15 December 2024 9:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

शेतकरी आंदोलन | 30 तारखेपर्यंत तोडगा निघतो का त्याची वाट पाहू | अन्यथा

NCP President Sharad Pawar, Modi government, Farmers protest

मुंबई, २८ डिसेंबर: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला तरी त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवारांनी शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला 30 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. 30 डिसेंबरपर्यंत तोडगा न काढल्यास विरोधी पक्षाला त्याचा विचार करावा लागेल, असा इशाराच पवारांनी दिला आहे. (NCP President Sharad Pawar warned Modi government over farmers protest)

मागील महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत आले आहेत. आज त्यांनी काही विरोधी पक्षनेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या आहेत. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारला सज्जड इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यातून काही मार्ग निघणार नाही का? सर्वजण आत्महत्येच्याच मार्गाने जाणार आहेत का? त्यामुळे राजकीय पक्षांनाही याबाबतचा विचार करावा लागेल. आता केंद्राने 30 तारखेला शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. ठिक आहे. 30 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यातून तोडगा निघाला नाही तर आम्हाला बसावं लागेल. विरोधी पक्षांना त्याचा विचार करावा लागेल, असा इशारा पवारांनी दिला आहे.

पुढे शरद पवार म्हणाले, “मला वाटतं सरकारनं संपूर्ण आंदोलनं अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं. यावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाऊ शकतो. मी असंही ऐकलंय की आंदोलनादरम्यान चार ते पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर हे देशासाठी चांगलं नाही.” (Sharad Pawar said that I think the government should take the whole agitation very seriously)

दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारमधील कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर सध्याच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या भूमिकेवरुन टीका केली आहे. तोमर यांनी म्हटलं की, मनमोहन सिंग आणि शरद पवार यांची कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याची इच्छा होती.

 

News English Summary: Although the farmers’ agitation in Delhi has been going on for a month, it has not been resolved yet. Therefore, NCP President Sharad Pawar has come into action mode. Sharad Pawar has given a deadline of December 30 to the Center to resolve the farmers’ agitation. If a solution is not reached by December 30, the Opposition will have to consider it, Pawar has warned.

News English Title: NCP President Sharad Pawar warned Modi government over farmers protest news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x