महत्वाच्या बातम्या
-
रेमडेसिविर लोकांची गरज होती, मदतीसाठी केंद्राकडे न जाता फडणवीस पोलीस ठाण्यात गेले, ही शरमेची बाब
रेमडेसिविर इंजेक्शन्सचा वाद अजून पेटत आहे. यावर राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे प्रसार माध्यमांना माहिती देताना म्हणाले की, “भाजप नेते माझ्याकडे रेमडेसिविर उत्पादक ब्रुक कंपनीच्या मालकास १५ एप्रिल रोजी घेऊन आले. त्या वेळी कंपनीने निर्यात साठा विक्रीची राज्यात परवानगी देण्याची मागणी केली. रेमडेसिविर औषध राज्याला मिळेल या उदात्त भूमिकेतून माझ्या विभागाने १६ एप्रिल रोजी काही कंपन्यांना रेमडेसिविरचा निर्यात साठा राज्यात विक्री करण्यास संमती दिली होती. माझ्या विभागाने जेव्हा रेमडेसिविरची या कंपन्यांकडे मागणी नोंदवली, तेव्हा या कंपन्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
2 दिवसांपूर्वी -
मी सुद्धा विरोधी पक्षनेता होतो, पण फडणवीसांसारखा कुत्र्या-मांजराचा खेळ खेळलो नाही - खडसे
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या सर्वात जास्त सक्रीय रुग्ण आढळून येत आहे. नवीन सक्रीय रुग्ण येण्याच्या बाबतीत राज्य सध्या देशात पहिल्या नंबरवर आहे. महाराष्ट्र राज्यात जानेवारी ते मार्च महिन्यातील 361 सक्रीय रुग्णांचे सॅम्पल घेण्यात आले. दरम्यान, त्यामध्ये जीनोम सीक्वेंसिंग केले असता 220 नमुन्यात डबल म्यूटेशन व्हायरस आढळले होते. हे व्हायरस आता राज्यातील अमरावती, अकोला, पुणे, नागपूर, वर्धा, ठाणे, औरंगाबाद आदी जिल्हात आढळून आले आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.
3 दिवसांपूर्वी -
खडसेंकडून महाजनांच जळगावातील साम्राज्य खालसा करण्याची तयारी | जिल्हा परिषदही धोक्यात?
काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने जळगाव महानगरपालिकेत भाजपाला धूळ चारत स्वतःचा महापौर बसवला. त्यानंतर गिरीश महाजन यांना जोरदार धक्का दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ खडसे यांनी भाजपाला राम राम ठोकून राष्ट्र्वादीत प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी वेगाने हातपाय पसरत आहे.
11 दिवसांपूर्वी -
भाजपची सत्ता असलेल्या नाशिक पालिकेत ऑक्सिजन बेड मिळेना | कोरोना रुग्णांवर ठिय्या आंदोलनाची वेळ
भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत परिस्थिती गंभीर झाली आहे. मात्र महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे कोरोना रुग्णांना जीव देखील गमवावा लागू शकतो असे प्रकार घडत आहेत. तसाच एक भीषण प्रकार नाशिकमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय.
21 दिवसांपूर्वी -
मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ देखील यावेळी उपस्थित होते.
27 दिवसांपूर्वी -
फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी आयुक्तांमार्फत पैसे गोळा केलेले | मी त्यांना पुराव्यांसहित माहिती दिलेली
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहेत. हातातील सत्ता गेल्यापासून फडणवीस यांचे मानसिक संतुलन ढळत चालले. देवेंद्र फडणवीसांकडे आतापर्यंत केलेल्या एका तरी भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या प्रकरणाची चौकशी झाली का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे यांनी याबाबतचे पत्रक देवेंद्र फडणवीसांवर विविध आरोप केले आहेत.
29 दिवसांपूर्वी -
सांगली-जळगावातील कार्यक्रम ही तर नांदी | यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील - शिवसेना
सांगलीत, जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील! असा सूचक इशारा शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात याबाबतचे वक्तव्य करण्यात आले आहे.
1 महिन्यांपूर्वी -
शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक | जळगाव महापालिकेत भाजपचा पराभव आणि सेनेचा महापौर - वरुण सरदेसाई
जळगाव महापालिकेमध्ये सांगली पॅटर्न राबवत अखेर शिवसेनेनं भाजपला सत्तेवरून खाली खेचत भगवा फडकावला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सेनेनं तब्बल 45 मतं मिळवली आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे.
1 महिन्यांपूर्वी -
पक्षहित सोडून फडणवीस दिल्लीत वाझे-वाझे करत बसले | इकडे सेनेने जळगावची सत्ता खेचली
जळगाव महापालिकेमध्ये सांगली पॅटर्न राबवत अखेर शिवसेनेनं भाजपला सत्तेवरून खाली खेचत भगवा फडकावला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सेनेनं तब्बल 45 मतं मिळवली आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे.
1 महिन्यांपूर्वी -
जळगाव महानगरपालिका | महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाचा मार्ग खडतर
आज (१८ मार्च) जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान घेण्याला भारतीय जनता पक्षाने विरोध केला होता. भारतीय जनता पक्षाची अशी मागणी होती की, महापौरपदासाठी प्रत्यक्ष मतदान व्हावे. यासाठी भारतीय जनता पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती.
1 महिन्यांपूर्वी -
गिरीश महाजन पोकळ ठरले | जळगाव भाजपचे ३० नगरसेवक ठाण्यात | शिवसेनेच्या गळाला
शिवसेनेने जळगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या गडाला खिंडार पडली आहे. भारतीय जनता पक्षाचे ३० नगरसेवक ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या ५७ नगरसेवकांपैकी ३० नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
नितेश राणे आणि युवासेना वाद पेटणार | नाशिकच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी पत्रकारपरिषद घेत नितेश राणेंवर पलटवार केला होता. तसेच नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन, असेही वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.
1 महिन्यांपूर्वी -
जळगाव महापालिका | शिवसेनेकडून लोटसचं ऑपरेशन होण्याची शक्यता
शनिवारी (६ मार्च) शहरातील पद्मालय या शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांची राष्ट्रवादीच्या अशोक लाडवंजारी यांच्याशी ‘योगायोगा’ने झालेली भेट आणि चर्चा यांनी महापालिकेच्या राजकारणात वेगळाच योग घडवून आणला असून भारतीय जनता पक्षाचे २४ नगरसेवक १४ मार्चच्या दुपारपासून ‘नाॅट रिचेबल’ झाले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
नाशिक मनसे | सचिन भोसले यांना मध्य विधानसभा निरीक्षक पदावरून हटवलं | कारण...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षात गटबाजीच्या राजकारणाला आधीच पूर्णविराम देण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. राज ठाकरे यांनी यानिमित्तानेच काही दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांचे अहवाल मागविले होते. त्यालाच अनुसरून आता महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय.
1 महिन्यांपूर्वी -
खडसे चौकशीला सहकार्य करत असतील तर अटकेची गरज काय? | हायकोर्टाचा ईडीला सवाल
भारतीय जनता पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. जर खडसे ईडीच्या चौकशीला सहकार्य करत असतील तर, त्यांना अटक करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न न्यायालयाने ईडीला विचारला आहे.एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयात होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याने ८ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. त्यानंतर पुढील सुनावणीवर बोलत असताना न्यायालयाने पुन्हा एकदा खडसेंना दिलासा दिला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
VIDEO | राज ठाकरे नाशिकच्या माजी महापौरांना म्हणाले 'मास्क काढ'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे विनामास्क नाशकात आगमन झाले. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना “मास्क काढ” असा सूचक इशारा केला. त्यामुळे राज ठाकरेंच्या ‘विनामास्क आग्रहा’ची चर्चा रंगली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
तथ्यहीन वृत्त आणि उतावळ्या पोस्ट | थेट पोलिसाला, अधिकाऱ्याला कपडे काढून चोप देण्याची भाषा
जळगाव येथील मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावण्याच्या प्रकरणाची चौकशी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत येत्या दोन दिवसांत करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत केली होती. अधिवेशनाच्या काळात अशी निराधार वृत्त देताना विरोधकांना खाद्य मिळेल आणि सेल्फ ब्रॅण्डिंग करता येईल
2 महिन्यांपूर्वी -
महिलांच्या वसतिगृहात पुरुष पोलीस आत कसे जातील? | तथ्यहीन वृत्तांमुळे पोलिसांची बदनामी
जळगाव येथील मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावण्याच्या प्रकरणाची चौकशी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत येत्या दोन दिवसांत करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत केली होती.
2 महिन्यांपूर्वी -
खडसेंकडून लोटसचं ऑपरेशन | तब्बल ३१ आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला जबर दणका दिला आहे. भुसावळमधील तब्बल ३१ आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
नाशिकमधील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश
काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला होता. विशेष म्हणजे भाजप आमदार राम कदम यांना सर्वात मोठा धक्का देण्यात आला. भाजपचे स्थानिक नेते सुनील यादव यांच्यासोबत आमदार राम कदम यांच्या समर्थकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. तसेच मुंबईतील चांदिवली विधानसभेतील भाजप कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर मनसेचा झेंडा हाती घेतला.
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
सुप्रीम कोर्टाचे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित | न्यायाधीशांचं वर्क फ्रॉम होम
-
Health first | जाणून घ्या चिकू खाण्याचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
Health First | स्वयंपाकात जीरे वापरण्याने होतील हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
-
Health First | वरून काटेरी असणाऱ्या फणसाचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
वीकेंड लॅाकडाऊन | काय सुरू, काय बंद ? - सविस्तर
-
देशात 1.60 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची भर | 96,727 बरे झाले तर 880 रुग्णांचा मृत्यू
-
अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
-
कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन | आरोग्यमंत्र्यांनी दिली गुजरात आणि महाराष्ट्रातील आकडेवारी
-
आज प. बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान | IT सेलकडून पुन्हा संभ्रमाच्या अर्धवट क्लिप्स प्रसिद्ध
-
दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या | मुख्यमंत्री-शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय