मुंबई : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी वादग्रस्त पुस्तकावरुन शिवसेनेवर तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्ला चढवला. जाणते राजे फक्त शिवाजी महाराजच आहेत, अन्य कोणी नाही, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर पलटवार केला.

“होय शरद पवार म्हणजे जाणता राजाच, हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अद्वितीय म्हणजेच शरद पवार. इथला पाणीप्रश्न, इथला शेतीचा प्रश्न, औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, नागरी वस्तीमधील प्रश्न, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न अशी प्रश्नांची मालिका सांगा, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्नांच उत्तर शरद पवारांकडे आहे, म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. म्हणून काहीजण सांगतात की त्यांचीच करंगळी धरून आम्ही राजकारणात आलो. जसे अनेकजण त्यांच्या करंगळीचा वापर करून राजकारणात आलेले आहेत. तसे अनेकजण त्यांच्यावर टीका करून हेडलाईनमध्ये आलेले आहेत. तेव्हा होय ते जाणते राजेच आहेत, तो जाणता राजाच आहे.

‘महिलांना 30 टक्के आरक्षण, कोकण रेल्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव, जेएनपीटी…असे किती प्रकल्प सांगू…त्यामुळे गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सर्वाधिक योगदान हे शरद पवार यांचंच आहे,’ असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आपल्याला वाईट वाटले. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कुणीही गाठू शकणार नाही, मात्र अलिकडे ‘जाणता राजा’ ही उपमाही दिली जाते. मी याचाही निषेध करतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज हेच आहेत. त्या सो कॉल्ड जाणत्या राजांना ही उपमा कुणी दिली माहीत नाही, अशी टीका भाजपचे नेते, माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केली.

 

Web Title:  Minister Jitendra Awhad criticizes former MP Udayanraje Bhonsale after Press conference.

मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का? : जितेंद्र आव्हाड