12 August 2020 11:55 AM
अँप डाउनलोड

शिवसेना लवकरच मुख्यमंत्री पदावरून पलटी मारण्याची शक्यता: सविस्तर

Shivsena, BJP Maharashtra

मुंबई : शिवसेना मुख्यमंत्री पद घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं म्हणणारे लवकरच तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. कारण सर्व खटाटोप हा केवळ इतर महत्वाची मलईदार मंत्रिपदं पदरात पाडून घेण्याच्या चर्चा पडद्याआड सुरु होत्या आणि लवकरच त्या पूर्णत्वाला येताच शिवसेना पलटी मारण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. भारतीय जनता पक्षाकडेच संपूर्ण कार्यकाळ म्हणजे ५ वर्षे मुख्यमंत्रिपद आणि त्यामोबदल्यात शिवसेनेला मलईदार महत्त्वाच्या खात्यांसह निम्मी मंत्रिपदे, असा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला जवळपास पडद्याआड निश्चित झाला असून याची घोषणा पुढील १-२ दिवसांत होईल, अशी माहिती प्रसार माध्यमांच्या हाती आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

समोरासमोर सत्तास्थापनेबाबत दोन्ही पक्षांमध्ये थेट चर्चा सुरू झाली नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू मध्यस्थांमार्फत मागील ८ दिवस सर्व बोलणी सूर होत्या अशी माहिती पुढे आली आहे. त्या माध्यमातूनच हा फॉर्म्युला निश्चित केला गेला असल्याचं समजतं. पडद्याआड सर्व सुरळीत असल्याचं माहित असल्यानेच फडणवीस आणि उद्धव ठाकरे इतर कामात आणि दौऱ्यात बिनधास्त व्यस्त होते. परंतु शिवसेनेने खासदार संजय राऊत यांना केवळ माध्यमांवर पुड्या सोडण्यासाठीच ठेवलं होतं का असा प्रश्न

निकालाच्या दिवसापासूनच सत्तास्थापनेचा पेच महाराष्ट्रासमोर आहे. शिवसेनेने वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं संजय राऊत यांनी वारंवार सांगितलं. तसंच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार का? अशाही चर्चा रंगल्या. असं सगळं वातावरण असतानाच सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाल्याचं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजतं आहे. भाजपाने याआधी शिवसेनेला १३ मंत्रिपदं ऑफर केली होती. मात्र मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडायचा असेल तर निम्मी मंत्रिपदं द्या अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला असून, लवकरत महायुतीचे सरकार स्थापन होईल असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर म्हटले होते. शिवेसेना लवकरच आम्हाला प्रस्ताव देईल आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे २४ तास उघडे असल्याचे पाटील म्हणाले होते. भारतीय जनता पक्ष सर्वांना सोबत घेऊनच सरकार स्थापन करेल असेही पाटील म्हणाले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(113)#Shivsena(900)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x