28 June 2022 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत
x

पालघर नगरपरिषदेवर युतीला सर्वाधिक जागा, पण नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

Palghar, Congress, NCP, BVA, BJP, Shivsena

पालघर : पालघर नगरपरिषद निवडणूकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. परंतु, नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला केदार काळे या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे नगरपरिषदेमध्ये युतीने झेंडा फडकावला असला तरी नगराध्यक्षपदी एनसीपीच्या उमेदवार विराजमान होणार. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यात येतो. यामध्ये मतदारांनी नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे यांना निवडणूक दिले आहे.

पालघर नगरपरिषदेच्या एकूण १४ प्रभागांमधील २८ जागांचे आज निकाल जाहीर झाले. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर नगरपरिषदेची निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले होते. शिवसेना-भाजप-रिपाइं युती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा सामना येथे रंगला. ९० उमेदवारांनी आपले नशीब अजमावले होते. यामध्ये भाजप-शिवसेना-रिपाई युती सरकारने बहुमत मिळवत एकूण २१ जागेवर झेंडा फडकावला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला २ आणि अपक्षांनी पाच जागा जिंकल्या.

नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून आयात केलेल्या श्वेता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला काळे, तर शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार अंजली पाटील, असे तीन उमेदवार उभे होते. त्यापैकी राष्ट्रवादीच्या उज्वला काळे यांनी १०६९ मतांनी विजय मिळवला.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x