13 April 2021 3:02 AM
अँप डाउनलोड

सर्व विरोधकांना एकत्र आणण्यास आवडेल: शरद पवार

मुंबई : देशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला १० जागांपैकी तब्बल ९ जागांवर पराभव झाल्याने २०१९ मध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्यास मला आवडेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सामान्य नागरिकांच्या मनात भाजप विरोधात रोष वाढत असून सामांन्यांच्या त्या भावनांचा आदर करत देशातील सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवं असं मत पवारांनी मांडल आहे. त्यांना एकत्र आणण्यास मला नक्की आवडेल असं सुद्धा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं.

देशभरातील सामन्यांची धगधग पाहता भाजविरोधात एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचे पवार म्हणाले. आधी म्हणजे १९७७ मध्ये सुद्धा एका पक्षाचा पडता काळ होता आणि त्यामुळे त्याचं सरकारसुद्धा कोसळलं होत. जर विरोधक एकत्र आले तर, तशीच परिस्थिती आता सुद्धा निर्माण होऊ शकते असं पवारांनी आवर्जून सांगितलं.

हॅशटॅग्स

#NCP(341)#Sharad Pawar(380)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x