11 December 2024 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

BIG BREAKING | अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारत-चीन सैन्य पुन्हा भिडलं, अनेक भारतीय जवान जखमी

BIG BREAKING

BIG BREAKING | अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाल्याचं समोर आलं आहे. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 9 डिसेंबरच्या रात्री घडली होती.

भारतीय जवानांनी चीनला दिले चोख प्रत्युत्तर
या प्रकरणी भारतीय लष्कराच्या अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे. भारतीय जवानांनी चीनला चोख प्रत्युत्तर दिल्याचं सांगण्यात येत आहे. या चकमकीत भारताचे 30 हून अधिक जवान जखमी झाले आहेत. चीनचे अनेक सैनिकही जखमी झाले आहेत. ज्याची संख्या जास्त आहे. मात्र, भारताचा एकही सैनिक गंभीर नाही.

पीपल्स लिबरेशन आर्मीला एलएसीवर पोहोचायचं होतं
रिपोर्ट्सनुसार, तवांगमधील चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी एलएसीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. ज्याला तेथे तैनात असलेल्या भारतीय सैनिकांनी खंबीरपणे आणि ताकदीने विरोध केला. या दरम्यान दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली. या चकमकीत दोन्ही देशांच्या सैन्याचे काही सैनिक जखमी झाले आहेत. मात्र, भारतीय जवानांनी एलएसीवर पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याला मागे ढकलले. दोन्ही देशांच्या सैनिकांनी थोड्याच वेळात घटनास्थळावरून माघार घेतली, असे संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने या अहवालात म्हटले आहे. या घटनेनंतर भारतीय लष्कराचे कमांडर आणि चिनी कमांडर यांनी या भागात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी नियोजित वेळेनुसार फ्लॅग मिटिंग घेतली.

याआधीही दोन्ही देशांमध्ये वाद झाला होता
याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसेमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता. त्याचबरोबर 15 जून 2020 च्या घटनेनंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. त्यावेळी लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते तर अनेक जण जखमी झाले होते. या झटापटीत चीनचे अनेक सैनिकही मारले गेले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BIG BREAKING India China Army troops clashes at LAC Tawang Arunachal Pradesh border check details on 12 December 2022.

हॅशटॅग्स

#BIG BREAKING(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x