15 December 2024 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

आज दुपारी प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज

ISRO, PSLV, Satellite, Mission chandrayaan 2, Mission chandrayaan 1

श्रीहरीकोटा : भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण व्हायचे आहे.

‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले की, तत्पूर्वी १५ जुलै रोजी ठरलेले प्रक्षेपण ज्या तांत्रिक अडचणीमुळे ऐन वेळी पुढे ढकलावे लागले होते, ती अडचण दूर करण्यात आली असून, रॉकेट प्रक्षेपणासाठी पूर्णपणे तयार आहे.

सिवान म्हणाले की, शनिवारी सायंकाळी प्रक्षेपक रॉकेटची आणि इतर अनुषंगिक यंत्रणांची पुन्हा एकदा पूर्णांशाने रंगीत तालीम घेण्यात आली. त्यात कोणतीही अडचण किंवा दोष न आढळल्याने प्रक्षेपणासाठी उलटी गणती सुरू झाली आहे. आधी ३ वेळा पुढे ढकललेले प्रक्षेपण १५ जुलै रोजी पहाटे व्हायचे होते. त्यासाठी श्रीहरिकोट्याच्या अंतराळ तळापाशी उभारलेल्या दर्शक दीर्घेमध्ये जगभरातील पत्रकारांसह अनेक मान्यवरही जमले होते, परंतु उड्डाणाला अवघी ५६ मिनिटे शिल्कक असताना प्रक्षेपक रॉकेटमध्ये काही बिघाडाचा संशय आल्याने सावधगिरी म्हणून प्रक्षेपण थांबविण्यात आले होते.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान इस्रोने अंतराळातील शत्रूचे सॅटेलाईट पडण्याच्या पराक्रम केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या हवा निर्मितीसाठी अप्रत्यक्षरीत्या शास्त्रज्ञांना त्यांच्या मेहनतीवर प्रथम त्यांना काहीच बोलू न देता, स्वतःच सर्व माहिती देशाला देत ‘अंतराळात सर्जिकल स्ट्राईक’ असा बातम्या पेरून स्वतःच्या सार्कची वाहवा करून घेतली होती. त्यामुळे आजच्या प्रक्षेपणानंतर इस्रोतील शास्त्रज्ञांना त्यांच्या अथक मेहनतीवर व्यक्त होण्याची संधी मिळणार की पुन्हा मोदी स्वतःच सर्व ताबा घेऊन, आपल्या सरकारचे गुणगान करणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#PSLV(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x