21 March 2023 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम? IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा
x

Tata Group Stocks | टाटा के साथ नो घाटा, हा शेअर तेजीत, 5 दिवसांत 50 टक्के परतावा, 3 महिन्यांत पैसे झाले दुप्पट

Tata Group Stocks

Tata Group Stocks | टाटा समूहाचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना कधीही निराश करत नाही. असाच एक स्टॉक आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत नफा कमावून दिला आहे. टाटा समूहाच्या या स्टॉकने फक्त 5 दिवसात आपल्या भागधारकांना 50 टक्के पेक्षा अधिक परतावा दिला आहे. टाटा समूहाचा हा स्टॉक अवघ्या 3 महिन्यांत इतका वाढला आहे की, शेअर बाजारात तो आता मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत सामील झाला आहे. ह्या कंपनीचे नाव आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन.

शेअरने दिला भरघोस परतावा :
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन च्या शेअर्स मध्ये मागील काही ट्रेडिंग सेशन पासून चांगली वाढ पाहायला मिळाली आहे. ह्या स्टॉकने मागील 5 दिवसातच जबरदस्त वाढ नोंदवली असून आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 50 टक्के चा घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. टाटा समूहाचा हा स्टॉक कमालीची कामगिरी करत आहे. अवघ्या 3 महिन्यांत हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत सामील झाला आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ही टाटा समूहातील गुंतवणूक उद्योग चालवणारी प्रॉफिटेबल कंपनी आहे. टाटा इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्समध्ये 3 महिन्यांत 110 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी ह्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली होती त्यांचे पैसे आता 3 महिन्यांत दुप्पट झाले असणार.

5 दिवसांत दिला 50 टक्केपेक्षा अधिक परतावा :
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्स मध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फक्त 5 दिवसांत 50 टक्केचा नफा झाला आहे. 9 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1803.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 15 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE मध्ये 2830 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 5 दिवसांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि थोडा संयम ठेवला असता तर आज तुमची गुंतवणूक मूल्य 1.56 लाख रुपये झाली असती.

3 महिन्यांत पैसे दुप्पट :
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनमध्ये ज्या लोकांनी पैसे गुंतवले होते, फक्त 3 महिन्यांत त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत. 20 जून 2022 रोजी या टाटा समूहाच्या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर 1231.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.15 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2830 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 20 जून 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या तुमचे गुंतवणूक मुख्य 2.30 लाख रुपये झाले असते.

50 रुपये पासून 2800 रुपयांपर्यंत प्रवास :
मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 115 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी, 2022 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कंपनीच्या स्टॉकमध्ये कमालीची वाढ झाली असून, गुंतवणूकदारांनी त्यातून 94 टक्के पेक्षा अधिक नफा कमावला आहे. मागील 5 वर्षात कंपनीच्या शेअर्स लोकांना 195 टक्के इतका भरमसाठ परतावा देऊन खुश केले आहे. 24 ऑगस्ट 2001 रोजी टाटा च्या या गुंतवणूक उद्योग करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बीएसईवर 49.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 15 सप्टेंबर 2022 रोजी टाटा समूहातील “टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड” कंपनीचे ​​शेअर्स 2830 रुपये किमतीवर व्यवहार करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Investment corporation of Tata Group of companies has increased on 16 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x