16 December 2024 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

नितीश कुमार यांनी राजकीय बॉम्ब टाकला, 2024 मध्ये बिगरभाजप सरकार स्थापन झाल्यास सर्व मागास राज्यांना विशेष राज्याचा दर्जा देणार

Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु करताना दिसणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली आहे. देशात बिगरभाजप सरकार स्थापन झाल्यास सर्व मागास राज्यांना विशेष दर्जा दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केल्याने भाजपच्या दिल्लीश्वरांची झोप उडाली आहे. बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून ते काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सतत भेटी घेत आहेत.

बिहारमधील सत्ताधारी आघाडीतून भाजपची हकालपट्टी झाल्यानंतरच मुख्यमंत्री कुमार पंतप्रधानपदासाठी दावा करू शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांनी स्वत: याचा इन्कार केला आहे. अलिकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव जेव्हा बिहारमध्ये पोहोचले, तेव्हा नितीश कुमार पंतप्रधानपदाच्या दाव्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर चर्चा फिरवताना दिसले.

प्रशांत किशोर यांची भेट घेऊन चर्चाही केली :
मंगळवारी रात्री निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि सीएम कुमार यांच्या भेटीनंतर चर्चांना वेग आला आहे. सोमवारी सी.एन.ने माजी मुत्सद्दी पवन वर्मा यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. किशोर आणि कुमार यांच्या भेटीत त्यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातंय. या चर्चेबाबत कुमार म्हणाले होते, “त्यांच्याकडून जाणून घ्या. विशेष असं काही घडलं नाही.

2020 मध्ये वर्मा आणि किशोर यांची जनता दल (युनायटेड) मधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील तृणमूल काँग्रेसमध्ये वर्मा यांनी प्रवेश केला. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांनी टीएमसीशी फारकत घेतली. विशेष म्हणजे किशोर आणि कुमार यांची ही भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा दोघेही एकमेकांवर शाब्दिक हल्ले करत होते.

नितीश कुमार यांनी घेतली या नेत्यांची भेट :
गेल्या आठवड्यात दिल्लीत मुख्यमंत्री कुमार यांनी सीपीएम नेते सीताराम येचुरी, सीपीआय नेते डी. राजा यांची त्या कार्यालयांमध्ये भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही यावेळी उपस्थित होते. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आयएनएलडी नेते ओमप्रकाश चौटाला यांच्याशी त्यांनी गुरुग्राममध्ये चर्चा केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Loksabha Election 2024 Bihar CM Nitish Kumar political meets check details 16 September 2022.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2024(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x