महत्वाच्या बातम्या
-
कोरोना आपत्ती | दररोजच्या मृतांच्या आकड्यामध्ये भारत पुन्हा एकदा जगात टॉपवर
सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी 2.50 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. खरेतर चांगली गोष्ट म्हणजे रविवारच्या तुलनेत यामध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात 2 लाख 56 हजार 828 लोक संक्रमित झाले आहेत. रविवारी 1.75 लाखपेक्षा जास्त लोक पॉजिटिव्ह आढळले होते. पहिल्यांदाच विक्रमी 1 लाख 54 हजार 234 लोकही बरे झाले. यापूर्वी एका दिवसात सर्वात जास्त 18 एप्रिलला 1.43 लाख लोक रिकव्हर झाले होते.
3 दिवसांपूर्वी -
Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल
कोरोच्या दुसऱ्या लाटेतील स्थिती अधिक गंभीर आहे. विशेष म्हणजे ब्राझिलमधील या संसर्गाच्या स्फोटाला रोखण्यात अपयश आलं तर संपूर्ण जगात कोरोना स्फोट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ब्राझिलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत आहे. दिवस-रात्र कबरी खोदण्याचं काम सुरु आहे. जेणेकरुन मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांकडून अधिक संसर्ग न होता त्यांच्यावर लगेचच अंत्यसंस्कार करता येतील. ब्राझिल कोरोना मृत्यूंच्या यादीत सर्वात पुढे आहे. रविवारी ब्राझिलमध्ये 37,017 नवे कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळले.
6 दिवसांपूर्वी -
कोरोना जगात दिर्घकाळ राहणार | 78 कोटी लोकांच्या लसीकरणानंतरही वाढता प्रभाव - WHO
कोरोना महामारीचा संसर्ग जगामध्ये झपाट्याने वाढत चाललेला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस ॲडनोम गॅबियिसस यांनी कोरोनाचा संसर्ग जगात दिर्घकाळ टिकून राहण्याचा इशारा दिला आहे. टेड्रोस यांनी जगातील आशिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणावर चिंता व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, जगात आजघडीला 78 कोटी लोकांचे लसीकरण झाले असून तरीदेखील कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही आहे.
8 दिवसांपूर्वी -
जगातील सर्वात कडक लॉकडाऊन | ब्रिटनमध्ये तब्बल ९७ दिवसांनी अनलॉक प्रक्रिया सुरु
देशभरात कोरोना संसर्ग वेगाने वाढतोय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती तयार झालीय. महाराष्ट्रातही तिच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात जवळपास लॉकडाऊन लागणार हे निश्चित झालंय. त्यामुळे संपूर्ण देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आर्थिक गणितांवरही याचा मोठा परिणाम होणार आहे.
9 दिवसांपूर्वी -
हुशार व्यवस्थापन | आधी भारतातल्या लसी जगभर पाठवल्या | आता जगभरातल्या लसी भारतात
देशातील लसीचा तुटवडा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जगभरातील ज्या लसीचा अत्यावश्यक वापर केला जात आहे. त्या सर्व लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणार आहे. यामध्ये यूएस फूड अॅन्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, युरोपियन मेडिसिन एजन्सी, यूके, पीएमडीए, एमएचआरए आणि जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केलेल्या सर्व लसींचा समावेश आहे. यापुर्वी देशात रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
10 दिवसांपूर्वी -
रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही - WHO
राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत चालले आहे. राज्य सरकारकडून लवकरच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी देण्याची घोषणा केली आहे.
10 दिवसांपूर्वी -
कोरोना आपत्ती, महागाई, बेरोजगारी | ब्राझीलमध्ये 2 कोटी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर
ब्राझीलमध्ये कोरोना वाढत आहे. एकीकडे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. स्मशानात जागा शिल्लक नाही. दुसरीकडे, दोन कोटी लोक कोरोनामुळे निर्माण स्थितीमुळे भुकेचा सामना करत आहेत. स्थिती अशी आहे की, एकूण २१.१ कोटी लोकसंख्येपैकी जवळपास अर्ध्या लोकांना व्यवस्थित जेवणही मिळत नाहीये. ब्राझीलच्या अन्न सार्वभौमत्व आणि पोषण सुरक्षा संशोधन नेटवर्कच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.
10 दिवसांपूर्वी -
.. तर कोविडचं वाढतं प्रमाण पाहता भारत दुसरा ब्राझील होईल - डॉ. एरिक फीगल-डिंग
देशात २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
11 दिवसांपूर्वी -
शहाणपण सुचलं | केंद्र सरकारने रेमडेसीवर’ची निर्यात थांबवली
वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. जोपर्यंत देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीरचे इंजेक्शन बाहेर देशात निर्यात केले जाणार नाही; असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
11 दिवसांपूर्वी -
राफेल लढाऊ विमान खरेदीत बोगस व्यवहार | भारतातील दलालांना करोडोचे गिफ्ट - फ्रेंच मीडिया
राफेल लढाऊ विमान घोटाळा फ्रेंच मीडियामुळे पुन्हा जगभरात चर्चेत आले आहे. फ्रान्सच्या एका वेबसाइटने देसॉ एव्हिएशनकडून बोगस व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. या मीडियाने फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था AFA दाखला देऊन रिपोर्ट जारी केला. कंपनीच्या 2017 च्या खात्यांचे ऑडिट करण्यात आले. त्यानुसार, 5 लाख 8 हजार 925 यूरो अर्थात जवळपास 4.39 कोटी रुपये क्लाइंट गिफ्टच्या नावे खर्च करण्यात आले आहेत. इतकी मोठी रक्कम गिफ्ट कशी असू शकते याचे अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विमानाचे मॉडेल बनवणाऱ्या कंपनीचे केवळ मार्च 2017 चे एक बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे.
18 दिवसांपूर्वी -
लॉकडाऊनच्या परिणामाबद्दल मी आधीच सतर्क केलं होतं | त्यांना ते काही महिन्यांनंतर कळलं - राहुल गांधी
जगभरात कोरोना संकट कोसळलं तसं ते गेल्यावर्षी भारतातही आलं. त्याच्या काही दिवसांनी मोदी सरकारने देशवासियांना कोणतीही कल्पना न देता आणि कोणतीही पूर्वतयारी न करता थेट लॉकडाऊनची घोषणा केली होती. अगदी आरोग्य यंत्रणांबाबतही तोच प्रकार अनुभवायला मिळाला होता. त्याचे गंभीर परिणाम देशाला भिगावे लागले. त्याचा मोठा परिणाम म्हणजे बेरोजगारी प्रचंड वाढली आणि आर्थिक पीछेहाट होण्यात इतिहास रचले गेले. आज पुन्हा तीच परिस्थिती देशावर ओढवली आहे आणि त्यामुळे अनेक विषय पुन्हा चर्चेला येण्याची शक्यता आहे.
20 दिवसांपूर्वी -
अमेरिका | कॅपिटॉलमध्ये हल्ल्यात एका पोलीसाचा मृत्यू | घटनेनंतर कॅपिटॉलमध्ये लॉकडाऊन जाहीर
अमेरिकेतील कॅपिटॉलमध्ये अद्यापही हिंसाचार सुरूच आहे. एका वाहनाने धडक दिल्याने तिथे एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. हा एक कथित हल्ला असून या घटनेमुळे कॅपिटॉलमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय.
20 दिवसांपूर्वी -
फायजरची लस 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी 100% परिणामकारक | कंपनीचा दावा
कोरोना लस तयार करणारी फार्मा कंपनी फायजर-बायोएनटेकने दावा केला आहे की, त्यांची लस 12 ते 15 वर्षांच्या मुलांवर 100% परिणामकारक आहे. CNN ने सांगितल्यानुसार, कंपनीने बुधवारी म्हटले की, अमेरिकेत 2,250 मुलांवर झालेल्या फेज थ्री ट्रायल्समध्हे ही लस 100% परिणामकारस असल्याचे सिद्ध झाले आहे. दुसरा डोस दिल्याच्या एका महिन्यानंतर त्यांच्या शरीरात चांगला अँटीबॉडी रिस्पॉन्स पाहायला मिळत आहे.
22 दिवसांपूर्वी -
संतापजनक | भारतीयांना नव्हे...तर मोदी सरकारकडून परदेशात सर्वाधिक लसीचा पुरवठा
देशात कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस भयावह होत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी 62,276 नवीन रुग्ण आढळले. 30,341 बरे झाले आणि 292 जणांचा मृत्यू झाला. सर्वात जास्त वाईट परिस्थिती महाराष्ट्राची आहे. येथे एका दिवसात 36,902 संक्रमित आढळले. हा आकडा 11 सप्टेंबरला आलेल्या पहिल्या सर्वोच्च स्तरापेक्षाही दीडपट जास्त आहे. तेव्हा येथे 24,886 प्रकरणे समोर आली होती.
26 दिवसांपूर्वी -
आंतरराष्ट्रीय शिक्षण! मोदी बांगलादेशला भारतीय फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत - शशी थरूर
बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. राजधानी ढाकामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपणही बांगलादेश स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात असल्याची आठवण सांगितली. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
27 दिवसांपूर्वी -
बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात माझाही सहभाग होता | ते माझे पहिले आंदोलन होते - पंतप्रधान
बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. राजधानी ढाकामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपणही बांगलादेश स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात असल्याची आठवण सांगितली. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.
27 दिवसांपूर्वी -
मोदींच्या नव्या भारतापेक्षा पाकिस्तान-बांगलादेशातील लोकं जास्त आनंदी - वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट
जगातील आनंदी देश कोणते याचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. फिनलँडचे लोक जगात सर्वाधिक खूश आहेत. महत्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्रांकडून जारी होत असलेल्या या यादीमध्ये ‘वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट’ मध्ये फिनलँड सलग चार वर्षे एक नंबरला आहे. तर भारत 149 देशांच्या या यादीत 139 व्या क्रमांकावर आहे.
1 महिन्यांपूर्वी -
VIDEO | US President Joe Biden | जो बायडेन विमानाच्या पायऱ्या चढताना तीनवेळा घसरले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. मात्र त्याला कारण ठरलं आहे ते त्यांचा विमानाच्या पायऱ्या चढताना व्हायरल होणार व्हिडिओ. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे त्यांच्या अत्यंत सुरक्षित विमानाच्या पायऱ्या चढतेवेळी सलग तीन वेळा घसरल्याचा प्रकार समोर आला आहे. चांगली गोष्ट म्हणजे याघटनेत त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
1 महिन्यांपूर्वी -
फ्रान्समध्ये तिसऱ्या कोरोना लाटेची शक्यता | एक महिन्याच्या लॉकडाउनची घोषणा
देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व राज्यांमध्ये सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेचे कौतुक केले. तसेच राज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस योजना तयार करुन कामाला लागावे, असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले.
1 महिन्यांपूर्वी -
लसीकरणात देशातील नागरिकांना प्राधान्य द्यायचं सोडून जगभरात का वाटताय ते बोला आधी - राष्ट्रवादी
देशात कोरोना संक्रमणानं पुन्हा एकदा वेग घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.
1 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
सुप्रीम कोर्टाचे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित | न्यायाधीशांचं वर्क फ्रॉम होम
-
Health First | स्वयंपाकात जीरे वापरण्याने होतील हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
-
Health First | वरून काटेरी असणाऱ्या फणसाचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
वीकेंड लॅाकडाऊन | काय सुरू, काय बंद ? - सविस्तर
-
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज | तब्येत उत्तम
-
देशात 1.60 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची भर | 96,727 बरे झाले तर 880 रुग्णांचा मृत्यू
-
आज प. बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान | IT सेलकडून पुन्हा संभ्रमाच्या अर्धवट क्लिप्स प्रसिद्ध
-
दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या | मुख्यमंत्री-शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
-
कोरोनाच्या काळात राजकारण करणाऱ्या प्रवृतींना त्यांची जागा दाखवायला हवी - अमोल कोल्हे
-
राज्य लॉकडाऊन | सरकारकडून सर्व दुर्बल व गरीब घटकांना निर्बंध काळात 'आर्थिक' दिलासा