26 September 2020 8:29 PM
अँप डाउनलोड

कर्नाटक, भाजप अध्यक्षपदाच्या अखेरच्या डावातही तोंडघशी

बंगळुरू : कर्नाटक निवडणुकीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उतरली खरी पण इथे सुद्धा काही क्षणातच तोंडघशी पडली आहे. भाजपकडून अध्यक्षपदाच्या शर्यतीत एस. सुरेश कुमार यांना उतरवलं खरं, परंतु निवडून येण्यासाठी आवश्यक असणार संख्याबळच नसल्याने अखेर एस. सुरेश कुमार यांनी माघार घेतली आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भाजपने विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार दिल्याने जेडीएस आणि काँग्रेस युतीकडे आवाहन निर्माण होईल असं सुरवातीला वाटलं होत. परंतु भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांचे उमेदवार एस. सुरेश कुमार यांनी माघार घेतली आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांचे अभिनंदन केले. विधानसभा अध्यक्षपदाचा मान-प्रतिष्ठा राखण्यासाठी आम्ही उमेदवाराचं नाव मागे घेतलं, असं येडियुरप्पांनी स्पष्ट केलं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1318)BJP(421)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x