फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते...कारण | शिवसेनेचा गौप्यस्फोट

मुंबई, ११ जानेवारी: भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा घातलेला आहे. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते, पण नारायण राणे भारतीय जनता पक्षाला शरण गेले,” असा धक्कादायक गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. “या गुन्ह्यात माजी मुख्यमंत्री फडणवीस नितेश राणेंना तुरुंगातही टाकणार होते,” असा दावाही त्यांनी राऊत यांनी केला आहे. राज्याच्या राजकारणात विनायक राऊत यांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चा सूरू होण्याची शक्यता आहे.
कणकवलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना खासदार विनायक राऊत यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. या गुन्ह्याप्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती एक ओपन झाली तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्यानं आरोप प्रत्यारोप झडताना बघायला मिळतात. त्यातच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्याबद्दल खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. कणकवलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना राऊत म्हणाले,”नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला १२ कोटींना गंडा घातला होता. या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती.
News English Summary: Bharatiya Janata Party MLA Nitesh Rane has given a bribe of Rs 12 crore to a person. He was supposed to be imprisoned by the then Chief Minister Devendra Fadnavis, but Narayan Rane surrendered to the Bharatiya Janata Party, ”said Shiv Sena MP Vinayak Raut. “Former Chief Minister Fadnavis Nitesh Rane was also to be jailed for this crime,” he claimed. Vinayak Raut’s statement is likely to start a new discussion in state politics.
News English Title: Devendra Fadnavis was about to arrest MLA Nitesh Rane says Shivsena MP Vinayak Raut news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
The Elephant Whisperers Documentary | भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' शॉर्ट फिल्मला मिळाला ऑस्कर पुरस्कार, पाहा VIDEO
-
Naatu Naatu Won Oscar Awards 2023 | 'नाटू नाटू'ला बेस्ट सॉन्ग श्रेणीत ऑस्कर पुरस्कार, अभिनयाला स्टँडिंग ओव्हेशन
-
Poddar Pigment Share Price | ही स्मॉल कॅप कंपनी लवकरच लाभांश वाटप करणार, रेकॉर्ड तारीख पाहून पैसे लावा
-
Twitter Vs Meta | ट्विटरसारखं अॅप आणण्याच्या तयारीत मेटा, कधीही लाँच होण्याची शक्यता
-
Google Pixel 7a 5G | गुगल पिक्सल 7 ए स्पेसिफिकेशन लीक, 64 MP कॅमेऱ्यासह हे फीचर्स मिळतील, जाणून घ्या डिटेल्स
-
Harley-Davidson X350 | हार्ले-डेव्हिडसन X350 बुलेट लाँच, जाणून घ्या 350 सीसी हार्ले डेव्हिडसनची वैशिष्ट्ये
-
Income Tax Update | टॅक्स पेयर्सना अलर्ट! पैसे वाचविण्यासाठी 31 मार्चपर्यंत हे काम करणे आवश्यक, अन्यथा मोठं नुकसान होईल
-
Multibagger Stocks | म्युच्युअल फंड कंपन्या हे शेअर्स खरेदी करून 252% पर्यंत परतावा कमावत आहेत, गुंतवणूक करणार?
-
Multibagger Stocks | या बँकिंग शेअर्सचा धुमाकूळ, 145 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय, सरकारी बँकेचे स्वस्त शेअर्स सुद्धा
-
IFL Enterprises Share Price | लॉटरी शेअर! 1 वर्षात गुंतवणूकदारांना 951% परतावा, प्लस स्टॉक स्प्लिट आणि फ्री बोनस शेअर्स, डिटेल्स पाहा