अन्यथा अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोप येणार नाही - मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, २८ जून : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार काल सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र आता शरद पवरांवरील विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, बिनलायकीचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्याविषयी जी व्यक्तव्यं केली त्याचा मी निषेध करतो. शिव्यांची मालिका आता सुरु झाली आहे. गोपीचंद पडळकरांना आम्ही अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोपा येणार नाही. यांना रात्री जागून काढाव्या लागतील, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला. तसेच गोपीचंद पडळकरांच्या विधानामागे बोलवते धनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील आहे, असा आरोप देखील हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ बोलत होते.
News English Summary: Now senior NCP leader Hasan Mushrif has also targeted Gopichand Padalkar over his statement on Sharad Pawar. Minister Hasan Mushrif said, “I condemn the remarks made by BJP MLA Gopichand Padalkar about the country’s leader Sharad Pawar.
News English Title: Senior NCP leader Hasan Mushrif has also targeted Gopichand Padalkar over his statement on Sharad Pawar News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स फोकसमध्ये, स्टॉक प्राईस पुन्हा हा टप्पा ओलांडणार - NSE: JIOFIN
-
TATA Motors Share Price | 861 रुपये टार्गेट प्राईस, नुवामा ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग, फायदा घ्या - NSE: TATAMOTORS
-
Wipro Share Price | विप्रो IT शेअर्समध्ये 4.64 टक्क्यांची घसरण, पण पुढे अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
Suzlon Share Price | 30 टक्के परतावा मिळेल, सुझलॉन शेअर्सबाबत अपडेट, तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या - NSE: SUZLON
-
GTL Infra Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 52 पैसे, 508% परतावा देणाऱ्या पेनी स्टॉकमध्ये तेजी - NSE: GTLINFRA
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | टोल महसुलात 18% वाढ, मल्टिबॅगर आयआरबी इन्फ्रा शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग सुरु - NSE: IRB
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
-
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजी, एलारा कॅपिटलने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS