विवाहबाह्य संबंध | केवळ मार्केटिंगसाठी भारतीय महिलांची बदनामी | डेटिंग अॅपवर बंदीची मागणी
मुंबई, ०९ मार्च: जागतिक महिला दिनी ग्लिडेन या फ्रेंच डेटिंग अॅपने महिलांच्या डेटिंगबद्दलचा एक अहवाल प्रसिद्ध केला. काळाच्या ओघात लोकांची विचारसरणीही बदलत आहे. लोक आता सेक्स या गोष्टीला त्यांची गरज म्हणून स्वीकारत आहेत. अलीकडील काही सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, लोक आपल्या सेक्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लग्नानंतरही विश्वासघात करण्यास धजावत नाहीत. याबाबत ग्लोबल एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप, ग्लेडेनच्या (Gleeden) सर्वेक्षणात काही धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. या संशोधनानुसार, 43 टक्के पुरुषांच्या तुलनेत 53 टक्के भारतीय विवाहित महिलांनी हे मान्य केले आहे की, त्यांनी लग्नानंतरी इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत.
याबाबत ग्लेडेनचे मार्केटिंग संचालक म्हणाले ‘भारतीय स्त्रिया आता व्यभिचाराबद्दल खुल्या विचारांच्या झाल्या आहेत. खासकरून जेव्हा यात रोमान्सचा सहभाग असतो.’ हे ऑनलाइन सर्वेक्षण दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांतील 1500 लोकांद्वारे केले आहे. या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, विवाहित भारतीय महिला या विवाहित पुरुषांपेक्षा विवाहबाह्य संबंध अधिक ठेवतात. या अभ्यासानुसार, 26 टक्के पुरुषांच्या तुलनेत 40 टक्के विवाहित स्त्रिया इतर पुरुषांशी नियमित शारीरिक संबंध ठेवतात.
भारतातील जवळजवळ 50 टक्के विवाहित लोकांनी हे मान्य केले आहे की, त्यांनी आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतरांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. 48 टक्के भारतीयांचा असा विश्वास आहे की, एकाच वेळी दोन लोकांवर प्रेम केले जाऊ शकते. त्याच वेळी, 46 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, एखाद्याशी प्रेमसंबंध असतानाही व्यभिचार केला जाऊ शकतो. हेच कारण आहे की बहुतेक भारतीय लोक आपल्या जोडीदाराच्या बाहेरच्या अफेयरबद्दल समजल्यावरही त्याला माफ करतात. दुसरीकडे त्याच वेळी, 40 टक्के लोकांनी सांगितले आहे की, फसवणूक केल्याबद्दल क्षमा करणे हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
दरम्यान, ग्लिडेन या डेटिंग अॅपच्या अहवालावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. विधान परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
महिला दिनी विधान परिषदेत बोलताना आमदार मनिषा कायंदे यांनी या ग्लिडेनच्या सर्वेकडे लक्ष वेधलं. त्या म्हणाल्या,”आज महिला दिन आहे आणि आपण भारतीय महिलांच्या यशोगाथा वाचत असतो, ऐकत असतो. त्याचा उहापोह करतो आणि नेमकं अशाच दिवशी एक फ्रेंच अॅप आहे, ग्लिडेन नावाचं. या अॅपने असं म्हटलं आहे की, त्यांनी ६० कोटी लोकांचा सर्वे केला आहे. त्यात भारतीय महिलांचा देखील सर्वे केला आहे. मूळात हा अॅप एक डेटिंग अॅप आहे. ६० टक्के महिलांपैकी ४८ टक्के महिला विवाहबाह्य संबंध ठेवतात. भारतीय महिलांना बदनाम करण्याचा हा प्रकार आहे,” असं कायंदे म्हणाल्या. शेतकरी, कष्टकरी महिला आहेत. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या महिला आहेत. नेमकं महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी जो काही तथाकथित निष्कर्ष मांडला आहे. तो घृणास्पद आणि निंदनीय आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
केवळ मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी हे केलं असून, त्यासाठी भारतीय महिलांची बदनामी करणं निंदनीय आहे. चूल मूल सांभाळून महिला घराबाहेर पडतात. या अॅपवर बंदी आणावी, तसे निर्देश द्यावे,” अशी मागणी कायंदे यांनी केली आहे. त्यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी या अॅपवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्राशी चर्चा करावी असे निर्देश राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना दिले आहेत.
ग्लिडन या विकृत एक्स्ट्रामॅरिटल डेटिंग अँपने एक सर्वेक्षण करून महिलांचा बदनामीकारक सर्वे केल्याची माहिती आज सभागृहात सादर केली! भारतीय महिलांना व्यभिचारी ठरवणाऱ्या फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंगअँपवर भारतात बंदी घालण्याची मागणी केंद्र व महाराष्ट्र सरकारकडे केली आहे ! #womenpower pic.twitter.com/VMOmA5rbSs
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) March 8, 2021
News English Summary: Speaking in the Legislative Council on Women’s Day, MLA Manisha Kayande drew attention to this Gliden survey. She said, “Today is Women’s Day and we are reading and listening to the success stories of Indian women. There is a French app called Gliden on the same day. The app says it has surveyed 600 million people. It also surveyed Indian women. This app is basically a dating app. Out of 60 per cent women, 48 per cent have extramarital affairs.
News English Title: MLA Manisha Kayande drew attention to this Gliden survey news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News