणि कॉर्पोरेट हेरगीरीसाठीही वापर करू शकतो,’ असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
News English Summary: President Donald Trump issued an executive order Friday evening directing ByteDance, the Chinese-owned parent company of TikTok, to divest interest in the app’s US operations within the next 90 days.
News English Title: Trump Orders Bytedance To Divest Interest In Us Tiktok Operations Within 90 Days Security Reason News latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट