14 September 2024 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News
x

Eknath Khadse Vs BJP | हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे - एकनाथ खडसे

Eknath Khadse Vs BJP

जळगाव , ०४ ऑक्टोबर | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर (Eknath Khadse Vs BJP) निशाणा साधला आहे. हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, अशा शायराना अंदाजात एकनाथ खडसे यांनी विरोधकांना इशारा दिला.

Eknath Khadse Vs BJP. NCP leader Eknath Khadse has once again targeted BJP leaders (Eknath Khadse Vs BJP). Now the subject of ED is over. So I’m not afraid of ED. The case is now in court :

जळगावात एका कार्यक्रमाला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, काय राहिलं आता आयुष्यात सत्तराव्या वर्षी. कशासाठी? कशासाठी हे लोकं बदनामी करत आहेत, असा सवाल खडसे यांनी केला.

यावेळी त्यांनी ईडीचा विषय पुन्हा एकदा छेडला. आता ईडीचा विषय संपला आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. आता प्रकरण कोर्टात आहे. मी फक्त कोर्टाला घाबरतो, असं त्यांनी सांगितलं. काहीही एक संबंध नसताना माझ्या जावयाला यांनी आत टाकले. आज मी ज्या पक्षांमध्ये आहे तो पक्ष राष्ट्रवादी माझ्या पाठीमागे खंबीर पणे उभा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

BHR घोटाळ्यातून महाजनांनी 10 कोटींची जमीन खरेदी केली:
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देण्याचा हा सिलसिला सुरू असतानाच एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर नवा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच आहे. हे मला कालच समजलं, असं सांगतानाच मी भाजपमध्ये असलेल्यांना सांगतो की, अरे भाजपवाल्यांनी माझे असे हाल केले. तुम्ही काय त्यांची हाजीहाजी करता. राष्ट्रवादीत या, असं आवाहन खडसे यांनी भाजपमधील नेत्यांना केलं.नाथाभाऊला महाराष्ट्रात बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. पण नाथाभाऊ त्यांना भारी आहे. गिरीश महाजन यांना मी आवाहन करतो की, मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल. या उलट बीएचआर घोटाळ्यातून तुम्ही 10 कोटींची जमीन खरेदी केली आहे. माझ्याकडे उतारे आहेत, असा दावा खडसे यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Eknath Khadse Vs BJP after ED against family.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x