12 December 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना
x

फडणवीसांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होणार: चंद्रकांत पाटील

BJP State President Chandrakant Patil, Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar

मुंबई: राज्यात जनतेने भारतीय जनता पक्ष -शिवसेना महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं लवकरच सरकार स्थापन होणार आहे, असं सांगतानाच सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केलं.

महायुतीचं सरकार स्थापन करण्याबाबत भारतीय जनता पक्ष-शिवसेनेतील चर्चा बंद आहे. दोन्ही पक्षातील नेते प्रसारमाध्यमातून वेगवेगळे दावे करत आहे. भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्यास शिवसेना सत्ता स्थापन करेल असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणत आहेत. दरम्यान, सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.

यावेळी महायुतीच्या चर्चेसंदर्भातील चेंडूही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या कोर्टात टोलावला. ”राज्यात महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्या जनादेशाच आदर करून आम्ही सरकार स्थापन करू. शिवसेनेकडून सत्तास्थापनेबाबत कुठलाही प्रस्ताव आम्हाला मिळालेला नाही. आता ते लवकरात लवकर प्रस्ताव देतील अशी अपेक्षा आहे. शिवसेनेसाठी भारतीय जनता पक्षाची दारे २४ तास खुली आहेत. आम्ही शिवसेनेची वाट पाहू,”असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x