23 September 2021 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर वाढला | पुढील 5 दिवस पुण्यालाही ऑरेंज अलर्ट

Rain Update

मुंबई , ११ सप्टेंबर | मागील आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दुसरीकडे मात्र काही भागात झालेला पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखावणारा ठरला. राज्यात सध्या अनेक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे. आज सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे परिसरात हलक्या पाऊस कोसळत आहे. सायंकाळनंतर याठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहेत. तसेच आजपासून पुढील पाच दिवस कोकण, घाट परिसर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर वाढला, पुढील 5 दिवस पुण्यालाही ऑरेंज अलर्ट – Rain alert for Konkan and Pune region for next 5 days :

या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट:
हवामान खात्यानं आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं आज पुणे रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना IMD कडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील पाच दिवस पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला:
संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.गेल्या आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. पुढील पाचही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून पुढील पाच दिवस पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Rain alert for Konkan and Pune region for next 5 days.

हॅशटॅग्स

#RainUpdates(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x