13 August 2022 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा Numerology Horoscope | 13 ऑगस्ट, अंकशास्त्रानुसार शनिवारसाठी तुमचा लकी नंबर, शुभ रंग आणि दिवस कसा असेल जाणून घ्या
x

नामांतर करताना मानहानी होऊन उद्रेक होणार नाही ना याचा विचार करावा – उदयनराजे

BJP MP Udayanraje Bhonsale, Aurangabad, Sambhajinagar

सातारा, ८ जानेवारी: औरंगाबाद नामांतरावरुन राज्यातलं राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. नामांतर झालंच पाहिजे, अशी भूमिका सेनेने घेतलीय तर काँग्रेसने नामांतराला कडाडून विरोध केलाय. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेत नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल, असं म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.

दरम्यान, यावर आता भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावर बोलताना असे म्हटले की, नामांतर करताना कोणाचीही मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याचा प्रत्येकाने सविस्तर विचार करावा, असे बोलत त्यांनी सरकारला सुनावले आहे.

पुढे संवाद साधताना ते असं म्हणाले की, तसेच शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे केवळ महाराज होते म्हणून ते ओळखले जात नव्हते. त्यांची कर्तबगारीमुळे आणि लोक हिताच्या निर्णयामुळे ते ओळखत होते. ज्याप्रमाणे बॉम्बेचे मुंबई झाले. त्याप्रमाणे पूर्वीपासून असलेल्या औरंगाबादच्या बाबतीत नाव बदलायचे की नाही याचा लोकशाहीनुसार लोक निर्णय घेतील. अशी ही भूमिका उदयनराजे यांनी स्पष्ट केली आहे. आता सरकार नामांतर करणार का की काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा करण्यात आल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असला तरी हा उल्लेख पूर्वीपासूनच सुरू असल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर डिसेंबरमधील मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती देताना काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या नावाने करण्यात आलेल्या ट्वीटमध्येही संभाजीनगर असा उल्लेख झालेला दिसून येतो.

 

News English Summary: Speaking on the occasion, Bharatiya Janata Party Rajya Sabha MP Udayan Raje Bhosale said, “Everyone should think in detail that there will be no outburst of defamation while changing the name.”

News English Title: BJP MP Udayanraje Bhonsale talked on Aurangabad renaming to Sambhajinagar news updates.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x