महत्वाच्या बातम्या
-
मोदींसाठी पुण्यात भाजपचे इव्हेंट मार्केटिंग | विद्यार्थी रविवारी सुद्धा युनिफॉर्ममध्ये शाळेत | नेटिझन्सकडून टीका
आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन झालं आहे. सुरुवातीला पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण झालं. त्यानंतर MIT कॉलेजमध्ये मोदींची सभा पार पडली.
3 महिन्यांपूर्वी -
क्रुझ ड्रग प्रकरणातील NCB'च्या पंचची पंचायत थांबेना | किरण गोसावीविरुद्ध पुण्यात चौथा गुन्हा दाखल
आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी याच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फसणुकीचा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर यापूर्वी फरासखाना, वानवडी, लष्कर पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. सध्या तो लष्कर पोलिसांच्या (NCB Witness Kiran Gosavi) अटकेत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
मलिक यांनी भाजप आणि फडणवीसांना घेरताच ED आक्रमक? | राज्य वक्फ बोर्ड जमीन प्रकरणावरून ईडीची धाड
महाराष्ट्र वक्फ बोर्ड जमीन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली. ईडीने आज गुरुवारी पुण्यातील 7 ठिकाणी छापे टाकले. हे प्रकरण वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे वक्फ बोर्ड हे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयाच्या (Maharashtra ED raids in Pune) अखत्यारीत येते.
7 महिन्यांपूर्वी -
Rohit Pawar on Petrol Price | विमानाच्या इंधनापेक्षा पेट्रोल-डिझेल महाग... पुढे काय म्हणाले रोहित पवार?
देशात वाढत्या पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांमुळे विरोधी पक्ष नेते केंद्र सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत. या दरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील याविषयी चिंता (Rohit Pawar on Petrol Price) व्यक्त केली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Pune Minor Girl Murder | पुण्यातील बिबवेवाडीत एका अल्पवयीन मुलीची नात्यातील व्यक्तीकडून क्रूर हत्या
पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच या मुलीवर कोयत्याने वार करुन तिचा खून केलाय. विशेष म्हणजे आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने हे (Pune Minor Girl Murder) धाडस केलं आहे. समोर मुलीची हत्या होत असताना छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती.
8 महिन्यांपूर्वी -
Maharashtra Bandh | पुण्यात व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा | दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं बंद
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांविरोधातील जुलूमाविरोधात महाविकासआघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला असलेला व्यापाऱ्यांचा विरोध अखेर मावळला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी रविवारी (Maharashtra Bandh) आम्ही दुकाने सुरुच ठेवणार, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आज व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. व्यापारी महासंघाकडून सोमवारी तशी माहिती देण्यात आली.
8 महिन्यांपूर्वी -
Balasaheb Thorat To Ashish Shelar | भाजपाच्या नेत्यांना भाकीत करण्याची सवय, त्यांनी ज्योतिष बदलावा - थोरात
काल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यात लवकरच निवडणुका लागतील असं वक्तव्य केलं होतं आणि आता त्याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपातील काही नेत्यांना काहींना काही भाकीत करण्याची सवय आहे. मात्र, भाजपामध्ये जो ज्योतिष आहे, जो भविष्य बदलत असतो. तो आता त्यांना बदलण्याची गरज आहे, असा खोचक टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Pune & Pimpri Chinchwad SRA | पुणे, पिंपरी-चिंचवड मधील झोपडीधारकांना ३०० चौ.फुटांचा फ्लॅट मिळणार | पालकमंत्र्यांची घोषणा
राज्य सरकारने पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील झोपडीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या प्रारूप सुधारित नियमावलीत ही तरतूद करण्यात आली होती. आता मुंबई मध्ये पुणे आणि पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
पुणे महानगरपालिका निवडणूक | युतीच्या गप्पा सोडून स्वबळाच्या तयारीला लागा | राज ठाकरे यांचा संदेश
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही तसेच त्यासाठी भाजपाही इच्छुक असेल असे मनसे अध्यक्षांना वाटत नाही. .दुसरीकडे या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपशी युती करावी, असा संदेश मनसेच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. परंतु , आता हि चर्चा थांबवावी असा संदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना धाडल्याचे वृत्त आहे. तसेच पुण्यातही स्वबळाची तयारी करा असं देखील आवर्जून सांगितलं आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Pune Municipal Corporation Election | पुण्यात मनसेला हवी आहे भाजप सोबत युती | शहराध्यक्षांची प्रतिक्रिया
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. दरम्यान, पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी यावर प्रसार माध्यमांकडे भाष्य केलं आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Amazon eCommerce | अमेझॉन मुंबई पुणे येथे गोदामे उघडणार | १.१० लाख नवीन रोजगार निर्माण होणार
ई-कॉमर्समधील प्रमुख कंपनी अमेझोनने (Amazon eCommerce) पुणे व मुंबई येथे मोठी गोदामे घेतली आहेत. तसेच मुंबईतील गोदामांचा विस्तार केला आहे. अमेझॉन कंपनीने महाराष्ट्रामध्ये एकूण दहा गोदामे उघडली आहेत. नऊ दशलक्ष क्युबिक फूट इतकी यांची क्षमता आहे. वराळे या गावात नवीन गोदाम ऊघडले आहे, जे ‘ पूर्तता केंद्र ‘ आहे.
8 महिन्यांपूर्वी -
आमदाराची महिलेले शिवीगाळ | भाजपसारख्या नीचपणाच्या असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार - रुपाली चाकणकर
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनिल कांबळे यांनी पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला शिविगाळ करत धमकी दिल्याची त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महिला अधिकाऱ्यासोबत संभाषणची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार सुनील कांबळे यांनी ती जुनी असल्याची कबुली दिली. ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्यास कार्यकर्त्याच्या फोनवरून आमदार सुनील कांबळे यांनी फोन लावला होता.
8 महिन्यांपूर्वी -
महिला अत्याचार | भाजप आमदाराकडून महिला अधिकाऱ्याला अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ | भाजपचा दुतोंडी चेहरा उघड
पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या आमदाराची एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. अतिशय अर्वाच्य भाषेत भारतीय जनता पक्षाचे आमदार महिला अधिकाऱ्याला बोलत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून ऐकायला मिळतंय. ही ऑडिओ क्लिप राज्याच्या माजी सामाजिक न्यायमंत्र्यांच्या आमदार भावाची असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे आणि त्यामुळे समाज माध्यमांवर देखील तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
CBIC Recruitment 2021 | केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, पुणे 06 जागा
CBIC भरती 2021. वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय, पुणे झोन ने 06 इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी अधिकृत अधिसूचना आणि अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 15 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करू शकतात.
8 महिन्यांपूर्वी -
C-DAC Recruitment 2021 | C-DAC पुणे मध्ये 259 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
सी-डॅक भरती 2021. सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सीडीएसी) ने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 259 प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी आणि प्रकल्प सहाय्यक कर्मचारी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार सी-डॅक भारतीसाठी 25 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
8 महिन्यांपूर्वी -
Monster Employment Index | रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात पुण्याचा देशात दुसरा क्रमांक
रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत, पुणे बंगलोरनंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. 2020 च्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत या वेळी रोजगार निर्देशांक 40 टक्क्यांनी वाढला आहे. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सने (Monster Employment Index) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या काळात, लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तर मोठ्या संख्येने लोक त्यांच्या गावी परतले.
8 महिन्यांपूर्वी -
पिंपरी-चिंचवड | भाजप लाचखोर स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी, भाजपची कीव येते | भाजप नगरसेविकेचा आरोप
भारतीय जनता पक्ष हा लाचखोर स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी उभा राहत आहे. मात्र, जनतेसाठी तुरुंगवास भोगताना केलेल्या आंदोलनाला निंदनीय संबोधलं जातं, अशा शब्दात पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेविका आशा शेगडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 15 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या बोर्डावर आणि अभियंत्याच्या खुर्चीवर शाफी फेकल्याप्रकरणी शेडगे आणि त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आज भाजपवर तोंडसुख घेतलं.
8 महिन्यांपूर्वी -
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला धक्का | आ. लक्ष्मण जगतापांचे कट्टर समर्थक अरुण पवार, विष्णू शेळकेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीच पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘गळती’ सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंग जोरात सुरु आहे. आज भाजप पदाधिकारी आणि मराठवाडा जनसंघाचे अध्यक्ष अरुण पवार, भाजप सह्याद्री आदिवासी मंडळाचे विष्णू शेळके, मोशी भाजप युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
8 महिन्यांपूर्वी -
Sarkari Naukri | महा मेट्रो पुणे मध्ये 96 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
MMRCL पुणे भरती 2021. MMRCL पुणे भरती 2021. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे ने भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 96 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 14 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी महा मेट्रो पुणे भरती 2021 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
8 महिन्यांपूर्वी -
OBC Reservation | केंद्राचा इम्पेरिकल डेटा देण्यास नकार | मोदी सरकारचे ओबीसींवरचं प्रेम बेगडी - हरी नरके
राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहेत. दरम्यान आज महाराष्ट्रातील सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर केंद्र सरकारने उत्तर दिले आहे. राज्याला ओबीसी इम्पेरिकल डेटा देण्यास केंद्राने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. यामुळे सुनावणी आता चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे.
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Gold and Silver Price | सोन्या-चांदीची चमक वाढली | पाहा आजचा मुंबई आणि इतर शहरातील दर
-
Spam Calls Rules | आता तुमची स्पॅम कॉल आणि अज्ञात कॉल्सपासून सुटका होणार | जाणून घ्या सरकारची योजना
-
Prudent Corporate Advisory IPO | प्रूडेंट कॉर्पोरेट अॅडव्हायजरी शेअरची लिस्टिंग प्रथम जोमात नंतर कोमात
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Paytm Share Price | पेटीएमचा तोटा 762 कोटीवर पोहोचला | शेअर्सची किंमत अजून कोसळणार?
-
Aadhaar Card Photo | आधार कार्डचा फोटो बदलायचा की अपडेट करायचा आहे? | जाणून घ्या प्रक्रिया
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा