30 April 2024 9:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

मुंबई महानगरपालिका टेंडर प्रक्रिया आणि प्रस्ताव मंजूर करणारे स्थायी समिती अध्यक्ष शिंदे गटात... तर कोर्टात शिंदे-फडणवीसांची फजिती निश्चित

Thackeray Camp

BMC Election Politics | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक तोंडावर आल्या असून मोदी-शहा मुंबईसाठी खूप आग्रही आहेत आणि शिंदे त्यांच्या मुठीत असल्याने ED कार्यरत झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत काल अंमलबजावणी संचलनालय (ED) ने २० ते २१ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. आज सुद्धा धाडींचे सत्र सुरू आहे. ज्यांच्यावर काल ईडीने धाडी टाकल्या होत्या ते सूरज चव्हाण जे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जातात. त्याच सूरज चव्हाण यांच्या राहत्या घरी जाऊन आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट देखील घेतली आहे.

तसेच बुधवारी 21 जूनला ईडीने 15 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर आयएएस अधिकारी संजीय जयस्वाल यांना समन्स बजावला होता. आज त्यांची चौकशीही झाली. खरं तर मुंबई महानगरपालिका टेंडर प्रक्रिया आणि प्रस्ताव मंजूर करणारे तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे उद्या धाडी टाकलेल्या सर्व लोकांनी यशवंत जाधव यांचं नाव पुढे केल्यास कोर्टात तेच होईल जे संजय राऊतांच्या बाबतीत घडलं होतं.

स्थायी समिती अध्यक्ष चौकशी बाहेर कसे?
दरम्यान, कोव्हिड घोटाळा झाला तेव्हा यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. टेंडर प्रक्रिया आणि प्रस्ताव मंजूर करून घेणे याचा थेट संबंध स्थायी समितीशी येत असतो. स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच तो सभागृहात येतो आणि सभागृहात महापौर तो प्रस्ताव मंजूर करत असतात. असं असताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना चौकशीसाठी का बोलावलं जात नाही? असा सवाल शिवसैनिकांमधून केला जात आहे. यशवंत जाधव हे केवळ शिंदे गटात असल्यामुळेच त्यांना अभय दिलं जात आहे काय? भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्या चौकशीची सुरुवात हे स्थायी समितीपासूनच झाली पाहिजे, असंही या शिवसैनिकांचं म्हणणं आहे. समाज माध्यमांवर देखील हीच चर्चा सुरु झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात किरीट सोमय्या यांच्या रडावर मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आले होते. यशवंत जाधव यांच्याशी संबंधित मोठा घोटाळा लवकरच उघड करणार असल्याची प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते.

शिंदे गटातील नेता आणि किरीट सोमय्या यांचे आरोप
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या उदय शंकर महावारला दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले. या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला. हे सर्व बोगस होते. त्यानंतर हे पंधरा कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

दरम्यान, आधी महापालिकेत मोठा घोटाळा झाल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केली आहे असे म्हटले होते. त्यानंतर धाडीत आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले होते असं म्हटलं गेलं. शिंदे समर्थक यशवंत जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे म्हटले होते. मात्र पुढे तस काहीच झालं नाही.

News Title : ED targeting Thackery camp leaders before BMC Election check details on 23 June 2023.

हॅशटॅग्स

#Thackeray Camp(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x