3 July 2020 3:28 PM
अँप डाउनलोड

स्वतः शरद पवार निरंजन डावखरेंविरोधात आक्रमक

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार स्वतः निरंजन डावखरेंविरोधात मैदानात उतरले आहेत. निरंजन डावखरेंविरोधात राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र आहे. विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत निरंजन डावखरेंना धडा शिकवायचाच असा निर्धार राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

आता स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे ठरविल्याने राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जोमाने कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीने निरंजन डावखरेंविरोधात एनसीपीचे ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना मैदानात उतरविले आहे.

स्वतः शरद पवार यांनी त्यासंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी बुधवारी पक्षाची बैठक आयोजित केली आहे. पवार त्यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. सकाळी ११ वाजता नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहामध्ये पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली असून त्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्या सहित राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#NCP(295)#Sharad Pawar(264)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x