25 June 2022 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड 1 July Changes | 1 जुलैपासून तुमच्यावर थेट परिणाम करतील हे बदल | त्रास टाळण्यासाठी अधिक जाणून घ्या Hero Passion XTec | हिरोने लाँच केली नवी पॅशन एक्सटेक बाईक | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
x

भारताचा सर्वात अवजड उपग्रह जी.सॅट-११ चं यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती

नवी दिल्ली : भारताचं सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच जी.सॅट-११ चं आज अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. तब्बल ५,८५४ वजन असणाऱ्या या उपग्रहाचं बुधवारी पहाटे युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. दरम्यान, हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो भारतातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल आणि त्यामुळे देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती होण्याची आशा आहे. विशेष म्हणजे हा उपग्रह इतका विशाल आहे की, प्रत्येक सोलार पॅनल ४ मीटरपेक्षा मोठा आहे, जो एका मोठ्या रुम एवढा असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, याअगोदर म्हणजे वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने भारतीय अवकाश केंद्राने एप्रिल महिन्यात याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून पुन्हा मागवला होता. जीसॅट-६ए च्या अयशस्वी प्रयत्नानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या जवळपास जीसॅट-६ए नियंत्रणाच्या बाहेर गेला होता आणि २९ मार्चला त्याचे प्रक्षेपण होताच त्याचा पूर्णपणे संपर्क तुटला होता.

यानंतर जीसॅट-११ चं प्रक्षेपण कऱण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. अनेक निरीक्षण आणि काळजीपूर्वक तपासण्या केल्यानंतरच जीसॅट-११ चं प्रक्षेपण करण्याला हिरवा कंदील देण्यात आला. हा उपग्रह म्हणजे भारतातील इंटरनेट जगतातील मोठा गेम चेंजर ठरेल असा वैज्ञानिकांचा दावा केला आहे. त्यामुळे हा उपग्रह कार्यरत होताच देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल. जीसॅट-११ च्या सहाय्याने प्रति सेकंदाला १०० गीगाबाइट पेक्षा अधिक ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळणे शक्य होईल.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x