27 June 2022 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | दर महिन्याला गुंतवा 1302 रुपये | मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख | योजनेबद्दल जाणून घ्या Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या
x

भाजप-सेनेच्या राज्यात उदयोग सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर: जागतिक बँक

मुंबई : उद्योग संपन्न म्हणून अनेक वर्ष देशभर परिचित असणार महाराष्ट्र राज्य उदयोग सुलभतेच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात समोर आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र उदयोग सुलभतेच्या बाबतीत देशातील पहिल्या दहा राज्यांच्या यादीत सुद्धा नाही. अगदी झारखंड आणि छत्तीसगड सारखी मागासलेली समजली जाणारी राज्य सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे आहेत असं हा जागतिक बँकेचा रिपोर्ट सांगतो.

उदयोग सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य पहिल्या दहा राज्याचा यादीतून सुद्धा बाहेर फेकला गेला आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार उदयोग सुलभतेच्या बाबतीत आंध्र प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे मालमत्तेची नोंदणी, कामगार नियमन निकष, पर्यावरण विषयक नोंदणी व परवाने, जमिनीची उपलब्धता, बांधकाम परवाने आणि इतर आवश्यक परवानग्या अशा अनेक निकषांमध्ये इतर राज्य पुढे निघून गेली आहे.

त्यामुळे जागतिक बँकेच्या या अहवालामुळे विकासाचे ढोल वाजविणाऱ्या भाजप आणि शिवसेना सरकारचे पितळ उघड पडलं आहे. एकूणच महाराष्ट्राच्या उद्योग नीतिची पोलखोल जागतिक बँकेच्या या अहवालात झाली आहे. महाराष्ट्रा पेक्षा खूप पिछाडीवर असलेली राज्य सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे निघून गेली आहेत असं हा रिपोर्ट निर्देशित करतो आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x