27 July 2024 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

याचना नाही आता युद्धच, पंतप्रधान निवासस्थानावर आपचा मोर्चा

नवी दिल्ली : आप पक्षाने मोदी सरकारविरोधात दंड थोपटले असून थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा घेऊन जात गेले. दिल्लीच्या मंडी हाऊस ते पंतप्रधान निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

दिल्लीतील नायब राज्यपालांऐवजी अरविंद केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान निवासस्थानावर मोर्चा घेऊन त्यांनाच घेरण्याची तयारी केली. त्यामुळे दिल्लीतील या राजकीय हालचालीने आप आणि भाजपमधील संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. आपचे खासदार संजय सिंह, दिलीप पांडे आणि पक्षाचे इतर नेते व कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते.

आपने नायब राज्यपालांऐवजी थेट पंतप्रधानांनाच लक्ष करण्याची रणनीती आखल्याने दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. ट्विटर वरून आप’ने या आरपारच्या लढाईची घोषणा केली. त्यात आप’ने स्पष्ट म्हटलं आहे की,’याचना नाही आता युद्धच होणार’. पोलिसांना सुद्धा बॅरिकेटचा अडथळे उभे केले होते, परंतु ते आपच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावत मंडी हाऊस पर्यंत धडक दिली. तसेच मोर्चाला परवानगी नसल्याचे सुद्धा दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मागील आठवड्यापासून एलजी हाऊसमध्ये धरणे देत आहेत आणि त्यानंतर हे राजकारण पेटलं आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि आपमधील संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x