27 November 2022 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 28 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 28 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार? OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स
x

Video Viral | शिंदे गटाच्या महिला कार्यकर्तीने राहुल गांधींऐवजी सावरकरांवरच चप्पल उगारली, मारणार इतक्यात.. पहा व्हिडिओ

Video Viral

Video Viral | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्याबाबत विधान केलंय. त्याला आता कडाडून विरोध होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलीय.”स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही”, अशा शब्दात फडणवीस यांनी राहुल गांधी यांना इशारा दिलाय.

सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय. ज्या विचारांनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, तो विचार आम्ही मरु देणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणालेत. दरम्यान, आज राज्यात भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी निदर्शनं केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान केलेल्या एका भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर हे कसे माफीवीर होते, इंग्रजांकडून भत्ता घेत होते हे आपल्या भाषणात सांगितलं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप-बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राहुल गांधींविरोधात टीका करण्यात येत आहे. तसंच त्यांच्याविरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. इतकंच नाही तर खासदार राहुल शेवाळे यांनी भारत जोडो यात्रा थांबविण्याचीही मागणी केली.

शिंदे गटातील अज्ञानी कार्यकर्ते :
शिंदे गटाकडून पुण्यात सुद्धा आंदोलन करण्यात आलं आंदोलना. यावेळी शिंदे गटातील एक महिलेने राहुल गांधी समजून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या यांच्या प्रतिमेला चप्पल मारण्याचा प्रयत्न केला. मारत धक्कादायक प्रकार घडणार इतक्यात एका पदाधिकाऱ्यांना हात उंचावून ओरडत इकडे मारा असा इशारा करत त्या महिला कार्यकर्तीला रोखल्याचं व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसतंय. प्रतिमेतील राहुल गांधी कोण आणि सावरकर कोण हे सांगण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आल्याचं दिसतंय. या गोंधळाचा व्हिडिओ समोर आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Viral of Shinde camp karyakarta protest against Rahul Gandhi video trending on social media check details 17 November 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x