23 September 2021 2:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Tokyo Olympics 2020 | भारताला कुस्तीमध्ये सिल्व्हर मेडल, रवी दहियाचा रशियन कुस्तीपटूकडून पराभव

Tokyo Olympic 2020

टोकियो, ०५ ऑगस्ट | कुस्तीच्या आखाड्यात रवी दहियाकडून सुवर्णपदकाची आशा संपली आहे. 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रवीचा दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या जॉर उगुऐवकडून पराभव झाला. रवी आता रौप्य पदकासह भारतात परतणार आहे. उगुऐवने त्याला 3 गुणांनी पराभूत केले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

उगुऐवला रशियाचा सर्वोत्तम कुस्तीपटू मानले जाते:
द्वितीय मानांकित उगुऐवने 2018 आणि 2019 विश्व अजिंक्यपद पटकावले आहे. त्याला रशियातील सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक मानले जाते. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 15 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 14 पदके जिंकली आहेत. यापैकी 12 सुवर्णपदके आहेत. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याला काही कठीण सामन्यांना सामोरे जावे लागले. उपांत्य फेरीत त्याने इराणच्या रझा अत्रिनाघर्चीनीचा सहज पराभव केला.

रवीने उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवला:
चौथ्या मानांकित रवी दहियाने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या नुरिस्लामचा पराभव करून सामना जिंकला. रवी उपांत्य फेरीत 8 गुणांनी पिछाडीवर होता. तो पराभूत होईल असे वाटत होते, परंतु 1 मिनिट शिल्लक असताना रवीने कझाक कुस्तीपटूला चित केले आणि त्याला सामन्यातून बाहेर काढले. विक्ट्री बाय फॉल रुलद्वारे त्याला विजेता घोषित करण्यात आले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Tokyo Olympic 2020 Ravi Kumar Dahiya has won silver medal in Wrestling news updates.

हॅशटॅग्स

#Olympics 2020(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x